Top News

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

  The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads

������������ क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा
������������ क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा

सोमवार, जुलै २७, २०२०

आविसकडून मृतक गंगुलु येदासुला कुटुंबाला आर्थिक मदत

आविसकडून मृतक गंगुलु येदासुला कुटुंबाला आर्थिक मदत
किशोर खेवले 
सिरोंचा /प्रतिनिधी
सिरोंचा तालुक्यातील अमरावती येथील मृतक गंगुलू येदासुला यांच्या कुटुंबाला अविस कडून आर्थिक मदत करण्यात आले आहे.
मृतक गंगुलु यांचे अपघाती मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट आली असून घराच्या मुख्य व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंब आर्थिक संकटात पडले. ही बाब आदिवासी विध्यार्थी संघटनेचे सिरोंचा तालुका अध्यक्ष बानय्या जनगाम याना कळताच वेळेचा विलंब न करता अमरावती येथील मृतक गंगुलु यांचे घरी भेट देऊन त्यांचे कुटुंबाचा सांत्वन करून अविस कडून आर्थिक मदत करण्यात आले आहे.
सिरोंचा तालुक्यात कोणत्याही सामाजिक कार्यात सहभागी राहून अनेक गरजू लोकांना अनेक मदत करण्यात अविसचे बानय्या जनगाम पुढे राहतात. यावेळी अमरावती येथील अविसचे लक्ष्मण बोले, मलाय्या येदासुला, किस्टस्वामी येदासुला, लक्ष्मीस्वामी बीरेल्ली, किष्ठस्वामी बोलेसह गावकरी उपस्थित होते

बुधवार, फेब्रुवारी २१, २०१८

ऐतिहासिक सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर- हाशमी

ऐतिहासिक सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव सादर- हाशमी

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 गोंड़कालीन वारसा या स्वच्छ ता अभियानामुळे पुन्हा उजळून निघाला़ सतत ३३६ दिवस अविरत श्रमदान केल्याने सर्व प्रवेशद्वार व बुरूजांची स्वच्छता झाली़ सुरक्षा भिंतीच्या सौंदर्यीकरणाचा पुरातत्त्व विभागाने शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे डॉ़ इजहार हाशमी यांनी दिली़ इको-प्रो संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते़.

यावेळी मंचावर जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, डॉ निखिल दास, इको-प्रो अध्यक्ष बंडू धोतरे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ़ हाशमी यांनी चंद्रपूर किल्ला स्वच्छता अभियानसोबत संरक्षण भिंतीचे काम पुरातत्व विभागाने सुरु असल्याची माहिती देवून मंजूर होणाच्या मार्गावर असल्याचेही सांगितले़ जिल्हाधिकारी सलिल यांनी शहराच्या विकास योजनांची माहिती दिली़.
इको-प्रो चे अध्यक्ष बंडू धोतरे म्हणाले, किल्ला स्वच्छता दरम्यान नागरिकांचे सहकार्य मिळाले़ शहरातील ऐतिहासिक पर्यटन विकासाच्या दृष्टीने हेरीटेज वॉक आयोजित करावे़ किल्ल्यास लागून होणारे संरक्षण भिंतीचे बांधकाम आणि आतील भागाचा वापर 'सायकल ट्रेक' म्हणून विकसित करण्याची गरजही त्यांनी नमूद केली़
चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक गोंडकालीन किल्ल्याचे स्वच्छता अभियान १ मार्च २०१७ पासुन सुरू करण्यात आले़ या अभियानाला ३३८ दिवस पूर्ण झाल्याचे यावेळी सांगण्यात आले़ गोंडराजांनी बांधलेला भक्कम आणि मजबुत किल्ला कसा दूरवस्थेत होता़ स्वच्छतेनंतर कसे बदल झाले, हे समजावून सांगण्यासाठी छायाचित्र प्रदर्शनी लावण्यात आली होती. यावेळी अशोकसिंह ठाकूर अ‍ॅड़ विजय मोगरे, अभय पाचपोर, डॉ जयंत वडतकर, विजय चंदावार, रमेश मूलकलवार, हरीश ससनकर डॉ़ देवईकर, डॉ़ पालीवाल, दीपक जेऊरकर, सदानंद खत्री, प्रा़ सुरेश चोपणे, डॉ़ योगेश दुधपचारे, प्रा़ धोपटे, प्रदीप अड़किने, प्रशांत आर्वे, प्रा. विजय बदखल, पोलीस निरीक्षक प्रदीप सिरस्कार, संपत चव्हाण, वर्षा खरसाने, मनोहर टहलियानी, अनिल दहगावकार, धनंजय तावड़े, उमाकांत धांडे आदी उपस्थित होते़मंगळवार, ऑक्टोबर ०६, २०२०

'सारथी'ला दिले, 'महाज्योती'लाही द्या!

'सारथी'ला दिले, 'महाज्योती'लाही द्या!📌 महाज्योती बचाव कृती समितीची मागणी

📌 कृती समितीतर्फे राज्यभर ढोल बजाओ आंदोलन
📌 ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी आंदोलननागपूर - शासनाने मराठा समाज व सारथी ला ज्या प्रमाणे निधी दिला त्याचप्रमाणे ओबीसी व भटक्या विमुक्तांच्या महाज्योती संस्थेला द्यावा या प्रमुख मागणीसाठी आज (ता ६) ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले. महाज्योती बचाव कृती समिती तर्फे नागपूर विभागीय समाजकल्याण व महाज्योती कार्यालयासमोर आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधले.

ओबीसी, भटक्या विमुक्तांच्या हक्कासाठी व विविध प्रश्नासाठी महाज्योती बचाव कृती समिती तर्फे राज्यभर आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व बहुजन विकास मंत्री यांच्या नावे समाज कल्याण उपायुक्त डॉ सिध्दार्थ गायकवाड, विभागीय आयुक्त डॉ संजीवकुमार, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले.
राज्यातील एक कोटी ३० लाख लोकसंख्या असलेल्या भटक्या विमुक्तांवर सातत्याने अन्याय करण्यात आला. भटक्या विमुक्त प्रवर्गाच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी महाज्योती मध्ये अशासकीय सदस्यपदी भटक्या विमुक्तांना प्रतिनिधित्व देण्यात यावे, राज्य शासनाने सारथी आणि मराठा समाजाशी संबंधित संस्थेला ज्याप्रमाणे १२१० कोटी रुपये दिले त्याच धर्तीवर महाज्योती साठी २५०० कोटी रुपयांचा निधी द्यावा, भटके विमुक्त, बारा बलुतेदार, ओबीसी समाजाच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेसाठी १२०० कोटी रुपये, वसतीगृह निर्वाह भत्त्यासाठी १६० कोटी रुपये त्वरित जाहीर करण्यात यावे, भटक्या विमुक्त, बारा बलुतेदार समाजाला क्रिमीलेअर मधून वगळण्यात यावे, ओबीसी समाजाची जातीगत जनगणना करण्यात यावी, बार्टी योजनेच्या धर्तीवर महाज्योतीत सर्व योजना, प्रशिक्षण, फेलोशिप त्वरित सुरू करण्यात यावे, क्रिमीलेअरची मर्यादा १५ लाख रुपये करण्यात यावी, महाज्योतीत २५ सप्टेंबर २०२० रोजीच्या आदेशान्वये केवळ धनगर समाजासाठी लागू केलेल्या योजना महाज्योतीतील सर्व घटकांना तातडीने लागू कराव्यात, तातडीने महाज्योती संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, स्वयंरोजगार प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी आर्थिक निधी उपलब्ध करून द्यावा, ओबीसी व भटक्या विमुक्त विद्यार्थ्यांसाठी असलेल्या डॉ आंबेडकर मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजने गती देऊन विद्यार्थ्यांना सत्र २०२० - २१ ची शिष्यवृत्ती देण्यात यावी या मागण्याचा समावेश होता.
या आंदोलनाला महाज्योती संस्थेचे अशासकीय सदस्य प्रा. दिवाकर गमे, डॉ बबनराव तायवाडे यांनी भेट दिली.
महाज्योती बचाव कृती समिती तर्फे संघर्ष वाहिनीचे मुख्य संघटक श्री दिनानाथ वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी दिनानाथ वाघमारे, मुकुंद अडेवार, मिलिंद वानखेडे, योगेश बन, खिमेश बढिये, किशोर सायगन, विनोद आकुलवार, अनील राऊत, शेषराव खार्डे, निशा मुंडे, अविनाश बडे, मधुकर गिरी, प्रभाकर मांढरे, विनायक सुर्यवंशी, राजू हारगुडे, अमोल कानारकर, चंद्रशेखर झोटिंग, प्रणाली रंगारी, गजेंद्र चाचरकर, महेश गिरी, ओंकार श्रीखंडे, विश्वनाथ चव्हाण, धीरज भिसीकर, विक्रम परमार, रामा जोगराणा, रणछोड भिमा परमार, प्रेमचंद राठोड, धर्मपाल शेंडे, मुकेश लोखंडे (बॅन्ड), विश्वनाथ बत्तीसे (गोंधळ वाले), गणेश खडके, विनोद दाढे, अशोक धनगावकर, कैलास वरेकर, जयेंद्र चव्हाण, वासुदेव गरवारे आदी ओबीसी व भटक्या विमुक्त चळवळीतील खंदे पदाधिकारी उपस्थित होते.

मंगळवार, फेब्रुवारी १९, २०१९

आदिवासी मुलींची पाण्यासाठी भटकंती

आदिवासी मुलींची पाण्यासाठी भटकंती

शासकीय आय टी आय मुलींची येथील प्रकार

चंद्रपूर- स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची ) चंद्रपुर येथील आदिवासी मुलींचे वसतिगृहातील पाणीपुरवठा मागील पंधरा 15 दिवसापासून बंद असल्याने तेथील वास्तवास असलेल्या आदिवासी मुलींची पाण्याकरिता इतरत्र भटकावे लागत आहे .त्यामुळे मुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. एकाच संस्थेचा कार्यभार दोन प्राचार्य कडे आहे।त्यामुळे चर्चेत राहणारी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलींचे पुन्हा एकदा परिसरातील आदिवासी मुलींच्या वसतिगृहातील राहणाऱ्या मुलींच्या पिण्याच्या पाण्याचा समस्यामुळे चर्चेत आहे.वारोंवर येथील प्राचार्य यांहा मौखिक व लेखी तक्रार करून ही प्राचार्य यांनी दुर्लक्ष केल्यामुळे प्रशिक्षणार्थी मुलींमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. प्रतिनिधी ने आय टी आय ला भेट दिली असता परीसरातील लाइट बंद होते त्यामुळे तिथे अंधार पसरलेला होता.मुलींचा वसतिगृहाची जवाबदारी ज्या वसतिगृह गृहपाल कडे आहे त्या मागील 3 दिवसापासून बाहेरगावी गेल्याचे प्रशिक्षणार्थी कडून सांगण्यात आले.मुलींच्या सुरक्षतेची जवाबदारी फक्त एकच पुरूष सुरक्षारक्षका वर असल्याचे दिसून आले.सदर वस्तीगृहहे संस्थेते शिकणाऱ्या आदीवासी प्रवर्गातील प्रशिक्षणार्थी यांच्या करिता असून सुमारे 50 प्रक्षिणार्थी वास्तवास आहेत. अनेक समस्या नि ग्रस्त या वसतिगृह मध्ये मागील 15 दिवसापासून पिण्याचे पाणी पुरवठा बंद असल्यामुळे प्रशिक्षणार्थी कडून वारोंवर पाठपुरावा करून ही प्राचार्य यांनी ही समस्या न सोडवल्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. प्रशिक्षणार्थी यांहा रोज सकाळी संध्याकाळी संस्था परिसर बाहेर सार्वजनिक बांधकाम विभाग च्या क्वार्टर मध्ये पाणी आणावे लागते.

गुरुवार, नोव्हेंबर २९, २०१८

वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये

वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना 15 लाख रुपये

 वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी प्रयत्नशील:सुधीर मुनगंटीवार

            मुंबई/प्रातिनिधी:
वाघांच्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असून वन्यजीव प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या नागरिकांना आता 15 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येईल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत सांगितले.


            अलिकडेच ठार मारलेल्या अवनी वाघीण संदर्भात सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधीद्वारे प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना श्री. मुनगंटीवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, टी-1 वाघिणीने        13 जणांचा बळी घेतल्यानंतर नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. तीला पकडण्यासाठी वन विभागाने शर्थीचे प्रयत्न केले होते. परंतु ती सापडत नव्हती. मध्यप्रदेश शासनाकडून चार हत्ती बोलावण्यात‍ आले होते. तसेच वन विभागाचे 200 अधिकारी व कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले होते. तसेच वन क्षेत्रामध्ये 100 ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले होते. परंतु तरीही वा‍घिणीचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्यानंतर पॅराग्लायडर, इटालियन कुत्रे, सुगंधीत द्रव्ये, थर्मल सेंसर ड्रोन इत्यादींचा वापर करण्यात आला. तरीही वाघिणीचा शोध लागला नाही.

त्यानंतर 2 नोव्हेंबर रोजी बोराटी-वरुड-राळेगाव रस्त्यावर गस्त करणाऱ्या वन विभागाच्या चमूला अवनी वाघीण दिसली तेव्हा तीला बेशुद्ध करुन जेरबंद करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र वाघिणीने चमूवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे चमूतील सदस्यांकडून नरभक्षक वाघिणीस (टी-1) ठार करण्यात आले. ही सर्व कार्यवाही न्यायालयाचे आदेश आणि वन विभागाचे नियम पाळूनच करण्यात आली.

            वन्यजीव हल्ल्यात मृत्यू पावलेल्यांना यापूर्वी 10 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येत होती. आता मदतीत वाढ केली असून ती रुपये 15 लाख एवढी करण्यात आली आहे. वन्य प्राणी व नागरिक दोघांचाही जीव महत्वाचा असून दोघोचेही संरक्षण कसे करता येईल, तसेच वाघांच्या मृत्यूंचे प्रमाण शून्यावर आणण्यासठी प्रयत्न करणार असून याबाबत लवकरच तोडगा काढणार आहोत. असे श्री. मुनगंटीवार म्हणाले. लवकरच देशभरातील वनमंत्री आणि वरिष्ठ वन अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित करणार असून त्यात वन्यजीवांचे आणि नागरिकांच्या सुरक्षेबाबत तसेच नव्याने कायदे करण्यासंदर्भात काही सूचना/शिफारशी केंद्र सरकारकडे पाठविणार आहोत. त्याचबरोबर जंगल परिसरातील कोअर सेक्टरमधल्या गावांचे पुनर्वसन करण्यासाठी केंद्र सरकारकडे आर्थिक मदतीसाठीचा प्रस्ताव पाठविणार असल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

            यावेळी झालेल्या चर्चेत सर्वश्री सदस्य जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, श्रीमती यशोमती ठाकूर,  प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला

मंगळवार, नोव्हेंबर २२, २०२२

 महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा दुखावला; महिलांनी केले जोडे मारो आंदोलन | Chandrapur Jode Maro Andolan

महाराष्ट्राचा स्वाभिमानाचा दुखावला; महिलांनी केले जोडे मारो आंदोलन | Chandrapur Jode Maro AndolanChandrapur: Jode Maro Andolan 

चंद्रपूर (22/11/2022) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्‍याबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांचा निषेध नोंदवून जोडे मारो आंदोलन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले.  Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Mahila Aghadi.

            महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा अपमान करणाऱ्या राज्यपालांना त्वरित पदावरून हटवा तसेच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी (Governor Bhagat Singh Koshyari and BJP National Spokesperson Sudhanshu Trivedi ) यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी करीत कोश्‍यारी व त्रिवेदी यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला. यापूर्वी कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केले होते. आता सुद्धा राज्‍यपाल कोश्यारी आणि भाजपचे त्रिवेदी यांनी शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत, असा संताप महिला आघाडीने व्यक्त केला.

            यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महिला आघाडी जिल्‍हा संघटीका उज्‍वला नलगे, उपजिल्‍हा संघटीका विद्या ठाकरे, शहर संघटीका वर्षाताई कोठेकर, उपशहर संघटिका किरणताई जुनघरे, विधानसभा समन्वयक बबली पारोही, उपशहर संघटिका अर्चनाताई हेमने, उपशाखाप्रमुख मायाताई पुसाम, शाखाप्रमुख भावना पाटील, सुनीता खराटे, वंदना मांडेकर, अनु खान, टोकलवार ताई, कल्पनाताई आदींची उपस्थिती होती.


  Shiv Sena (Uddhav Balasaheb Thackeray) Mahila Aghadi District Sanghtika Ujwala Nalge, Up-District Sanghtika Vidya Thackeray, City Sanghtika Nashdai Kothekar, Sub-city Sanghtika Kirantai Junghare, Legislative Assembly Coordinator Babli Parohi, Sub-city Sanghtika Archanatai Hemane, Sub-branch Chief Mayatai Pusam, Branch Chief Bhavna Patil, Sunita Kharate, Vandana Mandekar, Anu Khan, Tokalwar Tai, Kalpantai etc were present.

गुरुवार, ऑक्टोबर १५, २०२०

रोहयोसाठी जाँब कार्ड नोंदविण्याची मोहिम शासनाची यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांनी सहकार्याने राबवावी : उपसभापती डॉ. नीलम गो-हे

रोहयोसाठी जाँब कार्ड नोंदविण्याची मोहिम शासनाची यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्थांनी सहकार्याने राबवावी : उपसभापती डॉ. नीलम गो-हे
मुंबई, दि.१५ : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात येणारी कामे सध्या कार्यरत असणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि शासकीय यंत्रणेने समन्वयाने कामे करुन समृध्द महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न करावेत असे विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गो-हे सांगितले.

रोजगार हमी योजनेसंदर्भात विविध विषयांवर दुरदुश्य व्दारे आयोजित वेबीनारमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी रोजगार हमी योजने प्रधान सचिव नंदकुमार, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, रोजगार हमी योजनेचे आयुक्त श्री.नायक यांच्या सह राज्यातील विविध भागातील स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी श्री रमेश भिसे,श्री किशोर मोघे, श्री.अरुण शिवकर, श्रीमती सीमा कुलकर्णी, श्रीमती शुभदा देशमुख, श्री संतोष राऊत, श्रीमती कुशावती बेळे, श्रीमती चंद्रकला भार्गव आदी उपस्थित होते. *मा.उपसभापती यांनी आयोजित केलेली ही रोहयो विभागासोबतची तिसरी बैठक असुन पेण तालुक्यात १०७ शेततळी करण्यात आली असुन ३००० महिला मजुरांना संघटित करुन काम मिळवून देण्यात यश आल्याचे अरुण शिवकर यांनी सांगितले*
श्रीमती गो-हे म्हणाल्या,ग्रामीण भागात महिला मजूरांची संख्या लक्षणीय आहे. त्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमधील कामेही उपलब्ध आहेत,परंतु जाणिवजागृतीचा अभाव जाणवत आहे.त्यामुळे राज्यात जाँब कार्ड नोंदणी अभियान पंधरवडा कार्यक्रम राबविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामीण भागातील मजूरांना विविध फाँर्म कसे भरावे, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणकोणती काम करता येतात.सार्वजनिक कामे कोणती,वैयक्तिक कामे कोणकोणती आहेत आदीसंदर्भात माहिती या जाणिवजागृतीमध्ये करण्यात येणार आहेत.महिला मजूरांना या विषयी माहिती करून देणे गरजेचे आहे, म्हणून त्यांना सविस्तर माहिती दिली जाईल असेही त्यांनी सांगितले.

यापुर्वी पावसाळ्यात राज्यातील काही भागात पुर परिस्थिती गंभीर झाली होती. त्याठिकाणी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेती दुरुस्ती आणि गाव स्वच्छतेची कामे करण्यात आली होती. याहीवर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे.पुर परिस्थितीही निर्माण त्यामुळे याहीवर्षी रोहयो अशी अंतर्गत दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने पुन्हा रोहयो अंतर्गत कामे करण्यासाठी मदत व पुनर्वसन विभागाबरोबर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


मा.ना.ऊद्धवसाहेब ठाकरे, मा.ना.अजितदादा पवार, मा.ना.संदिपान भुमरे यांना या सर्व संकल्पनेबाबत पाठपुरावा करणार असल्याचे ऊपसभापती नीलमताई गोर्हे यांनी सांगितले.

ज्या भागात मजुरांना जाँब कार्ड देण्यासाठी अधिका-यांनी सहकार्य केले नाही. त्या अधिका-याची चौकशी लावली जाईल आणि योग्य ती कारवाई करण्यात येईल .ज्या ठिकाणी कामांची चौकशी सुरू आहे. तेथील पुढील कामे सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जातील.


रोहयोचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी राज्य आणि राज्यातील शेतकरी समृद्ध करण्यासाठी रोहयो अंतर्गत राबविण्यात येणारे उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात येतील. ग्रामीण भागातील नागरिकांना मागेल त्याला काम उपलब्ध करून देण्यात येईल असे त्यांनी सांगितले. कृषी विभागाचे सचिव श्री डवले यांनी कृषी विभागाअंतर्गत रोहयोचे राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.रोहयो आयुक्त श्री.रंगा नायक यांनी बैठकीतील सुचनांवर पुर्णपणे कार्यवाही असे सांगितले. रोहयोतुन आँक्टोबर २० मध्ये २० लाख मजुरांना तर एकुण ७५५ कोटी रुपयांची मजुरी देण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली.

गुरुवार, डिसेंबर ०६, २०१८

"मदत" संघटनेच्या वतीने पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !

"मदत" संघटनेच्या वतीने पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन !

नागपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र दलित तरूण संघटना ( MAHARASHTRA DALIT TARUN SANGHAANA )  या शासनमान्य एनजीओ तर्फे " 16 वे " राज्यस्तरीय सामाजिक कार्यकर्ता सम्मेलन व पुरस्कार सोहळा रविवार दिनांक 16 डिसेंबर 2018 रोजी " गाडगे महाराज सभागृह मेडीकल चौक नागपूर " येथे आयोजित करण्यात आले आहे.
या सम्मेलनात अँट्रासिटी कायदा अधिक कडक व्हावा, देशातील वाढत्या बेरोजगारीबद्दल कार्यकर्ताची भूमिका, फुले-आंबेडकर चळवळीतील सामाजिक कार्यकर्ता च्या अडचणी या वर चर्चा होईल.
तसेच विविध क्षेत्रात सामाजिक काम करणारे शिक्षक, प्राध्यापक, डाँक्टर, पत्रकार, वकील, कलाकार, कवी, लेखक, सामाजिक-राजकिय कार्यकर्ता-कार्यकर्ती, कार्यकर्ते, गुणसंपन्न व कर्तृत्ववान व्यक्ती / महिला-पुरूष  विविध क्षेञातील महिलांना / पुरूष/ तरूण, यांना राज्यस्तरीय  समाजरत्न, राज्यस्तरीय समाजगौरव, राज्यस्तरीय शिक्षकरत्न, राज्यस्तरीय समाजभुषण, राज्यस्तरीय  नारीरत्न, राज्यस्तरीय नारीगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. राज्यस्तरीय पुरस्कार खालीलप्रमाणे ....
१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार
२) संत गाडगे महाराज विशिष्ट सेवा पुरस्कार
३) महात्मा ज्योतिबा फुले समाजगौरव पुरस्कार
४) डॉ.पंजाबराव देशमुख समाजभूषण पुरस्कार
५) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाजवैभव पुरस्कार
६) डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पञकार पुरस्कार
७) क्रांतीज्योती साविञीबाई फुले नारीरत्न पुरस्कार
८) मातोश्री रमाबाई आंबेडकर नारीभूषण पुरस्कार
९) राष्ट्रमाता इंदिरा गांधी नारीवैभव पुरस्कार
१०) सर्वपल्ली डॉ.राधाकृष्णन शिक्षकरत्न पुरस्कार
११) छञपञी शिवाजी महाराज आदर्श समाजसेवक पुरस्कार
१२) माँ. जिजाऊ आदर्श समाजसेविका पुरस्कार.
या पुरस्कारांचे स्वरूप  सन्मानचिन्ह, दुपट्टा, मानपत्र, पुष्पगुच्छ, संविधानाचे पुस्तक हे पुरस्काराचे स्वरूप राहील.
इच्छुकांनी. आपले नांव व संपुर्ण पत्ता.श्री.बी.जी.शिंदे, महाराष्ट्र राज्य समन्वयक,  खालील WHATSAPP NO :- 9422472199 (व्हाँट्स अँप) वर पाठवावे.किवा CALL फोनला करावे.मोबाईल नंः-9422472199 / 8208936219.

शुक्रवार, जानेवारी २५, २०१९

तंटामुक्त समितीच्या साक्षीने सुरज काजल झाले विवाहबद्द

तंटामुक्त समितीच्या साक्षीने सुरज काजल झाले विवाहबद्द

विवाहित नवदांपत्य

चिमूर/रोहित रामटेके

चिमूर:- प्रेमात अस थांबायचं नसत, मागे न वळता पुढेच चालायचं असत, ,ऐकमेकांची साथ घेवून जग जिंकायचं असत या शब्द रचनेला अनुसरून सुरज आणि काजल एकमेकांच्या प्रेमात गेले कित्येक वर्ष एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत होते. पण त्याचं प्रेम हे तितेच थांबले नाही तर एकमेकांना जीवनभर साथ देण्याची आण दोघांनी घेतली परंतु हिंदी पिक्चर च्या प्रेम कहाणी प्रमाणे एखादी विलन तर असतोच पण त्या विलनच्या पोकळ धमक्या न घाबरता दोघाणी लग्न करण्यासाठी त्यांनी तंटा मुक्त समिती मालेवाडा येथे धाव घेतली तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष मा. बापूराव परसराम घोडमारे (बंडूभाऊ ) यांनी पुढाकार घेवून उपासक सुरज /ज्ञानेश्वर महेंद्र गजभिये व उपासिका काजल नरेश गोंगले यांचा विवाह सोहळा पार पाडला.


लग्न सोहळा करिता श्री काशिनाथ लक्ष्मण गजभिये व श्री संभाजी दत्तू गजभिये यांनी मुलाच्या वडिलांची भूमिका, श्री. अशोक गेडाम व श्री नीलकंठ चांगो बांबोडे यांनी मुलीच्या वडिलांची भूमिका पार पाडली कार्यक्रम यशस्वी करण्या करिता शांताराम शेंडे (बौद्ध पंच कमेठी अध्यक्ष ) कैलास देवाजी शेंडे (उपसरपंच) सुहास गजभिये हरी गजभिये प्रतिक शेंडे सुयोग मेश्राम स्वप्नील मसराम कुणाल वरखडे प्रवीण वरखडे संदीप गजभिये दुर्योधन गजभिये`हिरा गजभिये व समस्त नवयुवक मैत्री संघ मालेवाडा यांनी सहकार्य केले.

शनिवार, ऑगस्ट २४, २०१९

जटपूरा गेट वाहतूक कोंडीसाठी महापौर अंजली घोटेकर व जोरगेवार यांच्यात बैठक

जटपूरा गेट वाहतूक कोंडीसाठी महापौर अंजली घोटेकर व जोरगेवार यांच्यात बैठक


महापौर यांच्याशी १ तास चर्चा पहाणी करुन पर्यायी मार्ग होणार सुरु
चंद्रपूर/प्रतिनिधी:
जटपूरा गेटवर होणा-या वाहतूक कोंडीमूळे नागरिकांना प्रचंड त्रास सहण करावा लागत आहे. यावर उपायोजना करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार वारंवार पाठपूरावा करत आहे. पून्हा एकदा किशोर जोरगेवार यांनी हा विषय चर्चेत आनला असून या विषयावर तोडगा काढण्यासाठी महापौर अंजली घोटेकर यांच्या सोबत एक तास चर्चा केली आहे. यावेळी किशोर जोरगेवार यांनी महापौर यांना काही सुजाव सुचविले असून गणपती उत्सवा नंतर यावर प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करण्याचे आश्वासन महापौर यांनी दिले आहे. 

यावेळी किशोर जोरगेवार यांच्यासह शांतता समीतीचे नगरसेवक विशाल निंबाळकर, सदानंद खत्री, श्री. रंगारी सर (आर्कीटेक) आम आदमी पार्टिचे मुक्कू सोनी, कलाकर मल्लारप, नरेश मोटवानी, विलास सोमलवार, बबलु मेश्राम, सौरभ ठोंबरे, आदिंची उपस्थिती होती. 

चंद्रपूर शहरातील नागरिकांना शहराबाहेर जाण्याकरीता जटपूरा गेट हा एकमात्र मार्ग आहे. त्यामूळे येथे नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. त्यावर तोडगा काढण्यासाठी अणेकदा उपाय योजना करण्यात आल्यात. मात्र त्या असफल राहिल्यात. परिणामी येथे वाहणांच्या लांबच लांब रांगा लागत असल्याने कासवगतिने वाहण पूढे जात असतात. यात नारिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

 यावर तोडगा काढण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडचे अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी पूढाकार घेत प्रशासनाला पर्यायी मार्ग सुजवीला होता. या मार्गाची पाहणी करण्यासाठी एका कमीटीचे गठण करण्यात आले होते. तत्कालीन पोलिस उपविभागीय अधिकारी सुशिल कूमार नायक या कमीटीचे अध्यक्ष होते. मात्र ईच्छा शक्तीच्या अभावी हा प्रश्न तसाच ताटकळत राहिला. त्यानंतर काल गूरुवारी एका हिंदी वृत्तपत्राच्या जनसंवाद कार्यक्रमा प्रसंगी हा विषय चर्चेत आला असता येथे उपस्थित किशोर जोरगेवार यांनी या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महापौर अजंली घोटेकर यांना हा विषय सोडविण्यासाठी बैठक लावण्याची खुल्या मंचावरुन मगणी करत हा विषय पून्हा चर्चेत आनला यावेळी महापौर यांनी बैठक घेण्याचे आश्वासण दिले. 

त्यानूसार आज सकाळी १० वाजून ३० मिनीटांनी महापौर यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी जटपूरा गेटच्या बाहेर निघारा मार्गावर अधिक वाहण चालतात तर शहरा बाहेरुन येणा-या वाहणांची संख्या कमी आहे. तरी जाणारा मार्ग १४ फुटांचा आहे तर तिकडून येणारा मार्ग हा ३१ फुटांचा आहे. 

त्यामूळे शहरातून बाहेर जाणा-या दुचाकी वाहणासाठी ३१ फुटांपैकीचा १० फुट मार्ग हा आरक्षीत करावा असा सुजाव यावेळी किशोर जोरगेवार यांनी सुचविला तसेच सपना टॉकीज बाजूचा मार्ग सरई होऊन गंज वार्डात निघतो त्यामूळे अर्धि ट्राफीक या मार्गाने वळती करावी असा सूजाव यावेळी किशोर जोरगेवार यांनी महापौर यांना केला. महापौर यांनीही या सुचनांवर गांर्भियाने विचार करत गणेश उत्सवानंतर या मार्गाची पहाणी करुन प्रायोगिक तत्वार यावर उपायोजना करण्यात येईल असे आश्वासन किशोर जोरगेवार यांना महापौर यांनी दिले.

शनिवार, ऑगस्ट ०४, २०१८

 आता ग्राहकांना मिळणार वेळेत व अचूक वीजबील

आता ग्राहकांना मिळणार वेळेत व अचूक वीजबील

महावितरणकडून केंद्रीयपध्दतीने बिलींग, छपाई व वितरण
देशात प्रथमच नाविन्यपूर्णप्रयोग
नागपूर/प्रतिनिधी:
राज्यातील अडीच कोटीपेक्षाअधिक वीज ग्राहकांना वेळेत व अचूकवीजबील मिळावे तसेच ग्राहकांनावीजबील भरण्यासाठी अधिककालावधी मिळावा या करिता महावितरणच्यावतीने वीज बिलांची छपाई व वितरण केंद्रीय स्तरावरकरण्याच्या प्रक्रियेस आज पासून सुरूवात झाली आहे. देशातील वीज वितरण क्षेत्रात अशा पध्दतीचा नाविन्यपूर्ण प्रयोग प्रथमच होत असून यामुळे ग्राहक सेवा गुणवत्तेत मोठी वाढ होईल. तसेच जास्तीत जास्त ग्राहकांना प्रॉम्ट पेंमेंट डिस्कॉऊंटचा लाभ घेता येईल. 
महावितरणच्या सध्याच्या बिलिंग व्यवस्थेतील प्रक्रियेमुळे वीज बिलांची छपाई व ते ग्राहकांपर्यन्त पोहोचण्यासाठी साधारणत: ७ ते ८दिवसांचा अवधी लागतो. ग्राहकांना वेळेत वीजबील न मिळाल्यामुळे त्वरीतदेयक प्रदान दिनांक अंतर्गत मिळणारीसूट (प्रॉम्टपेमेंट डिस्काऊंट) मिळण्यास ग्राहकांना अडचणी येत होत्या.याशिवाय वेगवेगळ्या एजन्सींद्वारे वीजबिलांची छपाई व वितरण होत असल्यामुळे त्यावर संनियंत्रण ठेवणे कठीण जात होते.
या सर्व बाबींवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठीमहावितरणच्यावतीने केंद्रीय पध्दतीनेवीजबिलाची छपाई व वितरण करण्यातयेणार आहे. मोबाईल मीटर रिडिंगॲपमुळे प्रत्यक्षवेळी (रिअल टाईम)मीटरवाचन तसेच चेक रिडिंग उपलब्धहोत आहे. त्यामुळे या व्यवस्थेत जलदव दैनंदिन पध्दतीने बिलावरची संपूर्णप्रक्रिया करण्यात येणार आहे. याप्रक्रियेमुळे ग्राहकांना जास्तीत जास्तअचूक वीजदेयक मिळेल तसेच त्यांनावीजदेयक भरण्यासाठी अधिकचाकालावधी मिळाल्यामुळे वीजदेयकभरणा केंद्रातील रांगा कमी होतील वदेयक भरणे अधिक सोयीचे होईल.
मुख्यालयातील सर्व्हरवर बीलतयार करण्यात येणार असून हे बीलपरिमंडलस्तरावर वीजबीलवितरणासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्याएजन्सीकडे २४ तासांत पाठविण्यातयेईल. त्यानंतर या एजन्सीकडून सदरवीजबील शहरी भागात ४८ तासातआणि ग्रामीण भागात ७२ तासांतवितरीत करण्यात येईल्. दिलेल्यामुदतीत ग्राहकांना वीजबील न देणाऱ्याएजन्सींना दंड आकरण्यात येईल.त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना वेळेत वीजबील मिळून प्रॉम्ट पेंमेंट डिस्कॉऊंटचा लाभ घेता येईल. 
या नाविन्यपूर्ण प्रक्रियेमुळे ग्राहकसेवा गुणवत्तेत मोठी वाढ, वसुली कार्यक्षमतेत वाढ व थकबाकी तसेचवाणिज्यिक हानीत घट, उपलब्धमनुष्यबळाचे प्रभावी नियोजन, बिलींग,छपाई व वितरण्‍ खर्चात मोठी बचत,संपूर्ण व्यवस्थेवर केंद्रीयस्तरावरूननियंत्रण, बिलींग तक्रारीच्या प्रमाणातघट व संपूर्ण बिलींग व्यवस्थेवर माहितीतंत्रज्ञानाच्या सहाय्याने संनियंत्रणइत्यादी लाभ होणार असून त्या सर्वांचाफायदा ग्राहकांना होईल.

शुक्रवार, सप्टेंबर २९, २०१७

नवरात्री निमित्य विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानाचे काही खास छायाचित्र फक्त तुमच्यासाठी

नवरात्री निमित्य विद्युत रोषणाईने उजळून निघालेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानाचे काही खास छायाचित्र फक्त तुमच्यासाठीकोल्हापूरच्या महालक्ष्मी देवस्थानाकडे महामातृक क्षेत्र म्हणून पाहिले जाते. नवरात्र काळात देशभरातील लाखो भक्त देवीच्या दर्शनासाठी कोल्हापुरात येतात. सध्या करवीर निवासिनी श्रीमहालक्ष्मी मंदिर विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे. आज आम्ही तुमच्यासाठी या मंदिराचे खास फोटो घेऊन आलो आहोत.
(सर्व फोटो : साभार देवस्थान व्यवस्थापन समिती कोल्हापूर)


करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिराचे दैदिप्यमान दर्शन, पाहा खास फोटो

गुरुवार, सप्टेंबर २०, २०१८

 उत्कृष्ट गणेश मंडळांना पारोतोषिक

उत्कृष्ट गणेश मंडळांना पारोतोषिक

चंद्रपूर/प्रतिनिधी:
ज्या प्रमाणे पोलीस आपल्या भावनांना आवर घालत केवळ समाजाच्या सेवेत प्रत्येक उत्सवादरम्यान कार्यरत असतो त्याचप्रमाणे येत्या गणेश विर्सजन उत्सहाच्या वेळी पोलीस मित्रांनी सुध्दा त्याच निष्ठेने व आत्मयतेने इतरांचा आनंद व्दिगुनीत होण्याकरीता पोलीसांसाबेत उभे राहावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. महेष्वर रेड्डी यांनी पोलीस मुख्यालय येथे सपंन्न झालेल्या पोलीस मित्र बैठकी दरम्यान केले. सदर पोलीस मित्र बैठकी करीता संपुर्ण चंद्रपूर जिल्हयातील मोठया संख्येने पोलीस मित्र एकत्र आलेले होते. आगामी गणेश उत्सव विसर्जन बंदोबस्त
संबंधाने सदरची बैठक डॉ. श्री. कुणाल खेमणार जिल्हयाधिकारी चंद्रपुर आणि डॉ. श्री. महेष्वर रेड्डी पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. येत्या गणेश विसर्जन बंदोबस्त वेळी हे पोलीस मित्र पोलीसांच्या खांदयाला खांदा लावुन कार्य करणार आहेत. त्याकरीता त्यांना पोलीस मित्र ओळख म्हणुन एक टीशर्ट , एक कॅप आणि एक व्हिसल जिल्हाधिकारी चंद्रपुर व पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या वेळी पोलीस मित्र यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक श्री. महेष्वर रेड्डी हे म्हणाले की, टिळकांच्या स्वप्नातील गणेश उत्सव हा भक्तिरसाने सजलला उत्सव आहे. पोलीस मित्रांचे मनोबल वाढवित पोलीस अधीक्षक यांनी निस्वार्थपणे समाजाच्या सेवेत दाखल झाल्या बद्दल उपस्थित पोलीस मित्रांचे अभिनदंन केले. 

अध्यक्षीय भाषणाद्वारे जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी चंद्रपुर जिल्हयातील सामजीक एकोप्याचे कौतुक करून आगामी उत्सवात देखील हा सामाजीक एकोपा असाच कायम राहील अशी उपस्थितांकडुन अपेक्षा व्यक्त केली. तसचे बहुतांश पोलीस मित्र वर्ग हा युवा असल्याचे निदर्शनात आणुन युवा वर्गाद्वारेच भविश्य बदलविणे शक्य होते त्या दृश्टीने प्रत्येक युवकाने सामाजीक बांधीलकी जापासत समाजाप्रति आपले कर्तव्य चोख बजवावे असे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान सन 2017 मधील उत्कृष्ट गणेश मंडळांना पारोतोषिके प्रदान करण्यात आले . यामध्ये निवडुन आलेल्या गणेश मंडळांना सिसीटीव्ही कॅमद्वारे देण्यात आले . यामध्येच चंद्रपूर उपविभागामधुन अर्थव गणेश मंडळ, आकाशवाणी चंद्रपूर यांना प्रथम, सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ उर्जानगर चंद्रपूर यांना द्वितीय तर जयहिंद गणेश मंडळ, 
बालाजी वार्ड चंद्रपूर यांना तृतीय पारोतोषिक देण्यात आले. या व्यतीरिक्त पोलीस उपविभाग वरोरा, ब्रम्हपुरी, मुल, राजुरा, गडचांदुर यामधुन सुद्धा प्रथम, द्वितीय, तृतीय यास्वरूपात पारोतोषिकांचे वितरण करण्यात आले. 
सदर पारोतोषिकांचे वितरण प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आले . सदर पोलीस मित्र बैठकी मध्ये कार्यक्रामचे अध्यक्ष म्हणुन डॉ. श्री. कुणाल खेमणार जिल्हयाधिकारी चंद्रपुर आणि प्रमुख उपस्थिती डॉ. श्री. महेष्वर रेड्डी पोलीस अधीक्षक चंद्रपुर, अपर पोलीस अधीक्षक श्री. हमेराजसिंह राजपूत यांच्या सह जिल्याचे, सर्व उप विभागिय पोलीस अधीकारी चंद्रपुर जिल्हा आदी उपस्थित होते. कायर्क्रमाचे संचलन पोलीस उपनिरिक्षक श्री. विकास मुंढे यांनी केले तर आभार प्रदर्षन परि. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मांडवे यांनी केले. कार्यक्रमादरम्यान पोलीस मित्रांकरीता प्रितीभोज सुध्दा आयोजन करण्यात आले होते.

गुरुवार, डिसेंबर १३, २०१८

बिग बीचा बिघडला मोबाईल

बिग बीचा बिघडला मोबाईल

महानायक अमिताभ बच्चन मुंबईला रवाना

नागपूर/ प्रतिनिधी
गेल्या पंधरा दिवसांपासून नागपुरात झुंज चित्रपट चित्रपटाच्या शूटिंगसाठी व्यस्त असलेले बिग बी महानायक अमिताभ बच्चन मुंबईला रवाना झाले. मात्र काल रात्री त्यांचा सामसंग मोबाईल बिघडला होता यासंदर्भात त्यांनी एक ट्विट करुन मोबाईल काम करीत नसल्याची तक्रार नोंदविली काही वेळानंतर त्यांच्या मोबाईल मध्ये दुरुस्ती झाली. नंतर लगेच त्यांनी पुन्हा ट्विट करून मोबाईल सुरु झाल्याची माहिती देखील फॉलोवर्सला दिलेली आहे.


बिग बिचा पहिला ट्विट सकाळी 9 वाजून 28 मिनिटानी आला.
T 3024 - HELP !! Samsung S9  not functioning .. Samsung logo is on front screen, and is blinking again and again .. nothing else happens .. changed it .. let it be .. tried to close it does not close either ..
HELP ... someone please guide me as to what I should de ..


लगेच मोबाईल सुरु झाल्यावर 2 मिनिटातच पुन्हा ट्वीट आला
T 3025 - PHEEWWWWW .. !! phone resolved .. SAMSUNG connected immediately after Tweet and all is well .. what a world we are living in .. I mean it was the most disturbed night of all nights .. why ..?? because the MOBILE had gone dead .. I mean WHAT ..??!!!
काल रात्री मुम्बईला गेल्यावर आज पहाटे 2 वाजून 28 मिनिटानी एक भावनिक पोस्ट केली होती. 

T 3024 - The most difficult task that a Father has to bear and perform, is when he has to give away his daughter .. in marriage !


एक पिता के लिए  सब से अधिक और कष्ट देह काम , अपने जीवन में, वो होता है जब उसे अपनी बेटी का 'कन्यादान' करना होता है !!

शुक्रवार, नोव्हेंबर २५, २०२२

बुधवार, सप्टेंबर ०७, २०२२

चंद्रपूर जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतीसाठी १३ ऑक्टोबरला मतदान | Chandrapur Election Grampanchyayat

चंद्रपूर जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायतीसाठी १३ ऑक्टोबरला मतदान | Chandrapur Election Grampanchyayat

६०८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ सप्टेंबरला मतदान
मुंबई : विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून 14 ऑक्टोबर 2022 रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, संबंधित तहसीलदार 13 सप्टेंबर 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्र 21 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील. शनिवार व रविवारच्या सुट्टीमुळे 24 व 25 सप्टेंबर 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी 28 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. मतदान 13 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. मतमोजणी 14 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. समर्पित मागासवर्ग आयोगाने शिफारस केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात या निवडणुकांसाठी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा देय आहेत.
विविध जिल्ह्यांत निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या: ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79. पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जव्हार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70. रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1. रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10. सिंधुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवगड- 2. नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71. नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81. पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1. सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6. कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1. अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम: वाशीम- 1. नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8. वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7. चंद्रपूर: भद्रावती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1. भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1. गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1. एकूण- 1,166.

सोमवार, एप्रिल १८, २०२२

चंद्रपूर शहरातील नामांकित सिनेमागृह झाले सील; कारण वाचून थक्क व्हाल

चंद्रपूर शहरातील नामांकित सिनेमागृह झाले सील; कारण वाचून थक्क व्हालSealed cinema halls in Chandrapur city


चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील नामांकित जयंत टॉकीज व्यवस्थापनाने यवतमाळ अर्बन को ऑपरेटीव्ह बँकेकडून पाच कोटी रूपयांचे कर्ज घेतले. मात्र कर्जाचे हफ्ते भरले नाही. बँकेने कर्ज भरण्यासाठी सांगितले मात्र त्यांनी दुर्लक्ष केले. यवतमाळ अर्बन बँकेने जप्तीची कारवाई करण्यासाठी जिल्हा न्यायालयात गेले . शेवटी जिल्हा न्यायालयाने जप्तीच्या कारवाईची नोटीस काढली. न्यायालयाचा बिलीप बँकेचे अधिकारी दुपारी जयंत टॉकीज येथे पोहचले. तिथे बँकेच्या अधिकाऱ्यांनी चित्रपटगृह जप्तीची कारवाई केली.
जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलीस बंदोबस्तात जयंत टॉकीजवर जप्तीची कारवाई करण्यात आली. दुकानदारांनी कारवाईला विरोध केला.
जयंत मामीडवार यांनी जयंत टॉकीज सुरू केली होती. त्यांच्या मृत्यूनंतर मुलगा जयेश मामीडवार यांच्याकडे चित्रपटगृह चालवीत होता. कोरोणाच्या काळापासून लॉक डाऊन ने टाकीज बंद होते. सध्या गेल्या काही दिवसापासून देखील सुरू झालेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये ही टॉकीज बंद करून शॉपिंग मॉल सुरू करण्याचे देखील व्यवस्थापनाने नियोजन केले होते. मात्र तसे झाले नाही. आर्थिक दिवाळखोरी आणि कर्जबाजारीपणामुळे आज झी टॉकीजवर जप्तीची कारवाई झाली आहे.चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत

Chandrapur Maharashtra India Brahmapuri Maharashtra Cinema hall seal the stage for the first assembly elections on road Chandrapur Maharashtra India Brahmapuri India Brahmapuri Maharashtra Cinema 📽️
Yavatmal Urban Co-operative
Yavatmal Urban Co-operative
Bank of India 
Bank of Baroda
Bank of Maharashtra

#KKRvsRR
#ThorLoveAndThunder
128K
#josbuttler
#अब_समझो_ज्ञान_क़ुरान
259K
Allah Kabir
263K
Jos the Boss
#HeroElectricJawaabDo
Sushant Charm Lives On
22K
Jane Foster
21K
Narine All Day Trending Today
Ansar
Justice 4 SSR Non Negotiable
#MondayMotivation
#WorldHeritageDay
#mondaythoughtsशुक्रवार, ऑक्टोबर १७, २०१४

19 ऑक्टोंबर रोजी होणार मतमोजणी

19 ऑक्टोंबर रोजी होणार मतमोजणी


प्रशासनाची जय्यत तयारी

चंद्रपूर दि.17- विधानसभेसाठी 15 ऑक्टोंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी रविवार 19 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8 वाजता सुरु होणार असून प्रत्येक विधानसभेसाठी 14 टेबल लावण्यात येणार आहेत. प्रशासनाने मतमोजणीची जय्यत तयारी केली असून मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात येणार आहे.
सहाही विधानसभा मतदार संघात खालील ठिकाणी मतमोजणी होणार आहे. 70-राजूरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूरा, 71-चंद्रपूर जिल्हा उद्योग भवन (नवीन इमारत) चंद्रपूर, 72-बल्लारपूर- उपविभागीय अधिकारी कार्यालय मूल, 73-ब्रम्हपूरी- शासकीय तंत्र निकेतन नागभिड रोड ब्रम्हपूरी, 74-चिमूर राजीव गांधी भवन तहसिल कार्यालय परिसर चिमूर व 75-वरोरा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वरोरा या ठिकाणी त्या त्या मतदार संघाची मतमोजणी होणार आहे.

मतमोजणीसाठी जिल्हयातील सहा विधानसभा मतदार संघासाठी एकूण 102 मतमोजणी निरीक्षक, 102 मतमोजणी सहाय्यक निरीक्षक, 112 सुक्ष्म निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहे. यात राजूरा-17 मतमोजणी निरीक्षक, 17 मतमोजणी सहाय्यक, 17 सुक्ष्म निरीक्षक, चंद्रपूर-16 मतमोजणी निरीक्षक, 16 मतमोजणी सहाय्यक, 19 सुक्ष्म निरीक्षक, बल्लारपूर-16 मतमोजणी निरीक्षक, 16 मतमोजणी सहाय्यक, 20 सुक्ष्म निरीक्षक, ब्रम्हपूरी-17 मतमोजणी निरीक्षक, 17 मतमोजणी सहाय्यक, 18 सुक्ष्म निरीक्षक, चिमूर- 18 मतमोजणी निरीक्षक, 18 मतमोजणी सहाय्यक, 20 सुक्ष्म निरीक्षक व वरोरा-18 मतमोजणी निरीक्षक, 18 मतमोजणी सहाय्यक, 18 सुक्ष्म निरीक्षक असे एकूण 316 अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.

जिल्हयातील सहाही निवडणूक निर्णय अधिकारी राजूरा- शंतनू गोयल, चंद्रपूर- संजय दैने, बल्लारपूर-रवींद्र खंजाजी, ब्रम्हपूरी-कु.दीपा मुधोळ, चिमूर-विजय उरकुडे व वरोरा- जे.पी.लोंढे हे आहेत.

गुरुवार 16 ऑक्टोंबर रोजी मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचा-यांची सरमिसळ निवडणूक निरीक्षक आणि जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांचे उपस्थित करण्यात आली. सर्व अधिकारी-कर्मचा-यांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी मतमोजणी केंद्रासमोर गर्दी करु नये तसेच शांतता व सुव्यवस्था राखावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

बुधवार, फेब्रुवारी २७, २०१९

शेततळयासाठी शासनाकडून मिळणार 50 हजारांचे अनुदान

शेततळयासाठी शासनाकडून मिळणार 50 हजारांचे अनुदान

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर/प्रतीनिधी:
Image result for शेततळे
 चंद्रपूर जिल्हयातील शेतक-यांना शेतीमध्ये सिचंनाची सुविधा निर्माण व्हावी म्हणून 13 प्रकारचे शेततळे तयार करण्याकरीता शासनाकडून 50 हजार रुपये इतके अनुदान प्राप्त होणार आहे. यासाठी शेतक-यांनी तालुका कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाकडून माहिती करुन घेण्यात यावी. यामध्ये ज्या शेतक-यांच्या नावावर कमीत कमी 0.60 हेक्टर जमीन व त्यापेक्षा अधिक जमिन असलेले शेतकरी सुध्दा योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहणार आहेत. परंतु यापूर्वी ज्या शेतक-यांनी शेततळे, सामुदायिक शेततळे अथवा भात खाचरा सोबत तयार होणारी बोडी या घटकांचा शासकीय योजनेमधून लाभ घेतलेला नसावा. 

या योजनेसाठी दारिद्रय रेषेखालील शेतकरी अथवा ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झालेली असेल त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये जेष्ठता यादीत घेऊन प्रथम प्राधान्याने निवड करण्यात येईल. या व्यतिरीक्त इतर सर्व प्रवर्गातील शेततळे मागणी करणा-या शेतक-यांची जेष्ठता यादी तयार करण्यात येवून त्यानुसार सदर योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामध्ये शेततळयाच्या आकारमानांनुसार देय होणारी अनुदानाची कमाल रक्कम 50 हजार इतकी असून यापेक्षा जास्त खर्च झाल्यास उर्वरित रक्कम संबंधीत लाभार्थ्यांला स्वत: भरावी लागणार आहे.

सदर शेततळयासाठी http://aaplesarkar.maharashtra.gov.in या वेबसाईटवर शेतक-यांनी ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहे. या योजनेच्या इतर माहितीसाठी कृषी सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करुन मोठया संख्येने शेतक-यांनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपूर यांनी आहे.

मंगळवार, मे २६, २०२०

तो भिंतीवरून उडी मारून आला शाळेच्या आत,अन क्वांरंटाईन असलेल्या मुलीचा पकडला हात

तो भिंतीवरून उडी मारून आला शाळेच्या आत,अन क्वांरंटाईन असलेल्या मुलीचा पकडला हात

तू मुझे अच्छी लगती है' म्हणत तरुणीची ...
चंद्रपूर(खबरबात):
ब्रम्हपुरी तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर असलेल्या नान्होरी  जिल्हा परिषदेच्या शाळेत इन्स्टिट्यूशनल क्वांरंटाईनमध्ये असलेल्या युवतीने गावातीलच एका इसमाने विनयभंग केल्याची तक्रार ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात दि २५ मे रोजी दाखल केली आहे त्यामुळे तालुक्यात खळबळ माजली असून वारंटाईन व्यक्तीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे  
 
१५ एप्रिलला पुणे येथून आली असल्याने गावातील शाळेत कारंटाईन केले   सदर युवती दि २४ एप्रिल रोजी सायंकाळी ७  वाजता शाळेतील नळावर हात-पाय धूत असताना आरोपी काकाजी प्रधान शाळेच्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून आतमध्ये प्रवेश केला आणि डात पकडून अश्लील चाळे व शिविगाळ केली.

यावेळी सदर युवतीच्या ओरडण्यामूळे विलगीकरणात असलेल्या बहिणीने व ईतर लोकांनी युवतीच्या दिशेने धाव घेऊन आरोपीला डटकले व ग्रामपंचायत चपराशी याने आरोपीला शाळेच्या बाडेर काढले त्यांनतर आरोपीने पळ काढला काही वेळाने सदर घटनेची घेऊन माहिती चुलत भावाला व सरपंच यांना माहिती होताच त्यांनी तात्काळ शाळेकडे धाव घडलेल्या प्रकरणाची शहानिशा करून आरोपीच्या घराकडे गेले असता आरोपी काकाजी प्रधान याने चुलत भावाला स्लासने मारहाण केली त्यामुळे चुलत भाऊ जखमी झाला. 

असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे याधारे ब्रम्हपुरी पोलिस ठाण्यात आरोपी काकाजी प्रधान यांच्याविरोधात कलम ९४,३२३,३५४,५०६ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९ गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ब्रम्हपुरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे करीत आहेत