Top News

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

  The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads

गुन्हा क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा
गुन्हा क्वेरीसाठी उपयुक्ततेनुसार क्रमवारी लावलेली पोस्ट दर्शवत आहे. तारखेनुसार क्रमवारी लावा सर्व पोस्ट दर्शवा

शनिवार, मे ०२, २०१५

 नागपूर  वार्तापत्र

नागपूर वार्तापत्र

 नागपूर  वार्तापत्र

 पळवून नेणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल:
हुडकेश्वर - दि. 30.04.15 चे 1400 वा चे सुमारास आरोपी येशु मोहल्लम गौरखेडे वय 28 वर्ष राइंदीरानगर,
जाटतरोडी नं 3, नागपूर याने पोस्टे हुडकेश्वर हद्यीत राहणा-या फिर्यादीच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फिर्यादीचे कायदेशिर रखवालीतून फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे हुडकेश्वर येथे सपोनि धाडगे यांनी आरोपीविरूध्द कलम 363 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

गंभीर दुखापत करणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल:
कोराडी/लकडगंज -  1) दि. 01.05.15 चे 1900 वा चे सुमारास फिर्यादी शंकर गणपतराव वगारे वय 50 वर्ष राभोकारा झोपडपट्टी नागपूर यांचा मुलगा सागर वय 22 वर्ष यास अल्पवयीन 17 वर्षीय आरोपी याने घरगुती
कारणावरून वाद विवाद करून भांडण झाल्याने पोस्टे कोराडी हद्यीत भोकारा ग्राम पंचायत जवळील ठाकरे
पाणठेल्याजवळ भाजी कापण्याचे चाकुने पोटावर मारून गंभीर जखमी केले. जखमीचा उपचार मेयो
हाॅस्पिटल येथे सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे कोराडी येथे पोउपनि
धानोरकर यांनी आरोपीविरूध्द कलम 326 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
 2) दि. 01.05.15 चे 2200 वा चे सुमारास आरोपी सागर शिवलाल यादव वय 22 वर्ष राइतवारी
रेल्वे स्टेशन जवळ, भारतीय आखाडयाजवळ, नागपूर याने पोस्टे लकडगंज हद्यीत इतवारी रेल्वे
स्टेशन जवळ, प्लाॅट नं 624, भारतीय आखाडयाजवळ राहणारा फिर्यादी बादल सुधाकर बरमकर वय 23 वर्ष
यास दारू पिला असे म्हटले. फिर्यादीने आरोपीस दारू पाजण्यास पैसे नाही असे म्हटल्यावरून आरोपीने
फिर्यादीस शिवीगाळ करून पाहुन घेण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी आपल्या घरी गेला असता
आरोपीने दि. 02.05.15 चे 0010 वा चे सुमारास फिर्यादीचे घरी जावून त्याच्या डाव्या मांडीवर चाकुने वार
करून गंभीर जखमी केले. जखमीचा उपचार रहाटे हाॅस्पिटल येथे सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी
दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे लकडगंज येथे सपोनि मोले यांनी आरोपीविरूध्द कलम 326,452,504,506 भादंवि
अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

 प्राणांतिक अपघात
कळमणा - दि 30.04.15 चे 1900 वा चे सुमारास फिर्यादी नितीन देवरावजी बेंद्रे वय 29 वर्ष रा. शारदा
चैक, बजरंग पार्क, कामठी यांचे वडील देवरावजी बेंद्रे व मिस्त्री मुनीवर भाई हे पोस्टे कळमणा हद्यीत
कापसी पुला समोरील हैद्राबाद कडे जाणा-या रोडवर ट्रक क्र एमएच 40/एल/1831 ची दुरूस्ती करित
असताना हिरो मॅजेस्टीक क्र एमएच/49/एल/3491 च्या आरोपी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन
निष्काळजीपने चालवून देवरावजी बेंद्रे व मुनीवर भाई यांना धडक मारून गंभीर जखमी केले. त्यांना
उपचाराकरीता तारांगण हाॅस्पिटल येथे भरती केले असता उपचारादरम्यान देवरावजी बेंद्र हे मरण पावले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे कळमणा येथे पोउपनि डेरे यांनी आरोपी चालकाविरूध्द
कलम 279,337,304(अ) भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

 हयगयीने मृत्युस कारणीभूत होणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल:
कळमणा -दि. 01.05.15 चे 1610 वा चे सुमारास आरोपी बजरंगीलाल जेठामल अग्रवाल वय 64 वर्ष रावर्धमान
नगर, राधाकृष्ण अपार्टमेंट, नागपूर यांनी आपल्या पोस्टे कळमणा हद्यीतील चिखली मेहता
काटयासमोर, अन्नपुर्णा फुड प्राॅडक्ट या कंपनीतील बेबे बाॅयलर ची काळजी नघेता हलगर्जीपनाने ते यंत्र
सुरू केल्याने त्याचा स्फोट होवून ते स्वतःचे मरणास व कंपनीत काम करणारे 1) भुवनेश्वर गोवर्धन देशमुख
वय 20 वर्ष रा. मांगली, जि. भंडारा 2) सचिन गौतम टे ंभेकर वय 18 वर्ष रा. हरदोली जि. बालाघाट 3)
प्रितीचंद बिसेन वय 42 वर्ष रा. दुर्गानगर, भरतवाडा 4) अनवर बिसेन वय 24 वर्ष रा. गांेदीया 5) अगनु
धनसिंग शाहु वय 45 वर्ष रा. डिप्टीसिग्नल 6) नंदलाल हेमराज भिमशाहु वय 19 वर्ष रा. छत्तीसगढ, नागपूर
यांचे जखमी होण्यास कारणीभूत झाला. याप्रकरणी पोस्टे कळमणा येथे पोउपनि ओऊळकर यांनी आरोपी
विरूध्द कलम 304(अ),337,338 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.

विनयभंग करणा-या आरोपींविरूध्द गुन्हा
सक्करदरा -  दि. 01.05.15 चे 1730 वा चे सुमारास 48 वर्षीय फिर्यादी यांचा फायनांन्स कंपनीचा व्यवसाय असून त्यांचेकडील फायनांन्सवर आरोपी क्र 1) अजगर नावाचा मुलगा याचे कडे थ्री सिटर अॅटो आहेफिर्यादी व त्याचे आॅफीसमध्ये काम करणारी मुलगी आॅफीसमध्ये हजर असताना आरोपी क्र 1 याने आपल्या इतर 5 ते 6 साथीदारांसोबत येवून शिवीगाळ करून फिर्यादीला हातबुक्कीने मारहाण केली. फिर्यादीचे
आॅफीसमध्ये काम करणा-या मुलीचा हात पकडून ओढले. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे
सक्करदरा येथे पोउपनि नैताम यांनी आरोपींविरूध्द कलम 143,147,149,323,504,452,354 भादंवि अन्वये
गुन्हा नोंदविला आहे.

मंगळवार, फेब्रुवारी ०५, २०१९

पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

नागपूर/प्रतिनिधी:


पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला (वय ४२) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर तिचे घर हडपून तिलाच धमकी देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध अखेर हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.राजेंद्र आनंदा मकदुम (वय ४२) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे (एपीआय) नाव असून, ते सध्या सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी ठाण्यात नियुक्त आहेत. 
हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून पीडित महिला गेल्या चार वर्षांपासून पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडे पायपीट करीत होती.अखेर चार वर्षानंतरच्या तिच्या संघर्षाला यश मिळाले आणि हुडकेश्वर ठाण्यात एपीआय सावंत यांनी सोमवारी मकदुमविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी वाडीतील पोलीस अधिकाऱ्याविरुद्धही बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

शुक्रवार, ऑगस्ट २७, २०२१

 वृध्द दांपत्याला मारहाण करणारी टोळी अटकेत |

वृध्द दांपत्याला मारहाण करणारी टोळी अटकेत |

Junner Crime Police


जुन्नर  /आनंद कांबळे 

ओझर येथील वृध्द दांपत्याला मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी २४ तासात अटक केली.  ओतूर पोस्टे गु.र.नं ३७९/२०२१ भादवि कलम ३९४ नुसार दिनांक २६/८/२०२१ रोजी गुन्हा दाखल झाला होता.

फिर्यादी शांताबाई बळवंत कवडे वय ७२( रा.ओझर ता. जुन्नर जि. पुणे )यांनी फिर्याद दिली की दि.२५/८/२०२१ रोजी रात्री ९.३० ते १० च्या दरम्यान फिर्यादी यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून त्यांना व त्यांच्या पतीला मारहाण करून फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले अश्या आशयाची फिर्याद दिली. 

सदर चा गुन्हा हा भरवस्तीत झाल्याने व अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने लवकरात लवकर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याच्या सूचना  पोलीस अधीक्षक  अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असता गोपनीय बातमीदारा मार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला बातमी मिळाली की गुन्हा घडले ठिकाणी शेजारी राहणारा इसम  समीर पवन सोनवणे हा गुन्हा घडले पासून त्या परिसरात दिसला नाही तसेच गुन्हा घडण्याच्या काही दिवस आधी तो अनोळखी इमसांसोबत फिरत होता.  त्याच्या विषयी अधिक माहिती घेतली असता त्याचे काही मित्र हे नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातील असल्याचे समजले.

 अधिक माहितीच्या आधारे समीर सोनवणे हा आज त्याच्या दोन साथीदारांसह मु.पो. आणे, ता. जुन्नर जि. पुणे येथे येणार असल्याचे समजले लागलीच त्या ठिकाणी सापळा लावून गुन्हे शाखेने समीर सोनवणे व त्याच्या इतर दोन साथीदार (विधी संघर्षित बालकांना) यांना पाटलाग करून ताब्यात घेतले.

    समीर सोनवणे याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने इसम नामे पावलस कचरू गायकवाड रा. खरवंडी, ता. पाथर्डी, जि.अ.नगर याच्या सांगण्या वरून व त्याने पाठवलेल्या साथीदारांना गुन्हा करण्याच्या ठिकाणची संपूर्ण माहिती समक्ष ओझर गावात फिरून दिली व त्यांच्या मदतीने हा जबरी चोरीचा प्रकार केल्याची कबुली दिली. 

पावलस गायकवाड हा नगर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जबरी चोरी, दरोडे सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सदर आरोपींची वैदकीय तपासणी करून पुढील कार्यवाही करीता ओतूर पोलीस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख , मा. अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, यांच्या सूचनेनुसार  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक   अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. नेताजी गंधारे, पो.हवा. हनुमंत पासलकर, पो.हवा. विक्रम तापकिर पो.हवा. दिपक साबळे, पो.हवा. राजू मोमीन, पो.ना. संदिप वारे, पो.कॉ. अक्षय नवले, पो.कॉ प्रसन्न घाडगे पो. कॉ. दगडू वीरकर,  यांनी केली आहे.

मंगळवार, फेब्रुवारी ०५, २०१९

पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

पोलीस निरीक्षकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

नागपूर/प्रतिनिधी:


पतीपासून विभक्त झालेल्या महिलेला (वय ४२) लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करणाऱ्या आणि नंतर तिचे घर हडपून तिलाच धमकी देणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाविरुद्ध अखेर हुडकेश्वर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.राजेंद्र आनंदा मकदुम (वय ४२) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे (एपीआय) नाव असून, ते सध्या सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी ठाण्यात नियुक्त आहेत. 
हा गुन्हा दाखल व्हावा म्हणून पीडित महिला गेल्या चार वर्षांपासून पोलीस अधिकारी, सामाजिक संस्था संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडे पायपीट करीत होती.अखेर चार वर्षानंतरच्या तिच्या संघर्षाला यश मिळाले आणि हुडकेश्वर ठाण्यात एपीआय सावंत यांनी सोमवारी मकदुमविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल होण्याची १५ दिवसांतील ही दुसरी घटना आहे. यापूर्वी वाडीतील पोलीस अधिकाऱ्याविरुद्धही बलात्काराचा गुन्हा दाखल झाला.

मंगळवार, फेब्रुवारी १३, २०१८

ठेकेदार शाहू  यांचेवर गुन्हा दाखल केल्याने अडामेंचे उपोषण समाप्त.

ठेकेदार शाहू यांचेवर गुन्हा दाखल केल्याने अडामेंचे उपोषण समाप्त.

राजेश शाहू यांचे उपोशण सुरूच
रामटेक तालुका प्रतिनिधी: 

रामटेक नगरपालीकेतील नगरसेवक रामानंद अडामे व  बाजार करवसुली ठेकेदार राजेष शाहू यांचेतील गेल्या अनेक महीन्यांपासुन सुरू  असलेला वाद आणखी चिघळला असून आज दिनांक 12 फेबु्रवारी 2018 पासुन  हे दोघेही रामटेक नगरपालीकेच्या आवारांत नगरपालीका प्रशासनाचे विरोधात त्यांनी  केलेल्या तक्रारीच्या अनुशंगाने एकमेकांविरूद्ध कारवाई करावी या मागणीसाठी  आमरण उपोशणाला बसले होते.
 मात्र रात्री 10 च्या सुमारास रामटेक  नगरपालीकेचे अग्निशमन अधिकारी अमित भा कावळे यांच्या दिनांक 12 फेबु्रवारी  2018 रोजी दिलेल्या तक्रारीवरून बाजार कर ठेकेदार राजेष शाहू यांचेवर भादवीच्या 406 कलमाखाली गुन्हा नोंदविण्यांत आला.अडामे यांची मागणी पुर्ण झाल्याने रात्री दहा वाजताच्या सुमारास त्यांनी नगराध्यक्ष दिलीप देषमुख यांचे हस्ते उपोशणाची सांगता केली यावेळी सभापती संजय बिसमोगरे,भाजपाचे नागपुर जिल्हा  उपाध्यक्षद्वय संजय मुलमुले,राजेष ठाकरे,नगरसेवक विवे तोतडे,आलोक मानकर,प्रविण मानापुरे व नगरसेविका वनमाला चौरागडे आदी उपस्थित होते. मात्र  राजेष शाहू यांनी यांनी त्यांचे उपोशण सुरूच ठेवले असून आपल्यावर जाणीवपुर्वक,सुडबुद्धीने व राजकीय दबावाखली उपरोक्त गुन्हा नोंदविण्यात आला  असल्याचा आरोप केला व जोपर्यंत आपल्या मागण्या पुर्ण होत नाहीत तोपर्यंत उपोशण करणार असल्याचे दिनांक 13/02/2018 रोजी सायंकाळी बोलाविलेल्या  पत्र परिषदेत  सांगीतले. एकाचवेळी दोघांनीही आमरण उपोशणाला बसण्याचा व तेही  एकमेकांचे विरोधात असा रामटेक नगरपालीकेच्या ईतिहासातील हा पहिलाच प्रसंग  ठरला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,रामटेक नगरपालीकेचे नगरसेवक रामानंद  अडामे यांनी बाजार करवसुली ठेकेदार राजेश शाहू यांच्या अनेकदा रामटेक नगरपालीका प्रशासनाकडे तक्रारी केल्या.बाजारकराच्या रकमांची कीती वसुली करावी  याबाबत नियमांना डावलून ठेकेदार मनमर्जी वसुली करीत असल्याने व अनेकांना
पैसे घेवून पावती न देणे,पैसे जास्तीचे घेणे व पावती कमी रकमेची देणे असे प्रकार घडत असल्याने त्यांचेवर कारवाई करावी असा आषय त्यातून व्यक्त  करण्यांत आला होता.रामानंद अडामे यांनी गेल्या कार्तीक पोर्णिमेच्या यात्रेच्या वेळी राजेश शाहू यांची माणसे बाजार कर वसुली करतांना त्यांना हटकले असता त्यांनी अडामे यांना मारहाण केली होती. दोन्ही बाजुंनी पोलीसांत तक्रारी झाल्या व दोन्ही  बाजुंवर पोलीसांनी विविध कलमाखांली गुन्हे नोंदविले होते. यानंतर अडामे यांच्या सततच्या तगाद्यामुळे नगरपालीकेने ठेकेदार शाहू यांचा बाजार कर वसुलीचा कंत्राट सर्वसामान्य सभेत रद्द करण्याचा ठराव केला होता मात्र राजेश शाहू यांनी त्यास जिल्हाधिकारी नागपुर यांचेकडे कलम 308 अन्वये आव्हान दिले व आठ दिवसांतच  जिल्हाधिकारी यांनी न.प.रामटेकचा तो ठराव रद्द करीत ठेकेदार शाहू यांना दिलासा  दिला होता.सदर कंत्राट हे 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 या कालावधीसाठी देण्यात आले असून सध्या राजेश शाहू हेच करवसुली करीत आहेत.यादरम्यान  रामटेक नगरपालीकेच्या स्थायी समीतीने शाहू प्रकरणांत दिलेल्या आदेषाविरूद्ध अपील करावे असे ठरले व त्यासाठी नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांना सर्वाधिकार  देण्यांत आले मात्र त्यांनी याबाबत कुठलीच कार्यवाही केली नसल्याचा आरोप अडामे यांनी यापुर्वीच केला होता. सदर प्रकरणांत राजेश शाहू यांचेवर पोलीसांत फौजदारी गुन्हा दाखल करावा व त्यांचे नाव काळया यादीत टाकावे अशी  अडामे यांची मागणी होती व या मागणीची पुर्तता झाल्याने त्यांनी आपले आमरण उपोशण रात्री उशीरा सोडले.
आपल्या विरूद्ध कुणाचीही तक्रार नसतांना केवळ सुडबुद्धीने रामानंद अडामे हे एकमेव नगरसेवक आपली वारंवार तक्रार करीत आहेत.नगरपालीकेचेबाजार कर वसुलीचे कंत्राट आपण सर्वोच्च बोली लावल्याने आपल्याला मीळाले आहे व त्याबाबतचा करारनामा नगरपालीकेसोबत करण्यांत आला आहे.या करारनाम्यात
नमूद अटी व शर्तीच्या आधिन राहुनच आपण करवसुलीचे काम करीत आहोत मात्र वेळोवेळी अडामे हे आपल्याला त्रास देतात असा आरोप राजेश शाहू यांनी केला आहे.रामटेक नगरपालीकेचे सदस्य असतांना त्यांनी आपल्या घराचे बांधकाम  शासनाच्या जागेवर अतिक्रमण करून नगरपालीकेची कुठलीही परवानगी न घेता
सुरू केले आहे त्यामुळे त्यांचेवर पोलीसांत गुन्हा नोंदवावा व लोकप्रतिनिधी कायद्यान्वये त्यांचेवर कार्यवाही करावी असा अर्ज शाहु यांनी नगरपालीका प्रशासनाकडे केला आहे.
 मात्र न.प.प्रशासनाने याबाबत अद्याप कुठलीच कार्यवाही न  केल्याने आपणही दिनांक 12 फेबु्रवारी 2018 पासून रामटेक नगरपालीका कार्यालयाच्या आवारांत आमरण उपोशणाला प्रारंभ केल्याचे राजेष शाहू यांनी यावेळी सांगीतले.मात्र करारनाम्यात कुठल्याही प्रकारची पोलीस कारवाई नगरपालीका प्रस्तावीत करू शकेल अशी  अट नसतांना केवळ रामानंद अडामे यांच्या राजकीय  दबावामुळे आपल्याविरूद्ध नगरपालीकेचे कर्मचारी अमित कावळे यांनी पोलीसांत तक्रार करणे व पोलीसांनी 406 अन्वये गुन्हा दाखल करणे हे चोर सोडून संन्यासाला फाशी देण्यासारखे असल्याचे शाहु यांनी यावेळी बातमीदारांशी बोलतांना स्पष्ट  केलेल्या करारनाम्याप्रमाणे मी ठेकेदार म्हणून  कुठल्याही अटीचा भंग केला तर माझे कंत्राट रद्द करण्याचा अधिकार  नगरपालीकेला आहे.त्यांनी माझे सदरचे कंत्राट रद्द करण्याची कारवाई केलेली आहे.या कारवाईस नियमाप्रमाणे आपण जिल्हाधिकारी,नागपुर यांचेकडे आव्हान दिले  व त्यांनी नगरपालीकेचा तो ठराव रद्द केला आहे व कंत्राट पुर्ववत ठेवण्याचे आदेश नगरपालीका प्रशासनाला दिले आहेत.माझी पोलीसांत तक्रार करण्याचा नगरपालीका प्रशासनाला मुळात अधिकारच नसल्याचा दावा शाहु  यांनी बातमीदारांशी  बोलतांना केला.
मुख्याधिकारी काय म्हणतात...
उपरोक्त प्रकरणी रामटेक नगरपालीकेचे मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले यांनी सांगीतले की नगरपालीकेने दोघांच्याही तक्रारींवर योग्य ती कार्यवाही केली आहे. शाहू यांचेविरोधात रामटेक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यांत आली असून याबाबतची सर्व कागदपत्रे देवून त्याअनुशंगाने फौजदारी गुन्हा होत असल्यास तसे करावे असे
नमूद करण्यांत आले होते. त्याबाबत पोलीसांनी कारवाई करावयाची होती ती पोलीसांनी केली आहे. रामानंद अडामे यांनी जे बांधकाम सुरू केले आहे त्याची चौकशी करण्यात आली असून त्यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केले आहे व  नगरपालीकेची कुठलीही बांधकामासाठी परवानगी घेतलेली नसल्याने नियमानुसार
त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. व याबाबत आवश्यक  व कायदेशीर कारवाई  नक्कीच केली जाणार असल्याचे सांगीतले.

रविवार, जून १४, २०२०

अरविंद बन्सोड हत्या प्रकरण : थडीपवनी पुन्हा गाजते..

अरविंद बन्सोड हत्या प्रकरण : थडीपवनी पुन्हा गाजते..




थडीपवनी तेव्हा महापुराने गाजली.२९ वर्षानंतर बौध्द तरूण अरविंद बन्सोड हत्येने गाजत आहे. घटना घडली २७ मे-२०२० रोजी. आवाज गाजतो जूनच्या प्रारंभी. माणसाचा जीव कवडीमोल झाला. कोणीही यावे. निर्दयीपणे एकाद्याला खल्लास करावे. काय होता त्याचा दोष. सिलेंडर गोदामाचा फोटो काढणे. फोटो काढण्याची ही राक्षसी शिक्षा.वाटत नााही. चार-पाच तरूण असे काही करतील.पण हे घडले. सत्य की अर्धसत्य हे तपासात उघडकीस येईल. सीसी टिव्ही पुरावे नष्ठ करण्याची चर्चा आहे. त्यावरून संशय बळावतो. ' कर नाही त्याला डर कशाचा ' असं म्हणतात. मात्र डर आहे म्हणून एकएक पुरावा नष्ट तर केला जात नसेल.

 ज्या पध्दतीने आरोपींनी घटना सांगितली. त्यास सीसी टीव्ही दृश्य सबळ पुरावे ठरले असते. त्यांचे निर्दोषत्व सिध्द करता आले असते. आरोपींच्या मते अरविंद विषारी औषधी घेवून आला. तुमच्या मारहाणीमुळे अपमान झाला. त्या कारणाने विष पितो म्हणत जहर प्याला. हा प्रकार  गँस सिलेंडर एजेन्सीच्या  थडीपवनी कार्यालयात घडला. त्याच कार्यालयात अरविंद बन्सोड व गजानन राऊत यांना मारहाण झाली. तेव्हा ग्राहक असतील  तर एक-दोन किंवा चार. ते सुध्दा थडीपवनीचे. ओळखीचा कोणी नाही. तरी अपमान कसा झाला. आत्महत्येस प्रवृत्त करेल असा अपमान वाटत नाही. आरोपींची स्टोरी कुछ हजम नही होती .पण  हे त्यांना सिध्द करावे लागेल.

काही मिनिटात गेम

गजानन म्हणतो. त्या मारहाणीनंतर आम्ही गावी जाण्याचे ठरविले.  तेव्हा अरविंद म्हणाला, तु पेट्रोल भरून ये. एकदा मोबाईल मागून बघतो. लगेच पेट्रोल भरून आलो.  बघतो तर मयूर  व त्याचे साथीदार अरविंदला कारमध्ये कोंबताना दिसले. मी घाबरलो. मला येवू दिले नाही. त्यामुळे मी तडक गाव  गाठले. बघितलेला प्रकार  सांगितला. लगेच धिरजसोबत जलालखेड्याकडे  निघालो. काही मिनिटांतच नेमके काय घडले असावे. त्याचा अंदाजच येत नव्हता.

आपबिती सांगितली...

मृतकाचा धाकटा भाऊ धिरज बन्सोड याने सांगितले. घटनेची माहिती कळताच जलालखेड्यातील आरोग्य केंद्रात  पोहचलो. तेव्हा सांगण्यात आले. काटोलच्या रूग्णालयात पाठविले. लगेच तिकडे रवाना झालो. तिथे पोहचलो. तेव्हा रूग्णवाहिकेत टाकण्यात आले. दुपारचे दोन अडीज वाजले असावेत. मी डोक्याकडे व गजानन पायाकडे बसला. आरोपी रूग्णालयातच  होते. मयूरला ओळखतो. त्यांच्यासोबत कारमध्ये तीन-चार जण होते. वाटेत अरविंदला घटनेची माहिती विचारली. तेव्हा सांगितले. चौघांनी  मारले. मला विष पाजले. छातीला सारखा हात लावत होता. बटन काढून बघितले.तर सूज दिसली. कातडी लाल होती. रूग्णवाहिका नागपुरात पोहचली. तेव्हा चार वाजले असावेत. मेडिकलच्या आयसीयू वाँर्ड १४, बेड ९ वर दाखल केले. डाँक्टरांनी लघवीची पिशवी व सलाईन लावले. रात्री ११ वाजता श्वास घ्यावयास त्रास होत असल्याचे म्हणाला. आम्ही डाँक्टरकडे धावलो. माहिती देताच डाँक्टर, नर्स आल्या. त्यांनी कृत्रिम श्वास यंत्र लावला. हे सांगताना त्याला हुंदका आला. थोड्या वेळाने अरविंद  बेशुध्द झाला. त्यानंतर बोलला नाही. २८ मे रोजी वडील जनार्धन आले. त्यांचे बोलणे झाले नाही. अरविंदच्या डोळ्यावर कापडी पट्या ठेवल्या होत्या.त्या कारणाने नजरानजरही झाली नाही.

ते चार तास...

धिरज म्हणतो, अरविंद याचा थडीपवनी, जलालखेडा ,काटोलपर्यंचा प्रवास  आरोपींसोबत झाला. कारमध्येच त्याला विष पाजले असावे.  छातीवर मारले . तो जिवंत राहू नये असाच आरोपींचा प्रयत्न होता. त्यांचे हावभाव तसेच होते. तो वाचला तर बिंग फुटेल अशी त्यांना भीती वाटत असावी.
मी  ठाण्यात तक्रार करण्यास गेलो. तेव्हा तक्रार नोंदवून घेतली नाही. किशोर गेला. त्याची तक्रार घेतली. त्याला जास्त काही समजत नाही. कशीतरी सही करताे. त्याने तक्रारीची काँपी मागितली. ती दिली नाही. आमचे कोणाचेही बयाण नोंदवून घेतले नाही. तोपर्यंत बन्सोड यांच्या घरी बरेच लोक गोळा झाले. ते सर्वच शोकाकूल दिसले. किशोर बाहेर गेला होता. त्यामुळे त्यांच्यासोबत  बोलणे झाले नाही.
जनार्धन बन्सोड म्हणाले, मुलगा कधीच कोणासी भांडला नाही. गावाची ३५० वर लोकवस्ती आहे. गावातील कोणी काम सांगितले. तर तो एेकत होता. गावातील एकाचा गँसचा नंबर लावण्यास मित्रासोबत थडीपवनीला गेला होता. हे सांगताना त्यांचे डोळे पाणावले.

समता सैनिक दल

जलालखेडा पोलिसांची  गुन्हा नोंदविण्यात टाळाटाळ केली. हे कळताच समता सैनिक दलाचे काही कार्यकर्ते नागपुरात एकत्र आले. त्यांनी ८ जूनला दुपारी  जलालखेडा गाठले. पोलिस स्टेशन समोर गर्दी वाढली. सायंकाळी अंधार वाढू लागताच गर्दी आणखी  वाढली. अनिकेत कुत्तरमारे व सहकाऱ्यांनी  घोषणा केली. अँट्रासिटीतंर्गत गुन्हा दाखल होत नाही. तोपर्यंत आम्ही हटणार नाही. रात्री १२ नंतर आणखी सैनिक येतील. या शब्दात बजावले. तिथेच ठिय्या ठोकला. फोनाफोनीनंतर हालचाल वाढली. रात्री ८ वाजून ५ मिनिटाच्या ठोक्याला अँट्रासिटीतंर्गत गुन्हा नोंदविला. खात्री पटल्यानंतर रात्री १० वाजता ठिय्या संपला. आरोपींच्या  विरोधात अँट्रासिटीतंर्गत गुन्हा २७ मे रोजीच  दाखल करावयास हवा होता. तब्बल ११ दिवस टोलवाटोलवी चालली. त्यातून आरोपींना पळून जाण्यास मदत झाली. ठाणेदार कर्तव्यास जागले नाही. उलट पुरावे नष्ट करण्यास संधी दिली.  त्यामुळे ठाणेदाराला सह आरोपी करावे. तातडीने निलंबित करावे अशी मागणी आहे.

होतकरू गमावला

अरविंद एम.ए.झाला होता. एमपीएससीची तयारी करीत होता. कोरानामुळे परिक्षा पुढे ढकलली. हा होतकरू तरूण गमावल्याचं दु:ख  आहे. पोलिसांनी व डाँक्टरांनी तत्परता दाखविली असती. तर प्राण वाचले असते. हे तेवढेच खरे. पोलिस असे का वागले ? हे कोडे आहे. तपासात ते उघडकीस येईल. त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. अरविंद आरोपींच्या ताब्यात सकाळी ११ वाजेपासून २ वाजेपर्यंत होता. तरी पोलिस जागचे हलले नाही. नातेवाईकांचे ऐकलं नाही. एका फोनवर पोलिस धावून जातात.हा समज खोटा ठरला. या प्रकरणात नातेवाईक ठाण्यात जावूनही पोलिस ढिंम्मच राहिले. अखेर पोलिसांचा नांद सोडून नातेवाईकांनी दवाखान्याकडे धाव घेतली. कोटाल हे तालुक्याचे ठिकाण . तिथेही विषबाधेवर उपचार नाही. नागपूरकडे धाव घ्यावी लागली. यात पुन्हा  दोन-अडीच तास गेले.आरोग्य व्यवस्था व उपचाराचीही चौकशी व्हावी. जेणे करून भविष्यात उपचारा अभावी कोणाचा जीव जाणार नाही. त्या ४८ तासातील आरोपींचे  काँल्स डिटेल्स तपासले. तर बरेच काही हाती लागेल.

  पिंपळदरा  हे अरविंदचे गाव. थडीपवनीपासून ५ किलोमीटर अंतरावर आहे. तर जलालखेडा पोलिस स्टेशन १६ किलोमीटर दूर आहे.  मारहाणीनंतर वैद्यकीय  तपासणी करावयास हवी होती. ती करण्यात आली नाही. मृत्यूपूर्व  बयाण नोदविला नाही. या घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना देण्यात आली. तेव्हा त्यांनी या प्रकरणात  अनुसूचित जाती अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले नाहीत. हे  न करता आयपीसीच्या कलम ३०६ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. यावरून  पोलीस अधिक्षकही चौकशीच्या फेऱ्यात अडकतील.

१६ जूनकडे लक्ष...

छायाचित्रावरून हत्या झाली. मयूर उंबरकर गँस एजेन्सी चालवतो. त्याचे सिलेंडर गोदाम भरवस्तीत आहे. ते नियमाला धरून नाही. मोबाईलने छायाचित्र काढले . सोबत त्याचा मित्र गजानन होता. त्यांचा मोबाईल हिसकला. कार्यालयात नेले. तिथे मारहाण केली. त्यातून हे प्रकरण वाढले. हा मतदार संघ राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा आहे.  दडपण वाढले आहे. आरोपींचा १६ जूनपर्यंत जामीन आहे. आता अँट्रासिटीतंर्गत गुन्हा नोंदविल्याने जामीन रद्दची शक्यता आहे.माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी पीसीअार  विभागाचे महाआयुक्त खालिद कैसर यांना १२ जूनला फोन लावला. दुसऱ्या दिवसी  नांदेड येथून एसपी अपर्णा गिते जलालखेड्यात पोहचल्या. सर्वांचे मँजिस्टेड समोर बयाण नोंदवा असे आदेश ठाणेदाराला दिले. काहींना ठाण्यात बोलाविले. काही स्थळांची पाहणी केली. त्यांच्या आगमनाने ग्रामीण पोलिस हादरलेत.

२९ वर्षानंतर....

३० जुलै-१९९१ला जाम नदीला महापूर आला. या महापूराचा मोवाडसह अनेक गावांना फटका बसला होता. त्यात २५० लोक वाहून गेले होते. थडीपवनीत इंगळे गुरूजी होते. त्यांनी अनेकांना वाचिवले. वृृत्त संकलनास फिरताना तेव्हा  थडीपवनी परिसरात पुराचे अडथळे  जाणवत होते. त्याच भागात २९ वर्षानंतर पुन्हा जावे लागले. आता कोरोना टाळेबंदीचे अडथळे जाणवले. माणसांना भेटताना दोन्ही बाजूंनी कोरोनाचा तणाव स्पष्ट जाणवत होता. तेव्हा जीव वाचविणाऱ्यांची चर्चा होती. आता जीव घेणाऱ्यांची चर्चा. हे हत्या प्रकरण गाजणार आहे. जलद कारवाई हाच उपाय आहे. तपासाला योग्य दिशा व गती द्यावी. विषाची बाटली. कृषी केंद्रातून आली. ते केंद्र कोणाचे. कोणी आणली. पावती केव्हा फाडली. कोणाच्या नावाने फाडली.ते दुकान सील झालं काय ? कागदपत्र ताब्यात घेतले काय? तर कालपर्यंत नकारघंटा होती. सिलेंडर दुकानात सीसी टिव्ही कँमेरे होते काय? कोणी लावले. केव्हा काढले. पुरावे आहेत की नष्ट केले. मोबाईल काँल्स डिटेल्स अन् बरेच काही.१५ दिवसानंतरही पोलिसांच्या हाती नाहीत. 

भूपेंन्द्र गणवीर, ज्येष्ठ पत्रकार 
............BG............

रविवार, मार्च ०९, २०१४

दारु पिऊन मतदान केंद्रात येणा-या  दोन केंद्र अधिका-यावर गुन्हा दाखल

दारु पिऊन मतदान केंद्रात येणा-या दोन केंद्र अधिका-यावर गुन्हा दाखल


मतदार नोंदणी कार्यक्रमात जिल्हाधिका-यांची धडक कारवाईबल्लारपूर मुख्याधिका-यास कारणे दाखवा नोटीस
 चंद्रपूर-09- मतदार नोंदणी विशेष कार्यक्रमादरम्यान बल्लारपूर येथील दोन मतदान केंद्रावर दारु पिऊन आलेल्या मतदान केंद्र अधिका-यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिले.  तसेच बल्लारपूर येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहुरवाघ पूर्व परवानगी न घेता मुख्यालयी अनुपस्थित राहिल्यामुळे आपल्यावर गुन्हा दाखल करुन शिस्तभंगाची कारवाई  का करु नये असे नोटीस जिल्हाधिका-यांनी त्यांना बजावली. 
    भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रविवार 9 मार्च 2014 रोजी जिल्हाभरात मतदार नाव नोंदणी विशेष कार्यक्रम राबविण्यात आला.  जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी बल्लारपूर येथील काही केंद्राना अचानक भेटी देवून मतदार नोंदणी कार्यक्रमाची तपासणी केली.  या दरम्यान जनता हायस्कुल डेपो साईबाबा वार्ड बल्लारपूर येथील केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी जगदिश कांबडे व 215 जनता विद्यालय सिटी ब्रँच बल्लारपूर येथील मतदान केंद्र अधिकारी अतुल दुधलकर हे दारु पिऊन मतदान केंद्रात आल्याची माहिती मिळताच जिल्हाधिका-यांनी त्यांची वैद्यकीय तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.  त्यानुसार बल्लारपूर पोलीसांनी गुन्हे दाखल केले.
     थापर हाऊस येथील मतदान केंद्राची तपासणी करतांना मतदार यादीत नाव नोंदणी करण्यासाठी भरुन देणा-या नमुना अर्ज क्रमांक सहा सोबत जोडलेल्या को-या रहिवाशी प्रमाणपत्रावर नगरसेवकाची स्वाक्षरी व शिक्का होता मात्र ज्यांना दाखला दिला त्याचे नाव दाखल्यावर नसल्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देशनास आले.  यावरुन थॉपर हाऊस येथील मतदान केंद्र अधिकारी रमेश पवार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.  सदर दाखला जप्त करुन चौकशी करण्याचे आदेश तहसिलदारांना दिले. 
     जनता हायस्कुल डेपो येथील केद्र अधिकारी जगदिश कांबडे व जनता विद्यालय येथील केंद्र अधिकारी अतुल दुधलकर हे दारु पिऊन केंद्रात आल्याची माहिती तहसिलदार बी.डी.टेळे यांनी जिल्हाधिका-यांना दिली.  यावर दोन्ही केंद्र अधिका-यांची वैद्यकीय तपासणी करुन गुन्हा दाखल करण्याचे निर्देश म्हैसेकर यांनी दिले.  यावरुन दोन्ही केंद्र अधिका-यावर गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसिलदार बी.डी.टेळे यांनी दिली.
 बल्लारपूर नगर परिषेदेचे मुख्याधिकारी गुणवंत वाहुरवाघ हे मुख्यालयी हजर नसल्याचे    जिल्हाधिका-यांचे निर्देशनास येताच निवडणूक कामामध्ये हयगय केल्याने आपल्यावर गुन्हा दाखल करुन शिस्तभंगाची कारवाई का करु नये अशी नोटीस वाहुरवाघ यांना बजावण्यात आली.  दरम्यान जिल्हाधिका-यांनी दुरध्वनीवरुन वाहुरवाघ यांची चांगली कान उघाडणी केली.  कोणाच्या परवानगीने मुख्यालय सोडले हे लेखी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.  सोमवारी सकाळी 10 वाजता प्रत्यक्ष भेटून लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश वाहुरवाघ यांना दिले. 
     मतदार शिक्षण व सहभागाच्या पध्दतशिर कार्यक्रमाअंतर्गत आज जिल्हयातील सर्व मतदान केंद्रावर मतदार नोंदणीस नवयुवक व महिलांनी भरघोष प्रतिसाद दिला.  मतदार यादीत नाव असल्याची खात्री करुन घेणे व त्यानंतर अर्ज नमुना सहा भरुन देण्यासाठी सर्वच केंद्रावर नागरिकांनी गर्दी केली होती.  जिल्हाधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर यांनी चंद्रपूर, बल्लारपूर व राजूरा तालुक्यातील मतदान केंद्रांना भेटी देवून पाहणी केली.  यावेळी त्यांचेसोबत बल्लारपूर तहसिलदार बी.डी.टेळे हे होते.

रविवार, नोव्हेंबर १७, २०१९

पोलिस शिपायाने पिण्यासाठी अर्धा बंपर दारू पकडली

पोलिस शिपायाने पिण्यासाठी अर्धा बंपर दारू पकडली

 

पोलिस कंट्रोलला आरोपीने फोन केल्यानंतर केला गुन्हा दाखल


चंद्रपूर/प्रतिनिधी
जिल्ह्यात दारू बंदी चा फायदा जर कोनाला झाला असेल तर अर्थातच तो मोठ्या प्रमाणांत पोलिसांचा झाला आहे.दररोज लाखो रुपयाची दारू पकडल्या जाते मात्र ती कमी दाखवून काही पोलिस कर्मचारीच पकडलेली दारू अवैध दारू व्यवसायीना विकत असल्याचा विषय चर्चील्या जात आहे.अशातच काही पोलिसवाले तर एका दारूच्या बंपरसाठी किंव्हा एका पव्व्यासाठी सुद्धा गुन्हे दाखल करतात तर काही पोलिसवाले दारू जप्त करून ती स्वतःच गटकतात असे अनेक प्रकार समोर येत आहे.
असेच एक प्रकरण वरोरा पोलिस स्टेशन अंतर्गत नंदोरी टोलनाक्यावर दिनांक ११ नोव्हेंबरला सकाळी ५,३० वाजता घडली असून वरोरा पोलिस स्टेशन मधे डीबी पथकात कार्यरत निखिल कौरासे व इतर दोन ते तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी उमेश देशमुख यांच्या चार चाकी गाडीतून रॉयल चैलेण्ज नावाच्या इंग्लिश दारूचा अर्धा बंपर पकडल्या नंतर तो स्वतःसाठी प्यायला ठेवला असल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र उमेश देशमुख यांनी पोलीसानी आपल्यावर करवाई न करता अश्लील आणि अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून अपमानित झाल्यामुळे पोलिस शिपाई कौरासे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांची पोलिस कंट्रोल रूम (१००) मधे तक्रार केल्यानंतर आता आपले विंग फुटून आपल्यावर करवाई होणार या भितीने सूडबुद्दीने तक्रारकर्त्या उमेश देशमुख यांचेवर तब्बल १२ तासानंतर गुन्हा नोंद केल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस शिपाई निखिल कौरासे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केल्यामुळे आपले विंग फुटताच आपल्या खाकी वर्दीचा दुरुपयोग करून सर्वसामान्य व्यक्तीवर पोलिस कसे छडयंत्र रचतात हे या घटनेवरून दिसून येते.
उमेश देशमुख हे पोहाणे ले आऊट बोर्डा येथील रहिवासी असून ते एक सामजिक कार्यकर्ते आहेत. त्यांच्या विरोधात आजपर्यंत कुठल्याही पोलिस स्टेशन मधे कोणत्याही प्रकारची पोलिस केस नाही, अशा सामजिक कार्यकर्त्यांनी एक अर्धा बंपर दारू बाळगणे हा गुन्हा जरी असला तरी तो त्यांनी कबूल सुद्धा केला होता, पण निखिल कौरासे हा वरोरा येथील स्थाईक असून त्याला त्याच्या मूळ गावी कार्यरत ठेवणे नियमबाह्य आहे,  कारण त्यांचे वरोरा येथील अवैध धंदेवाईक यांच्यासोबत चांगले संबध असल्यामुळे एखादी पोलिस धाड जरी पडली तरी हा पोलिस शिपाई अगोदरच ती माहिती समन्धित अवैध व्यावसायिकांना पोहचवीतात त्यामुळे पोलिसांच्या कारवाईला महत्वच उरत नाही त्यामुळे निखिल कौरासे यांची अनेकदा बदली झाली असतांना सुद्धा त्यांना वरोरा येथेच का ठेवन्यात येत आहे ? हे कोडे अजूनपर्यंत कुणालाच सोडवता आले नाही.खरं तर निखिल कौरासे आणि त्यांच्या इतर पोलिसांच्या मनात उमेश देशमुख प्रकरणी चोर लपला असल्याने व यांना वाटंमारी करण्याची सवय असल्याने यांनी अर्धा बंपर दारू स्वतःला पिण्यासाठी ठेवली होती हे आता शीद्ध होतं आहे. कारण 
निखिल कौरासे हे त्याच दिवशी त्यांचे मित्र रूयारकर यांच्या अंत्यसंस्कार यात्रेत दारू पिऊन असल्याचे अनेकांनी परस्पर चर्चेतून समोर आले आहे. अर्थात पोलिसच दारूडे असेल तर सर्वसामान्य जनतेने दारू पिणे हा गुन्हा कसला ? हा प्रश्न सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे.कारण जे स्वतःच चोर असेल तर चोराला पकडण्यापेक्षा चोराला असे पोलिस कर्मचारी चोरी करण्यास मदतच करीत असेल आणि ही बाब आता वरील प्रकरणावरून शीद्ध सुद्धा होतं आहे.
सामजिक कार्यकर्ते उमेश देशमुख यांनी आपला गुन्हा कबूल केल्यानंतर सुद्धा त्यांना काल शनिवार पर्यंत पोलीसानी अटक न करता त्यांच्या मित्रांकडे निखिल कौरासे हा पोलिस शिपाई  ' त्या उमेश देशमुखला मी आता कसा पीसीआर घेऊन झोडपून काढतो तेच त्यांनी बघाव, मी त्याला वरोरा येथे राहणे मुश्किल करून टाकीन' अशा प्रकारच्या धमक्या देवून ऐन शनिवारला उमेश देशमुख यांना अटक करण्याचे कारस्थान रचले होते मात्र उमेश देशमुख यांनी अगोदरच त्यांचे कारस्थान उलटे पाडून सरळ जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय गाठले आणि तक्रार देवून निखिल कौरासे व इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी सूडबुद्दिने करवाई केल्याबद्दल त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.त्यामुळे आता वरोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक हे काय करवाई करतील याकडे वरोरावाशीयांचे लक्ष लागून आहे.

रविवार, ऑक्टोबर ०२, २०२२

1 लाख मागितले; पोलिस उपनिरीक्षक व वकिलावर गुन्हा दाखल

1 लाख मागितले; पोलिस उपनिरीक्षक व वकिलावर गुन्हा दाखल



जुन्नर /आनंद कांबळे
जुन्नर पोलिस ठाण्यामध्ये भा.द.वि कलम 376 , 417 प्रमाणे दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये मदत करतो यासाठी पोलिस उपनिरीक्षक व त्यांच्या वतीने वकिलांनी 1 लाखांची लाचेची मागणी करीत लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी दाखल फिर्यादीनंतर या दोघांविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे च्या वतीने शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जुन्नर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक अमोल साहेबराव पाटील आणि केतन अशोक पडवळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडवळ हे जुन्नर वकील बार असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. पंकज डोके रा ओतूर यांनी फिर्याद नोंद केली आहे. 2021 मध्ये या शेतकऱ्यावर भा.द.वि. कलम 376 , 417 प्रमाणे जुन्नर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून ब फायनल मंजुरी साठी दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा काही त्रुटींवर परत पोलिस ठाण्यात आला होता. तपास अधिकारी पाटील यांनी 164 प्रमाणे जबाब घेतला असून यामध्ये वाढीव कलमांचा समावेश होऊ शकतो. तसे न होण्यासाठी 1 लाख रुपये द्या. अशी वारंवार मागणी करीत होते. त्यांच्या वतीने वकील पडवळ यांनी मध्यस्थी करण्याची तयारी दाखविली होती. लाचेची रक्कम देण्याची तयारी डोके यांची नसल्याने याबाबत ची तक्रार त्यांनी पुणे कार्यालयात नोंदवली. 1 लाख देण्याची तयारी न करता तडजोडीने 50 हजार रुपये देण्याची तयारी ठेवून त्यामधील 25 हजार आत्ता लगेच तर 25 हजार पुढील महिन्यात देण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. लाच लुचपत विभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकाने जुन्नर मध्ये येऊन शनिवार दि 1 रोजी सापळा रचला. अमोल पाटील यांना संशय आल्याने त्यांनी रक्कम स्वीकारली नाही. पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये मदत करतो. यासाठी पोलिस उपनिरीक्षक व त्यांच्या वतीने वकील केतन पडवळ यांनी 1 लाख रुपयांची लाच मागणी करून लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केला. म्हणून या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक पाटील हे पाच सहा महिन्यांपूर्वीच जुन्नर पोलिस ठाण्यात रुजू झालेले होते. तर जुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून पडवळ हे कार्यरत आहेत. या दोघांवर दाखल झालेल्या या प्रकरणामुळे जुन्नर मध्ये खळबळ उडाली आहे.

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

विस्तार अधिकारी पाटील यांचेवर विनयभंग, अॅट्रासीटी गुन्हा

विस्तार अधिकारी पाटील यांचेवर विनयभंग, अॅट्रासीटी गुन्हा


आदिवासींच्या विविध संघटनांचा पोलीसांवर मोर्चा

रामटेक/ प्रतिनिधी- रामटेक पंचायत समीतीचे विस्तार अधिकारी (पंचायत) सी.एम.पाटील यांचेवर विनयभंग व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी दिनांक 16/11/2017 रोजी रामटेकच्या पोलीस ठाण्यावर आदिवासी संघटनांनी मोर्चा नेला.
रामटेक पंचायत समीतीचे लंपटबाज विस्तार अधिकारी (पंचायत) सी.एम.पाटील यांचेवर विनयभंग व अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडीत ग्रामसेविकेच्या तक्रारीवरून सदरचा गुन्हा भादंवीच्या कलम 354,354 (अ), 354(ड), सहकलम अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम-2015 कायद्याचे 3(2)व्ही(ए),3(आय)डब्लू(ए),3(1)(डब्लू)(2) कलमांखाली दाखल करण्यात आला आहे .या आरोपी अधिका-याला जि.प. प्रशासन तात्काळ निलंबित करणार का असा प्रश्न यानिमीत्ताने विचारला जात आहे.

आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॅाईज फेडरेशन तालुका शाखेच्या नेतृत्वात गोंडवाना गणतंत्र पार्टी,म.रा.ग्रामसेवक संघटना व स्थानीक आदिवासी लोकप्रतिनिधी यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले.मोर्चात मोठया प्रमाणावर ग्रामसेविका,ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच व कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते.
सविस्तर वृत्त असे की महादुलाच्या ग्रामसेविका यांना मानसिक त्रास देणाÚया व वाईट हेतूने हेतुपुरस्सर अपमानास्पद वागणूक देणारे विस्तार अधिकारी(पंचायत) सी.एम.पाटील यांचेवर तात्काळ गुन्हा नोंदविण्यांत यावा व त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी दिलेल्या निवेदनातून करण्यांत आली आहे.पंचायत समीतीच्या वरीश्ठ अधिकारी यांचेकडे पीडीता महीलेने यापुर्वी अर्जविनंत्या केल्या आहेत मात्र अद्यापही प्रशासनाकडून पाटील यांचेवर कुठलीच ठोस कार्यवाही करण्यांत आली नसल्याचे निवेदनांत नमूद करण्यांत आले आहे.
पाटील हे अतिशय लंपट अधिकारी असून ते महीला कर्मचारी,महीला पदाधिकारी यांचेशी जाणूणबुजून लगट करतात व त्यांच्या मनासारखे झाले नाही तर विविध प्रकारे त्रास देतात व अपमानास्पद वागणूक देतात असे बयान अनेक महीलांनी रामटेक पंचायत समीतीच्या कार्यालयांत दोन दिवसांपुर्वी आलेल्या जिल्हास्तरीय महीला तक्रार निवारण समीतीकडे नोंदविले आहेत असे कळते.
यावेळी फेडरेशनचे घनश्याम सर्याम,जे.डी.ईनवाते,हरिश्चंद्र सर्याम,धनराज मडावी,साधूराम वरखडे,जि.प.सदस्या दुर्गा सर्याम,शांता कुमरे,पं.स.रामटेकच्या सभापती किरण धुर्वे,उपसभापती छाया वंजारी,शितलवाडीच्या सरपंच योगीता गायकवाड,माजी नगराध्यक्शा माधुरी उईके,पं.स.सदस्य हरीसिंग सोरते,ग्रामसेवक संघटनेचे भारत मेश्राम,रवि रेहपाडे,हरीदास रानडे,मधुकर बांते,तेजराम झोडे,पंजाब चव्हाण,ज्ञानेश्वर नेहारे,श्रीकांत भर्रे,अनिल लिंगायत व विपुल भूरसे,गोंगपाचे जिल्हाध्यक्श हरीश उईके आदी उपस्थित होते.पोलीसांनी पीडीत महीलेला गुन्हा दाखल करून न्याय दिला आहे.जि.प.प्रशासन आरोपी पाटील यांना तात्काळ निलंबित करणार ,की पुन्हा थातुर मातुर चैकशी समीतीचा फार्स करणार याकडे सबंध जिल्हयाचे लक्श लागले आहे.

मंगळवार, सप्टेंबर २९, २०२०

 पाॅझिटिव्ह रुग्ण घराबाहेर फिरताना सापडला;गुन्हा दाखल

पाॅझिटिव्ह रुग्ण घराबाहेर फिरताना सापडला;गुन्हा दाखल


होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल
चंद्रपूर (खबरबात) :
कोव्हीड १९ अंतर्गत होम आयसोलेशनचे नियम मोडणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून माहिती लपविणे तसेच प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन केल्यामुळे भारतीय दंड संहितेचे 1860 चे कलम 188, 269,270, २७१ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे 51(बी), साथीचे रोग अधिनियम 1897 चे कलम 3 अंतर्गत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंडस्ट्रीयल प्रभागात राहणारी व्यक्ती २३ सप्टेंबर रोजी कोरोना पॉझीटीव्ह आली होती. या व्यक्तीला मनपा आरोग्य विभागामार्फत होम आयसोलेशन करण्यात आले होते. तसेच राहत्या घरी याबाबतचे स्टिकर लावण्यात आले होते. मात्र सदर व्यक्ती होम आयसोलेशनचे नियम न पाळता बाहेर फिरत असल्याबाबतची तक्रार व फोटो प्रशासनाला प्राप्त झाले. मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांद्वारे सदर व्यक्तीकडे भेट दिली असता तो गृह अलगीकरणात आढळुन आला नाही तसेच घरी लावण्यात आलेले होम आयसोलेशनचे स्टीकर देखील सदर व्यक्तीने काढून टाकल्याचे आढळले.
त्यामुळे मनपा प्राथमीक आरोग्य केंद्र क्र. ७ च्या वैद्यकीय अधिकारी यांच्याद्वारे ही संपुर्ण माहिती रामनगर पोलीस स्टेशनला देण्यात आली असून यानंतर पोलीस स्टेशन मध्ये प्रशासनाच्या सूचनांचे उल्लंघन करून सार्वजनीक धोकादायक असलेल्या रोगाचा संसर्ग पसरविण्याचे कृत्य जाणीवपुर्वक केल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

तसेच सदर व्यक्तीला कोव्हीड केअर सेंटर, वन अकादमी येथे पाठविण्यात आले आहे. प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची समज वारंवार मनपा प्रशासनाद्वारे देण्यात येत असुन पालन न करण्यावर कठोर कारवाई करण्याचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहेत.

शनिवार, फेब्रुवारी ०६, २०२१

चित्राताई वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करणे ही विरोधकांची मुस्कटदाबी  भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी

चित्राताई वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करणे ही विरोधकांची मुस्कटदाबी भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी

चित्राताई वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करणे ही विरोधकांची मुस्कटदाबी

भाजपा प्रवक्ते शिवराय कुळकर्णी

मुंबई : संपूर्ण जगात कोरोनाचे थैमान असताना जगात कुठेच घडला नाही असा मानवतेला काळिमा फासणारा, युवतीच्या गुप्तांगातून स्वॅब घेऊन कोरोना टेस्ट करण्याचा निंदनीय आणि अश्लाघ्य प्रकार बडनेरा येथे घडला. या घटनेतील पीडितेला न्याय मिळावा म्हणून अमरावती-बडनेरा येथे भेट देणाऱ्या भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्रीमती. चित्राताई वाघ यांच्यावरच पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याबद्दल महाविकास आघाडी सरकारचा भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी एका पत्रकाद्वारे निषेध केला आहे.

श्री. कुळकर्णी यांनी पत्रकात म्हटले आहे की, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न चालविला आहे. महिलांवर होणारे अत्याचार थांबवण्यात महाविकास आघाडी सरकारला पूर्णपणे अपयश आले आहे. राज्यभरात लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत सर्व वयोगटाच्या महिलांवर होणाऱ्या गंभीर स्वरूपाच्या अत्याचाराची प्रकरणे वाढली आहेत. महिलांना न्याय मिळावा म्हणून राज्यभर भाजपाची महिला आघाडी आणि प्रामुख्याने चित्राताई वाघ यांनी प्रत्येक घटनास्थळावर जाऊन पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा उभारला आहे. कुठल्याही समस्येवर तोडगा काढण्यासाठी अकार्यक्षम ठरलेले राज्य सरकार ठिकठिकाणी सरकार विरुद्ध उठणारा आवाज दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.

कोरोना काळात बडनेरा येथे घडलेल्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. चित्राताई वाघ यांनी अमरावतीत येऊन पीडितेला न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला होता. खरे पाहताया प्रकरणाचे गांभीर्य पाहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वतः घटनास्थळावर येणे क्रमप्राप्त होते. अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर स्वतः महिला असूनही त्यांनी पीडितेला भेटण्याचे सौजन्यही दाखवले नाही. उलट पीडितेला धीर देणाऱ्या चित्राताई वाघ यांच्यावर काही महिने उलटून गेल्यावर बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यासाठी कुठलेच कारण आढळले नाही म्हणून कोरोनाच्या नियमांचा भंग केल्याचे निमित्त पोलिसांनी समोर केले आहे. महाविकास आघाडी सरकारने सर्वच पातळींवर अशीच मुस्कटदाबी चालवलेली आहे. या शासना विरुद्ध कोणी ब्र काढला की त्यामागे पोलिसांचा ससेमिरा लावण्याची दडपशाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. चित्राताई वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करणे आणि त्यांनी तात्काळ न्यायालयासमोर हजर राहण्याचे समन्स बजावणे हा या दडपशाहीचाच भाग असल्याचे स्पष्ट करून शिवराय कुळकर्णी यांनी निर्लज्ज आघाडी सरकारचा निषेध केला आहे.

गुरुवार, जुलै २९, २०२१

बिल थकविणे पडले महागात:२७ दिवसात महावितरणने कापली १०२८२ ठिकाणची वीज

बिल थकविणे पडले महागात:२७ दिवसात महावितरणने कापली १०२८२ ठिकाणची वीज


महावितरणच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, धमकावणे पडेल महागात
जुलै महिन्यात १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित
नागपूर (खबरबात):  
वापरलेल्या वीज देयकाचे पैसे न देता काही ठिकाणी वीज ग्राहक महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले करणे, धमकावणे, शिविगाळ करणे या सारखे प्रकार वाढू लागले आहेत . महावितरणला असे कृत्य करणाऱ्या वीज ग्राहकांच्या विरोधात नाईलाजाने पोलीसात तक्रार करावी लागते.त्यामुळे अशा ग्राहकाचा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला कारावास होऊ शकतो. नुकत्याच वर्धा येथील एक प्रकरणात मारहाण करणाऱ्या ग्राहकांना पोलिसद कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीज भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.दरम्यान जुलै महिन्यात महावितरणने १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. त्यापैकी ७ हजार २१ ग्राहकांनी वीज बिलाची थकबाकी आणि नव्याने वीज जोडणीचे निर्धारित शुल्क भरून आपला वीज पुरवठा सुरु केला आहे.

महावितरण अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे हा दंडनीय अपराध आहे.भादवि कलम ३५३ नुसार शासकीय कामात अडथळा आणणे,माराहाण केल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपीस २ वर्षाची कारावासाची शिक्षा होऊ शकते.तर कलाम ३३२ नुसार शासकीय कामकाजात अडथळा आणणे तसेच इजा होईल अशी मारहाण करणे या गुन्ह्यांचा समावेश असून त्याअंतर्गत ३ वर्ष व त्यापेक्षा अधिक अशा शिक्षेची तरतूद आहे. अनेकदा वीज ग्राहक महावितरण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धमकावतात, हे कृत्य देखील शिक्षेस पात्र आहे.या प्रकरणी वीज ग्राहकाच्या विरोधात भादवि कलम ५०६ नुसार आरोपीस २ वर्ष कारावासाची तरतुद आहे.काही ठिकाणी वीज ग्राहक झुंडीने महावितरण कर्मचाऱ्यांवर हल्ला करतात.अशा प्रसंगी पोलीस वीज हल्लेखोर ग्राहकावर भादवि कलम१४३,१४७, १४८, १४९ ही दंगलीची कलमे लावतात.विशेष म्हणजे हे सर्व गुन्हे अजामीनपात्र व गंभीर स्वरूपाचे आहेत. या सर्व कलमा अंतर्गत राज्यात अनेकांना शिक्षा झालेली आहे.

महावितरणने १ जुलै ते २७ जुलै या दरम्यान नागपूर परिमंडलातील १० हजार २८२ थकबाकीदार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. नागपूर शहर मंडल कार्यालया अंतर्गत सर्वाधिक ५ ग्राहकांचा हजार ८१५ वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून नागपूर ग्रामीण मंडल अंतर्गत २ हजार ७२१ तर वर्धा मंडल अंतर्गत १ हजार ७४६ ग्राहकांची वीज महावितरणने खंडित केली आहे.

थकबाकीमुळे महावितरणची आर्थिकस्थिती अत्यंत बिकट झाली आहे .त्यामुळे वीज ग्राहकांनी वीज बिलाचे पैसे नियमित भरून महावितरणला सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे.

आकडेबाज वीज ग्राहकावर वीज चोरीचा गुन्हा दाखल 
मुबलक प्रमाणात वीज वापरून वीज देयकाची रक्कम न भरल्याने महावितरणने वीज पुरवठा खंडित केल्यावर वीज वाहिनीवरून अनधिकृतपणे वीज वापरणाऱ्या ग्राहकाच्या विरोधात कळमना पोलिसांनी वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, महावितरणचे सहाय्यक अभीयंता अक्षय कोंबाडे हे कार्यकारी अभीयंता राहुल जीवतोडे, अतीरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत भाजीपाले यांच्या  आदेशानुसार बेलेनगर,कामना नगर परिसरात थकबाकीदार वीज ग्राहकांकडून थकबाकीची वसुली करीत होते.या परिसरात राहणारा वीज ग्राहक आतीक सिद्वीक्की या ग्राहकाकडे २लाख २३ हजार रूपयांची थकबाकी असल्याने मार्च-२०२१ मध्ये महावितरणने वीजपुरवठा खंडित केला होता. थकबाकीची रक्कम भरून वीजपुरवठा नियमित करण्या एवजी आतीकने नर्गिस नामक महिलेस हाताशी धरून वीज वाहिनीवर आकडा टाकून अनधिकृतपणे वीज वापर सुरू केला. ही बाब महावितरणचे सहाय्यक अभीयंता अक्षय कोंबाडे यांच्या निदर्शनास आली.कोंबाडे यांनी कळमना पोलिस ठाण्यात धाव घेतली.कळमना पोलिसांनी आतीक सिद्धीक्की आणि नर्गिस नामक महिलेच्या विरोधात वीज कायदा २००३ कलम १३८  नुसार गुन्हा दाखल केला आहे.

वीज देयकाची थकबाकी राहिल्याने महावितरणकडून वीजपुरवठा खंडित केला आहे. अशा वीज ग्राहकांनी थकबाकीची रक्कम भरून वीजपुरवठा अधिकृतपणे घेण्याचे आवाहन नागपूर परिमंळाचे मुख्य अभीयंता दिलीप दोडके यांनी केले आहे.

गुरुवार, नोव्हेंबर १६, २०१७

बलात्काराच्या धमकीची तक्रार नको:बलात्कार झाल्यावर तक्रार दे: नागपूर पोलीस

बलात्काराच्या धमकीची तक्रार नको:बलात्कार झाल्यावर तक्रार दे: नागपूर पोलीस

नागपूर/प्रतिनिधी:
 केवळ बलात्काराची धमकी दिल्यानंतर नाही तर गुंडाने बलात्कार केल्यानंतर तक्रार करायला या, असं धक्कादायक उत्तर नागपूर पोलिसांनी दिलं.
नागपूरच्या अमिता जयस्वाल या तरुणीनं काही दिवसांपूर्वी अतिक्रमणाविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर तिला गुंडांकडून धमक्या यायाला सुरुवात झाली आहे. याविरोधात ती पोलिसात गेली. त्यावेळी तिला पोलिसांनी हे धक्कादायक उत्तर दिलं.

सक्करदरा परिसरात राहणाऱ्या अमिता जयस्वालनं तिच्या परिसरातील एका अतिक्रमणाची तक्रार महापालिकेकडं केली होती. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर महापालिकेने ते अतिक्रमण काढले. मात्र यानंतर अमिता जयस्वाल आणि तिच्या कुटुंबियांना परिसरातील काही गावगुंडांनी जगणं मुश्कील करुन टाकलं आहे.
सध्या जयस्वाल कुटुंबियांच्या घरावर रात्री-अपरात्री दगडफेक केली जातेय.
हे गुंड मनात येईल तेव्हा जयस्वाल कुटुंबियांच्या घरावर हल्ला करतात, बलात्काराची धमकी देतात. नागपूर पोलीस मात्र गुन्हा घडण्याची वाट पाहात मौन धारण करुन आहेत.
हे गुंड जयस्वाल कुटुंबियांच्या खासकरून अमिताच्या मागे लागले आहेत. येता- जाता अश्लिल शिव्या देणे, चाकू – इतर हत्यारे दाखवून धमकावणे, रात्री अंधारात घरावर दगड फेकणे, घराच्या दारावर लाथा मारणे असे प्रकार अमिता सहन करत असतानाच, काल रात्री घरावर चालून आलेल्या 15 ते 20 लोकांच्या जमावाने अमिताला बलात्काराची धमकी दिली.

धक्कादायक बाब म्हणजे घाबरलेल्या अमिताने त्वरित सक्करदरा पोलीस स्टेशन गाठून पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. मात्र, गुन्हा घडेल फक्त या आधारावर तक्रार घेता येत नाही, गुन्हा घडल्यावर तक्रार दे, असे सांगून पोलीस स्टेशनमधील अधिकाऱ्यांनी तिची तक्रार घेणे तर दूर, तक्रारीची पोच पावती देण्यासही नकार दिला.
याच वर्षी मार्च महिन्यात जेव्हा अमिताने महापालिकेकडे अतिक्रमणाबद्दल माहितीच्या अधिकारात माहिती मागितली होती आणि नंतर तक्रार दिली होती. त्यावेळीही अमिताच्या घरावर हल्ला झाला होता. तेव्हा मध्यरात्री अमिता आणि तिच्या भावाने घाबरलेल्या अवस्थेत खासदार नितीन गडकरी यांचे संपर्क कार्यालय गाठून स्वतःला वाचविले होते.
त्यावेळी नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून थेट पोलीस आयुक्तांना प्रकरणाची माहिती दिल्यानंतरही सक्करदरा पोलीस स्टेशनमध्ये काहीच कारवाई झाली नव्हती.
आम्ही या प्रकरणासंदर्भात सक्करदरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पवार यांना वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असा दावा जयस्वाल कुटुंबाचा आहे.
दरम्यान, गुन्हा घडल्यावर त्याचा तपास करणे हे पोलिसांचे कर्तव्य असले, तरी घडू शकणाऱ्या गुन्ह्याला प्रतिबंध घालणे हेही पोलिसांचे कर्तव्य आहे. आणि बलात्कार घडला नाही ना.. घडल्यावर गुन्हा दाखल करू असे म्हणणारे नागपूर पोलीस फक्त कर्तव्यात कसूर करत नाहीत, तर निर्लज्जतेचे कळस गाठत आहे, असंच म्हणाव लागेल.

sakkardara police station nagpur maharashtra साठी इमेज परिणाम

गुरुवार, जानेवारी १६, २०२०

संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी

संजय राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी




भाजपा प्रदेश प्रवक्ते आ. राम कदम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन
शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे मागून शिवाजी महाराजांच्या घराण्याची बदनामी केली आहे व असंख्य शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ते आ. राम कदम यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी केली.

मुंबईत घाटकोपर पोलीस ठाण्यात भाजपा कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाईची मागणी केली. मा. राम कदम यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, संजय राऊत यांनी छत्रपती उदयनराजे यांच्या संदर्भात केलेल्या विधानामुळे शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या असून त्यांनी बिनशर्त माफी मागून विधान मागे घ्यावे तसेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा.

संजय राऊत यांनी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांशी आपले संबंध होते, असे मान्य केले आहे,त्यामुळे त्यांची चौकशी करून गुन्हा दाखल करावा. तसेच स्व. इंदिरा गांधी यांच्यासह राजकीय नेत्यांचे हाजी मस्तान, करीम लाला, दाऊद इब्राहिम यांच्याशी असलेल्या संबंधांविषयी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राऊत यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केल्यास अनेक गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होईल, असेही आ. राम कदम यांनी अन्य एका निवेदनात म्हटले आहे.

संजय राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून कारवाई होण्यासाठीचे आंदोलन आज सुरू झाले असून कारवाई होईपर्यंत ते चालूच राहील. राज्याच्या गावागावात असे आंदोलन होईल,असा इशारा आ. राम कदम यांनी दिला.

गुरुवार, ऑगस्ट २७, २०२०

वाडीतील दलित तरुणीवर चार वर्षापासून केले दुष्कर्म

वाडीतील दलित तरुणीवर चार वर्षापासून केले दुष्कर्म



वाडीतील दलित तरुणीवर चार वर्षापासून केले दुष्कर्म
पोलिस आयुक्तकडे एक महिन्यापूर्वीच केली तक्रार
नागपूर / खबरबात
वाडीतील एका दलित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात अडकविल्याची तक्रार वाडी पोलिस स्टेशनमध्ये गुरुवार २७ जूलै रोजी पिडीतीने दिली आहे . परंतु पोलिसांनी पीडितीची तक्रार घेतली नाही त्यामुळे तरुणीने वाडी पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे सांगितले.वाडी पोलिस तक्रार का नोंदवित नाही आहे . असा प्रश्न पीडित तरूणीने पत्रपरिषदेत केला आहे.
प्राप्त माहितीनुसार वाडीतील एका दलित तरुणीला एका तरुणाने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठविले होते. तरुणीने रिक्वेस्ट एक्सेप्ट केली होती. फेसबुक'वर भेट झाली असता दोघांचे संबंध प्रेम संबंधात रूपांतर झालेले.दोघांनीही एकमेकांना साथ देण्याचे आश्वासन दिले. २०१६ मध्ये प्रेम प्रकरणाची सुरुवात झाली.मुलाने लग्नाचे आमिष दाखवून मुलीवर नेहमीच दुष्कर्म केला. तिचा पूर्णपणे पत्नी सारखा उपयोग करून घेतला. विवाहाबद्दल तरुणी बोलू लागली, तेव्हा तरूणीच्या कुटुंबातील सदस्यांनी तिला खालच्या जातीचा आहे म्हणून नकार दिला.असे असूनही, तरुणाने पीडित तरूणीच्या सोबत दि. १२ एप्रील रोजी वानाडोंगरी येथे भाड्याच्या घरात पती-पत्नीसारखे लग्न न करता राहण्यास सुरवात केली.लैंगिक अत्याचारांमुळे पीडित २०१८ मध्ये तरुणी दोन महिन्याची गर्भवती झाली. तरूणाने जबरदस्तीने गर्भपात गोळ्या देऊन तिला गर्भपात केल्याचा आरोप तरुणीने केला. तरूणाने लग्नाचे आमिष दिले आणि वारंवार तरुणीशी दुष्कर्म केले.चार वर्षे लोटल्यानंतरही लग्न न केल्याने तरुणीने तरुणाला लग्नासाठी उद्युक्त केले, परंतु तु खालच्या जातीची आहे व माझे काम झाले आहे,मी लग्न करत नाही असे बोलून तरुणीला एकटी सोडले. दोघांचे प्रेमप्रकरण दोघांच्याही कुटुंबांना माहिती होते.लग्न न केल्याने तरूणी वाडी पोलिस ठाण्यात गेली पण वाडी पोलिसांनी तिची तक्रार घेतली नाही. तर तरुणीने पोलीस आयुक्त व वाडी पोलीस स्टेशनला रजिस्टर तक्रार केली.वाडी पोलिसांना तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी दोघांना पोलिस स्टेशनमध्ये बोलविले परंतु दोघांना समजोता करण्याचा प्रयत्न केला.पीडितिला तारखेवर तारीख देण्यात आली पण गुरुवारपर्यंत पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. हे प्रकरण एपीआय ज्ञानेश्वर ढवळे यांच्याकडे आहे.ढवळे यांनी पीडितेला पोलिस ठाण्यात वारंवार फोन करून बोलवून त्रास देत असल्याचा तसेच गुन्हा न नोंदवित असल्याचा आरोप पत्रपरिषदेत केला.वाडी पोलिसांनी संबंधित तरुणावर बलात्कार, फसवणूक आणि अ‍ॅट्रॉसिटी एक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पीडित तरुणीने केली आहे.जर वाडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला नाही तर पोलिस ठाण्यासमोर उपोषणाचा इशारा पीडितेच्या आईने दिला आहे.

बुधवार, ऑगस्ट २९, २०१८

चंद्रपुरात शाळेतील वाद पोहचला पोलीस ठाण्यात

चंद्रपुरात शाळेतील वाद पोहचला पोलीस ठाण्यात

मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल 
ललित लांजेवार:
हि बातमी शिक्षक वर्गात खळबळ माजविणारी बातमी आहे.चंद्रपूर शहरातील लालपेठ परिसरात असलेल्या एका उच्च प्राथमिक शाळेतील वर्ग शिकवणीच्या कारणावरून झालेल्या वादाला भलतेच वळण मिळाले आहे, अन हा वाद पोलीस ठाण्यात पोहचला आहे.
शहरातील लालपेठ परिसरातील प्रगती एजुकेशन सोसाइटी द्वारा संचालित सूरज हिंदी उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याधापकावर महिला शिक्षिकेला मानसिक व शारीरिक त्रास दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंद्रपूर येथील सूरज हिंदी उच्च प्राथमिक शाळेत कुणाल(बदललेले नाव) हे गेल्या १५ वर्षाहून अधिक वर्षापासून मुख्याध्यापक या पदावर कार्यरत आहेत,याच शाळेत मोनाली(बदललेले नाव) ह्या सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे,या शाळेतील ८ शिक्षक शिक्षिकेचा स्टाफ या मुख्याध्यापकांकडे आहे. अश्यातच मुख्याध्यापकाने वारंवार माझ्या वर्गाकडे नजर ठेवत मला वारंवार शिवणीचा लेखाझोका मागवीत असतात व अश्यातच गेल्या काही दिवसांपासून मला मानसिक व शारीरिक छळ होत आहे, असा आरोप करत महिला शिक्षिकेने मुख्याध्यापकाविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली,महिला शिक्षिकेच्या बयाणावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तर मुख्याध्यापकांच्या म्हणण्यानुसार मी माझ्या मुख्याध्यापकाचे कार्य व्यवस्तीत रित्या पार पाडतो मात्र शिक्षक त्यांचे शिकवणीचे कार्य पार पडत नाही,शासन त्यांना पगार देतो व त्यांच्या कामाचा लेखाजोखा घेणे माझी जिम्मेदारी आहे. तक्रारदार महिला शिक्षिका ह्यांच्या वर्गावर मी विद्यार्थ्यांची शिकवणी वर्गात गेल्यावर तपासणी केली असता विध्यार्थ्यांना वाचता लिहिता येत नाही, गणितातले गुणाकार भागाकार येत नाही व त्यामुळे मी त्यांच्या वर्गावर जाऊन विध्यार्थ्यांना विचारपूस केली.व रोजनिशी वही मागविली असता त्या संतापल्या व त्यांनी मला अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.असे सांगितले. 
या संपूर्ण प्रकरणात मुख्याध्यापकावर कलम ३५४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्याध्यापकाने पोलिसात दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिक्षिकेवर अश्लिल शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कलम २९४,५०६ नुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील पुढील  तपास शहर पोलीस करीत आहे.

गुरुवार, नोव्हेंबर ०७, २०१९

महावितरण कर्मचा-यांना मारहाण प्रकरणी अखेर दखलपात्र गुन्हा दाखल

महावितरण कर्मचा-यांना मारहाण प्रकरणी अखेर दखलपात्र गुन्हा दाखल




नागपूर, दि. 7 नोव्हेंबर 2019:-
वीजबिलापोटी थकबाकी असलेल्या ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यास गेलेल्या महावितरण कर्माचा-यांना शिविगाळ व मारहाण करण्यासोबतच त्यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याचा प्रयत्न करणा-या आरोपींविरोधात अखेर भा.दं.सं. च्या कलम 353, 504, 506 व 186 अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 सोमवार (दि. 4) महावितरण कर्मचारी मुनेश्वर कापसे व राहुल मेश्राम हे कंत्राटी वसुली कर्मचारी अक्षय परासकर यांचेसोबत भालदारपुरा येथील बडा मस्जिद परिसरातील अब्दुल्लाबेग चमूबेग या ग्राहकाकडील सुमारे 1 लाख 55 हजाराची थकबाकी असल्याने त्या घरी गेले असता तेथे उपस्थित असलेल्या महिलेला त्यांनी थकबाकीबाबत माहिती दिली व अर्धा तास वाट बघितल्यानंतर काहीही  प्रतिसाद न मिळाल्याने तेथील वीजपुरवठा खंडित करून दुस-या ग्राहकाकडे कारवाईसाठी गेले असता परवेज खान या आरोपीने या वीज कर्मचा-यांना शिविगाळ करून मारहाण केली, याशिवाय या मुनेश्वर कापसे या वीज कर्मचा-यांच्या अंगावर दुचाकी वाहन चढविण्याच्या प्रयत्न केला. त्यामुळे ते खाली पडल्यानंतर त्यांना परत मारहाण करीत बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी गणेशपेठ पोलीसांनी भा.दं.सं. च्या कलम 323, 504 व 506 या कलमान्वये अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. 

याप्रकरणी दोषींविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल करून त्यांचेवर कठोर कारवाई व्हावी यासाठी महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप दोडके आणि कार्यकारी अभियंता समीर टेकाडे यांनी वरिष्ठ पोलीस अधिका-यांकडे याबाबत पाठपुरावा केला, अखेर बुधवार (दि.6) ला या आरोपीविरोधात शासकीय कामकाजात अडथळा करणे, मारहाण करणे, शिविगाळ करून सार्वजनिक शांतता भंग करणे या आरोपाखाली आरोपींविरोधात भा.दं.सं. च्या कलम 353, 504, 506 व 186 अन्वये दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाने केलेल्या या सहकार्याबद्दल महावितरणने त्यांचे आभार व्यक्त केले असून महावितरण ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी असल्याने नफा कमावणे हा महावितरणचा उद्देश नाही. मात्र महावितरणचे अस्तित्व हे विकलेल्या प्रत्येक युनिट वीजेचे पैसे वसूल होण्यावर अवलंबून आहे. वीजबिलांच्या थकबाकीचे प्रमाण वाढल्याने महावितरणला आर्थिक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे, ही परिस्थिती लक्षात घेता ग्राहकांनी वीज देयकांचा नियमित भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. 

शनिवार, नोव्हेंबर १८, २०१७

विद्यार्थ्यानेच केला त्याचा खून

विद्यार्थ्यानेच केला त्याचा खून

यवतमाळ / प्रतिनिधी :-  उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील प्राथ.उच्च माध्यमिक अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी प्रदीप शेळके (७) रा.पार्डी याचा दिनांक १३ नोव्हेंबर रोजी अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला व आश्रमशाळा परिसरात असलेल्या शेततळ्यात त्याचा मृतदेह फेकून दिला होता. प्रकरणी बिटगाव पोलीस ठाण्यात अप.क्र. १८४/२०१७ भादंवि ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रदीप चा खून करणा:या विधीसंघर्षग्रस्त बालकाला आज अटक करण्यात पोलीसांना यश आले आहे. मयत प्रदीप हा विधीसंर्घषग्रस्त बालकास वारंवार मुलींच्या नावाने चिडवत असे याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
    प्रदीपच्या खूनामुळे ढाणकी शहरात व परिसरात तसेच आश्रम शाळेतील विद्याथ्र्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सर्वसामान्य जनतेतून व सोशल मिडीयामधून वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या प्रसिध्द होत असल्यामुळे पोलीसांसमोर सदर गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले होते. यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राज कुमार यांनी सदर गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्यासाठी अपर पोलीस अधिक्षक अमरसिंह जाधव यांचे नेतृत्वाखाली  युध्द पातळीवर तपास करण्याचे आदेश दिले होते.
    गुन्ह्याच्या तपासात पोलीस पथक गुन्हा घडले पासून आश्रम शाळा परिसरात तळ ठोकून होते. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान आज सकाळी शाळेतील एका विद्याथ्र्यास शौचास गेल्यावर एक चिठ्ठी मिळून आली. सदर चिठ्ठी मध्ये चिठ्ठी लिहीणा:याने एका विद्याथ्र्यांचा फोटो चिटकवून हा गुन्हा मी केला आहे असा मजकूर लिहीला होता. त्यावरुन पोलीसांनी तपास केला असात सदर चिठ्ठी लिहीणा:या  मुलानेच मयत प्रदीप याचा रविारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन त्यास शेततळे परीसरात घेवून गेला व त्या ठिकाणी प्रथम त्यांचे डोक्यावर फरशीच्या दगडाने मारुन त्यानंतर स्वत:चे करदोळ्याने त्याचा गळा आवळून खून केला.
    सदर खूनाचा आळ हा दुस:यावर यावा या उद्देशाने त्याने चिठ्ठी लिहीली होती. यातच तो फसला. पोलीसांनी त्याला विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने रविारी केलेल्या कृत्याबाबत पोलीसांना सविस्तर सांगितले. मयत प्रदीप हा विधीसंर्घषग्रस्त बालकास वारंवार मुलींच्या नावाने चिडवत असे याचा राग मनात धरुन त्याने हे कृत्य केले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.