Top News
Civil20 India Inception Meet starts at Nagpur
The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads
सोमवार, जुलै २७, २०२०
बुधवार, फेब्रुवारी २१, २०१८
ऐतिहासिक सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर- हाशमी

मंगळवार, ऑक्टोबर ०६, २०२०
'सारथी'ला दिले, 'महाज्योती'लाही द्या!
मंगळवार, फेब्रुवारी १९, २०१९
आदिवासी मुलींची पाण्यासाठी भटकंती
चंद्रपूर- स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची ) चंद्रपुर येथील आदिवासी मुलींचे वसतिगृहातील पाणीपुरवठा मागील पंधरा 15 दिवसापासून बंद असल्याने तेथील वास्तवास असलेल्या आदिवासी मुलींची पाण्याकरिता इतरत्र भटकावे लागत आहे .त्यामुळे मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकाच संस्थेचा कार्यभार दोन प्राचार्य कडे आहे।त्यामुळे चर्चेत राहणारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींचे पुन्हा एकदा परिसरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील राहणाऱ्या मुलींच्या पिण्याच्या पाण्याचा समस्यामुळे चर्चेत आहे.वारोंवर येथील प्राचार्य यांहा मौखिक व लेखी तक्रार करून ही प्राचार्य यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रशिक्षणार्थी मुलींमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. प्रतिनिधी ने आय टी आय ला भेट दिली असता परीसरातील लाइट बंद होते त्यामुळे तिथे अंधार पसरलेला होता.मुलींचा वसतिगृहाची जवाबदारी ज्या वसतिगृह गृहपाल कडे आहे त्या मागील 3 दिवसापासून बाहेरगावी गेल्याचे प्रशिक्षणार्थी कडून सांगण्यात आले.मुलींच्या सुरक्षतेची जवाबदारी फक्त एकच पुरूष सुरक्षारक्षका वर असल्याचे दिसून आले.सदर वस्तीगृहहे संस्थेते शिकणाऱ्या आदीवासी प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी यांच्या करिता असून सुमारे 50 प्रक्षिणार्थी वास्तवास आहेत. अनेक समस्या नि ग्रस्त या वसतिगृह मध्ये मागील 15 दिवसापासून पिण्याचे पाणी पुरवठा बंद असल्यामुळे प्रशिक्षणार्थी कडून वारोंवर पाठपुरावा करून ही प्राचार्य यांनी ही समस्या न सोडवल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. प्रशिक्षणार्थी यांहा रोज सकाळी संध्याकाळी संस्था परिसर बाहेर सार्वजनिक बांधकाम विभाग च्या क्वार्टर मध्ये पाणी आणावे लागते.
गुरुवार, नोव्हेंबर २९, २०१८
वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये
मुंबई/प्रातिनिधी:
वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.
अलिकडेच ठार मारलेल्या अवनी वाघीण संदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना श्री. मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, टी-1 वाघिणीने 13 जणांचा बळी घेतल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तीला पकडण्यासाठी वन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु ती सापडत नव्हती. मध्यप्रदेश शासनाकडून चार हत्ती बोलावण्यात आले होते. तसेच वन विभागाचे 200 अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच वन क्षेत्रामध्ये 100 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. परंतु तरीही वाघिणीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर पॅराग्लायडर, इटालियन कुत्रे, सुगंधीत द्रव्ये, थर्मल सेंसर ड्रोन इत्यादींचा वापर करण्यात आला. तरीही वाघिणीचा शोध लागला नाही.
त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी बोराटी-वरुड-राळेगाव रस्त्यावर गस्त करणाऱ्या वन विभागाच्या चमूला अवनी वाघीण दिसली तेव्हा तीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाघिणीने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चमूतील सदस्यांकडून नरभक्षक वाघिणीस (टी-1) ठार करण्यात आले. ही सर्व कार्यवाही न्यायालयाचे आदेश आणि वन विभागाचे नियम पाळूनच करण्यात आली.
वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना यापूर्वी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. आता मदतीत वाढ केली असून ती रुपये 15 लाख एवढी करण्यात आली आहे. वन्य प्राणी व नागरिक दोघांचाही जीव महत्वाचा असून दोघोचेही संरक्षण कसे करता येईल, तसेच वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासठी प्रयत्न करणार असून याबाबत लवकरच तोडगा काढणार आहोत. असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. लवकरच देशभरातील वनमंत्री आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करणार असून त्यात वन्यजीवांचे आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही सूचना/शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार आहोत. त्याचबरोबर जंगल परिसरातील कोअर सेक्टरमधल्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.
यावेळी झालेल्या चर्चेत सर्वश्री सदस्य जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, श्रीमती यशोमती ठाकूर, प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला
मंगळवार, नोव्हेंबर २२, २०२२
महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा दुखावला; महिलांनी केले जोडे मारो आंदोलन | Chandrapur Jode Maro Andolan
Chandrapur: Jode Maro Andolan
चंद्रपूर (22/11/2022) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध नोंदवून जोडे मारो आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले. Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Mahila Aghadi.
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना त्वरित पदावरून हटवा तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Governor Bhagat Singh Koshyari and BJP National Spokesperson Sudhanshu Trivedi ) यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करीत कोश्यारी व त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. यापूर्वी कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केले होते. आता सुद्धा राज्यपाल कोश्यारी आणि भाजपचे त्रिवेदी यांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत, असा संताप महिला आघाडीने व्यक्त केला.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी जिल्हा संघटीका उज्वला नलगे, उपजिल्हा संघटीका विद्या ठाकरे, शहर संघटीका वर्षाताई कोठेकर, उपशहर संघटिका किरणताई जुनघरे, विधानसभा समन्वयक बबली पारोही, उपशहर संघटिका अर्चनाताई हेमने, उपशाखाप्रमुख मायाताई पुसाम, शाखाप्रमुख भावना पाटील, सुनीता खराटे, वंदना मांडेकर, अनु खान, टोकलवार ताई, कल्पनाताई आदींची उपस्थिती होती.
Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Mahila Aghadi District Sanghtika Ujwala Nalge, Up-District Sanghtika Vidya Thackeray, City Sanghtika Nashdai Kothekar, Sub-city Sanghtika Kirantai Junghare, Legislative Assembly Coordinator Babli Parohi, Sub-city Sanghtika Archanatai Hemane, Sub-branch Chief Mayatai Pusam, Branch Chief Bhavna Patil, Sunita Kharate, Vandana Mandekar, Anu Khan, Tokalwar Tai, Kalpantai etc were present.
गुरुवार, ऑक्टोबर १५, २०२०
रोहयोसाठी जाँब कार्ड नोंदविण्याची मोहिम शासनाची यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांनी सहकार्याने राबवावी : उपसभापती डॉ. नीलम गो-हे
गुरुवार, डिसेंबर ०६, २०१८

"मदत" संघटनेच्या वतीने पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !
महाराष्ट्र दलित तरूण संघटना ( MAHARASHTRA DALIT TARUN SANGHAANA ) या शासनमान्य एनजीओ तर्फे " 16 वे " राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता सम्मेलन व पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 16 डिसेंबर 2018 रोजी " गाडगे महाराज सभागृह मेडीकल चौक नागपूर " येथे आयोजित करण्यात आले आहे.
या सम्मेलनात अँट्रासिटी कायदा अधिक कडक व्हावा, देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल कार्यकर्ताची भूमिका, फुले-आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ता च्या अडचणी या वर चर्चा होईल.
तसेच विविध क्षेत्रात सामाजिक काम करणारे शिक्षक, प्राध्यापक, डाँक्टर, पत्रकार, वकील, कलाकार, कवी, लेखक, सामाजिक-राजकिय कार्यकर्ता-कार्यकर्ती, कार्यकर्ते, गुणसंपन्न व कर्तृत्ववान व्यक्ती / महिला-पुरूष विविध क्षेञातील महिलांना / पुरूष/ तरूण, यांना राज्यस्तरीय समाजरत्न, राज्यस्तरीय समाजगौरव, राज्यस्तरीय शिक्षकरत्न, राज्यस्तरीय समाजभुषण, राज्यस्तरीय नारीरत्न, राज्यस्तरीय नारीगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. राज्यस्तरीय पुरस्कार खालीलप्रमाणे ....
१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार
२) संत गाडगे महाराज विशिष्ट सेवा पुरस्कार
३) महात्मा ज्योतिबा फुले समाजगौरव पुरस्कार
४) डॉ.पंजाबराव देशमुख समाजभूषण पुरस्कार
५) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजवैभव पुरस्कार
६) डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पञकार पुरस्कार
७) क्रांतीज्योती साविञीबाई फुले नारीरत्न पुरस्कार
८) मातोश्री रमाबाई आंबेडकर नारीभूषण पुरस्कार
९) राष्ट्रमाता इंदिरा गांधी नारीवैभव पुरस्कार
१०) सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन शिक्षकरत्न पुरस्कार
११) छञपञी शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार
१२) माँ. जिजाऊ आदर्श समाजसेविका पुरस्कार.
या पुरस्कारांचे स्वरूप सन्मानचिन्ह, दुपट्टा, मानपत्र, पुष्पगुच्छ, संविधानाचे पुस्तक हे पुरस्काराचे स्वरूप राहील.
इच्छुकांनी. आपले नांव व संपुर्ण पत्ता.श्री.बी.जी.शिंदे, महाराष्ट्र राज्य समन्वयक, खालील WHATSAPP NO :- 9422472199 (व्हाँट्स अँप) वर पाठवावे.किवा CALL फोनला करावे.मोबाईल नंः-9422472199 / 8208936219.
शुक्रवार, जानेवारी २५, २०१९
तंटामुक्त समितीच्या साक्षीने सुरज काजल झाले विवाहबद्द
विवाहित नवदांपत्य |
चिमूर/रोहित रामटेके
चिमूर:- प्रेमात अस थांबायचं नसत, मागे न वळता पुढेच चालायचं असत, ,ऐकमेकांची साथ घेवून जग जिंकायचं असत या शब्द रचनेला अनुसरून सुरज आणि काजल एकमेकांच्या प्रेमात गेले कित्येक वर्ष एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत होते. पण त्याचं प्रेम हे तितेच थांबले नाही तर एकमेकांना जीवनभर साथ देण्याची आण दोघांनी घेतली परंतु हिंदी पिक्चर च्या प्रेम कहाणी प्रमाणे एखादी विलन तर असतोच पण त्या विलनच्या पोकळ धमक्या न घाबरता दोघाणी लग्न करण्यासाठी त्यांनी तंटा मुक्त समिती मालेवाडा येथे धाव घेतली तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष मा. बापूराव परसराम घोडमारे (बंडूभाऊ ) यांनी पुढाकार घेवून उपासक सुरज /ज्ञानेश्वर महेंद्र गजभिये व उपासिका काजल नरेश गोंगले यांचा विवाह सोहळा पार पाडला.
लग्न सोहळा करिता श्री काशिनाथ लक्ष्मण गजभिये व श्री संभाजी दत्तू गजभिये यांनी मुलाच्या वडिलांची भूमिका, श्री. अशोक गेडाम व श्री नीलकंठ चांगो बांबोडे यांनी मुलीच्या वडिलांची भूमिका पार पाडली कार्यक्रम यशस्वी करण्या करिता शांताराम शेंडे (बौद्ध पंच कमेठी अध्यक्ष ) कैलास देवाजी शेंडे (उपसरपंच) सुहास गजभिये हरी गजभिये प्रतिक शेंडे सुयोग मेश्राम स्वप्नील मसराम कुणाल वरखडे प्रवीण वरखडे संदीप गजभिये दुर्योधन गजभिये`हिरा गजभिये व समस्त नवयुवक मैत्री संघ मालेवाडा यांनी सहकार्य केले.
शनिवार, ऑगस्ट २४, २०१९
जटपूरा गेट वाहतूक कोंडीसाठी महापौर अंजली घोटेकर व जोरगेवार यांच्यात बैठक
शनिवार, ऑगस्ट ०४, २०१८
आता ग्राहकांना मिळणार वेळेत व अचूक वीजबील
शुक्रवार, सप्टेंबर २९, २०१७

नवरात्री निमित्य विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानाचे काही खास छायाचित्र फक्त तुमच्यासाठी






गुरुवार, सप्टेंबर २०, २०१८
उत्कृष्ट गणेश मंडळांना पारोतोषिक

गुरुवार, डिसेंबर १३, २०१८
बिग बीचा बिघडला मोबाईल
T 3024 - HELP !! Samsung S9 not functioning .. Samsung logo is on front screen, and is blinking again and again .. nothing else happens .. changed it .. let it be .. tried to close it does not close either ..
HELP ... someone please guide me as to what I should de ..
T 3024 - The most difficult task that a Father has to bear and perform, is when he has to give away his daughter .. in marriage !
शुक्रवार, नोव्हेंबर २५, २०२२
चोरीच्या घटनेतील मुद्देमाल पोलिसांनी केला जप्त #chandrapur #khabarbat #live #maharashtra
Watch video on YouTube here: https://youtu.be/C5B6YtuCrkM
बुधवार, सप्टेंबर ०७, २०२२
चंद्रपूर जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतीसाठी १३ ऑक्टोबरला मतदान | Chandrapur Election Grampanchyayat
६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान
सोमवार, एप्रिल १८, २०२२
चंद्रपूर शहरातील नामांकित सिनेमागृह झाले सील; कारण वाचून थक्क व्हाल
शुक्रवार, ऑक्टोबर १७, २०१४

19 ऑक्टोंबर रोजी होणार मतमोजणी
प्रशासनाची जय्यत तयारी
चंद्रपूर दि.17- विधानसभेसाठी 15 ऑक्टोंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवार 19 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असून प्रत्येक विधानसभेसाठी 14 टेबल लावण्यात येणार आहेत. प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली असून मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात येणार आहे.
सहाही विधानसभा मतदार संघात खालील ठिकाणी मतमोजणी होणार आहे. 70-राजूरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूरा, 71-चंद्रपूर जिल्हा उद्योग भवन (नवीन इमारत) चंद्रपूर, 72-बल्लारपूर- उपविभागीय अधिकारी कार्यालय मूल, 73-ब्रम्हपूरी- शासकीय तंत्र निकेतन नागभिड रोड ब्रम्हपूरी, 74-चिमूर राजीव गांधी भवन तहसिल कार्यालय परिसर चिमूर व 75-वरोरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा या ठिकाणी त्या त्या मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.
मतमोजणीसाठी जिल्हयातील सहा विधानसभा मतदार संघासाठी एकूण 102 मतमोजणी निरीक्षक, 102 मतमोजणी सहाय्यक निरीक्षक, 112 सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. यात राजूरा-17 मतमोजणी निरीक्षक, 17 मतमोजणी सहाय्यक, 17 सुक्ष्म निरीक्षक, चंद्रपूर-16 मतमोजणी निरीक्षक, 16 मतमोजणी सहाय्यक, 19 सुक्ष्म निरीक्षक, बल्लारपूर-16 मतमोजणी निरीक्षक, 16 मतमोजणी सहाय्यक, 20 सुक्ष्म निरीक्षक, ब्रम्हपूरी-17 मतमोजणी निरीक्षक, 17 मतमोजणी सहाय्यक, 18 सुक्ष्म निरीक्षक, चिमूर- 18 मतमोजणी निरीक्षक, 18 मतमोजणी सहाय्यक, 20 सुक्ष्म निरीक्षक व वरोरा-18 मतमोजणी निरीक्षक, 18 मतमोजणी सहाय्यक, 18 सुक्ष्म निरीक्षक असे एकूण 316 अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.
जिल्हयातील सहाही निवडणूक निर्णय अधिकारी राजूरा- शंतनू गोयल, चंद्रपूर- संजय दैने, बल्लारपूर-रवींद्र खंजाजी, ब्रम्हपूरी-कु.दीपा मुधोळ, चिमूर-विजय उरकुडे व वरोरा- जे.पी.लोंढे हे आहेत.
गुरुवार 16 ऑक्टोंबर रोजी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचा-यांची सरमिसळ निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांचे उपस्थित करण्यात आली. सर्व अधिकारी-कर्मचा-यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी मतमोजणी केंद्रासमोर गर्दी करु नये तसेच शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
बुधवार, फेब्रुवारी २७, २०१९

शेततळयासाठी शासनाकडून मिळणार 50 हजारांचे अनुदान
मंगळवार, मे २६, २०२०

तो भिंतीवरून उडी मारून आला शाळेच्या आत,अन क्वांरंटाईन असलेल्या मुलीचा पकडला हात
