Top News

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड

अयोध्येतील राम मंदिर उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) उभारणीत वापरलेले सागवान लाकूड (Teak Wood) महाराष्ट्रात...

ads

यवतमाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
यवतमाळ लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, डिसेंबर २२, २०२२

कशी मिळाली प्रेरणा? जिथून घडली प्रणाली! #khabarabat #india #chandrapur #live #maharashtra #pranali

कशी मिळाली प्रेरणा? जिथून घडली प्रणाली! #khabarabat #india #chandrapur #live #maharashtra #pranali


पर्यावरणविषयक जागृतीसाठी प्रणालीने (Pranali Chikte ) महाराष्ट्र भ्रमण करण्याचा निर्णय घेतला. तिने दीड वर्ष प्रवासात नागरिकांना दिवसेंदिवस वाढते प्रदूषण, ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम याचा संदेश दिला. यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील पुनवट येथे प्रणाली चिकटे राहते. पर्यावरण संवर्धनासाठी प्रणालीने महाराष्ट्र भ्रमंतीसाठी सायकलने प्रवास केला. या विषयावर हा व्हिडीओ

Watch video on YouTube here: https://youtu.be/7FVSYrdFk0I

Pranali Chikte travel All maharashtra For Environmental Conservation #khabarabat #india #chandrapur #live #maharashtra #pranali #
विदर्भ  Maharashtra,यवतमाळ,विदर्भ,

बुधवार, डिसेंबर ०७, २०२२

 दोघांचा जीव घेणारा वाघ जेरबंद; नागपुरच्या गोरेवाडा येथे पाठविणार

दोघांचा जीव घेणारा वाघ जेरबंद; नागपुरच्या गोरेवाडा येथे पाठविणार

वणी परिसरात धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे.गेल्या आठवडाभरापासून वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती.दरम्यान कोलार पिंप्री खान परिसरात सब स्टेशन जवळ हा वाघ आज जेरबंद करण्यात आला. आज जेरबंद केलेल्या वाघाला नागपुरच्या #गोरेवाडा येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती आहे. tiger यवतमाळ च्या वणी परिसरात धुमाकूळ घालत दोघांचा बळी घेणाऱ्या वाघाला अखेर वनविभागाने जेरबंद केले आहे. गेल्या आठवडाभरापासून #वनविभागाने वाघाला पकडण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. 


वणी तालुक्यात मागील पंधरवाडयात भुरकि (रांगणा) येथील अभय मोहन देउळकर व कोलेरा (पिंपरी) येथील रामदास जगन्नाथ पिदुरकर या दोन्ही व्यक्तीला नरभक्षी वाघाने ठार केले होते. त्याची गंभीर दखल घेउन खासदार बाळुभाउ धानोरकर यांनी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, उपविभागीय अधिकरी, तहसिलदर वणी, वणी येथील विश्रामगृहात सकाळी 07.30 वाजता तातडीची बैठक लाउन सर्व अधिका-यांना धारेवर धरले. खासदार बाळू धानोरकर यांनी केलेल्या पाठपुरावानंतर या वाघाला जेरबंद करण्यात यश आले आहे.  tiger 


 या परिसरात वाघाच्या हल्ल्यात दोन व्यक्ती मरण पावले. लोक मरण पावल्यानंतर तुम्ही वाघाला पकडणार का? असा दम अधिका-यांना दिला. त्यात वेकोलि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे परिसरात आस्टेलियन बाभळीचे जंगल मोठया प्रमाणात वाढल्यामुळे नरभक्षी वाघाचा वावर गेल्या दोन वर्षापासून या परिसरात आहे. ऑस्टेलियन बाभळी तात्काळ साफ करून परिसरातील रस्ते मोकळे करण्यात यावे. व तात्काळ वाघाला पकडण्यासाठी पिंजरे लावावे व वाघ जेरबंद करावा अशा सुचना बाळुभाउंनी संबंधित प्रशासनाला दिल्या होत्या. त्यात वाघाचा बंदोबस्त करत नसेल तर वेकोलिच्या अधिका-यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा, अशा सूचना जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडे अशी मागणी केली. त्यात प्रत्यक्ष दोनही गावात जाउन कुटुंबियाना मदत व सांत्वना केली. गावक-यांना धिर देउन तात्काळ समस्या मार्गी लावून वाघाला पकडण्यासाठी सर्व संबंधित वनविभाग तालुका प्रशासन वेकोलि प्रशासन व जिल्हा प्रशासन यांना सुचना दिल्या. 

 खासदार यांच्या सुचनेनंतर तेवढयाच वेगाने प्रशासनाने चक्र फिरविले व त्या नरभक्षी वाघाला अखेर जेरबंद केले. त्यामुळे खासदारांच्या प्रयत्नांना अखेर यश आले. त्यामुळे तालुक्यातील जनता आभार मानत आहे.

 tiger Wani   #tiger #wildlife #animals #nature 

दरम्यान #कोलारपिंप्री खान परिसरात सब स्टेशन जवळ हा #वाघ आज जेरबंद करण्यात आला. याठिकाणी वेकोलीच्या कोळसा खाणी असून त्यांनी डम्पिंग वर लावलेल्या ऑस्ट्रेलियन बाभळीच्या जंगलात वाघांचा अधिवास वाढला आहे, हे वाघ मानवी वस्तीत येऊन मानवावर व पाळीव जनावरांवर हल्ले करू लागल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहे.  झुडपी वृक्ष कापावे व वाघांचा बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे.     #tiger #wildlife #animals #nature #tigers #art #love #lion #cat #photography #wildlifephotography #bigcats #animal #herex #tigertattoo #m #tattoo #cats #wild #gl #india #instagram #tigerking #bigcat #catsofinstagram #naturephotography #zoo #tigre #instagood #cb #tiger #wildlife #animals #nature #tigers #art #love #lion #cat #photography #wildlifephotography #bigcats #animal #herex #tigertattoo #m #tattoo #cats #wild #gl #india #instagram #tigerking #bigcat #catsofinstagram #naturephotography #zoo #tigre #instagood #cb

रविवार, नोव्हेंबर १३, २०२२

गांधींमुळे प्रसिद्धीस आलेली कलावती सध्या काय करतेय?

गांधींमुळे प्रसिद्धीस आलेली कलावती सध्या काय करतेय?


शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील कलावती बांदूरकर या शेतमजूर महिलेची सतरा वर्षांपूर्वी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भेट घेतली होती. सध्या राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार बाळू धानोरकर (Balu Dhanorkar) यांनी यवतमाळ जिल्ह्यातल्या जळका गावी जाऊन कलावती बांदुरकर (Kalawati Bandurkar) यांची भेट घेतली.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील कलावती बांदुरकर कापूस वेचण्याचे काम करतात. 2005 मध्ये त्यांचे पती परशुराम बांदुरकर यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्यांना भेट दिली. त्यानंतर त्यांना मदतीचा देखील सुरू झाला आणि यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातला जळका गाव प्रसिद्ध आला. या घटनेला सतरा वर्ष पूर्ण झाली आहेत. दरम्यान राहुल गांधी महाराष्ट्रात असल्याच्या पार्श्वभूमीवर काही माध्यमांनी कलावती बांदुरकर सध्या काय करतेय? असा प्रश्न उपस्थित केला.


यानिमित्त चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी बांदुरकर कुटुंबियांची भेट घेतली. त्यांच्या आयुष्यातील अनेक खडतर प्रवासाविषयी जाणून घेतले आणि असलेल्या समस्यांविषयी देखील चर्चा केली.

गुरुवार, सप्टेंबर २९, २०२२

श्री जगदंबा देवस्‍थानासाठी ४ कोटी रू. निधी वितरीत |

श्री जगदंबा देवस्‍थानासाठी ४ कोटी रू. निधी वितरीत |

केळापूरच्‍या श्री जगदंबा देवस्‍थानाच्‍या ठिकाणी विविध विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत


सांस्‍कृतीक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भाविकांना नवरात्रोत्‍सवाची अनोखी भेट

राज्‍याचे वन व सांस्‍कृतिक कार्यमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने यवतमाळ जिल्‍हयातील जगदंबा संस्‍थान केळापूर येथील विविध विकासकामांकरिता मंजूर ५ कोटी रू. निधी पैकी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे. पर्यटन व सांस्‍कृतिक कार्य विभागाने दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. सांस्‍कृतिक कार्य मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जगदंबा संस्‍थानच्‍या भाविकांना नवरात्रोत्‍सवाची अनुपम भेट दिली आहे.


यवतमाळ जिल्‍हयातील पांढरकवडा तालुक्‍यातील जगदंबा संस्‍थान केळापूर हे अतिशय जागृत देवस्‍थान आहे. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अर्थमंत्री पदाच्‍या कार्यकाळात प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सन २०१९-२० मध्‍ये या धार्मीक स्‍थळाच्‍या ठिकाणच्‍या विविध विकासकामांसाठी ५ कोटी रू. निधी मंजूर करण्‍यात आला होता. मात्र या विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी अप्राप्‍त होता. हा निधी उपलब्‍ध व्‍हावा यासाठी श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तब्‍बल दोन वर्षे सातत्‍याने पत्रव्‍यवहार व पाठपुरावा केला. विधानसभेत संसदीय आयुधांच्‍या माध्‍यमातुन देखील हा मुद्दा त्‍यांनी रेटला. अखेर दिनांक २९ सप्‍टेंबर २०२२ च्‍या शासन निर्णयान्‍वये जगदंबा संस्‍थान येथील विविध विकासकामांसाठी उर्वरित ४ कोटी रू. निधी वितरीत करण्‍यात आला आहे. याठिकाणी भक्‍त निवास, फर्निचर, पाणीपुरवठा व स्‍वच्‍छता, आंतर व बाह्यविद्युतीकरण, अग्‍नीशमन व्‍यवस्‍था, अंतर्गत रस्‍ते बांधकाम, सिमेंटकॉंक्रीट नाली बांधकाम, वातानुकुलीकरण, आर. ओ. सिस्‍टीम, सिसिटिव्‍ही सिस्‍टीम, वृक्ष लागवड, ट्री गार्ड आदी व्‍यवस्‍थांचा अंतर्भाव आहे.


मंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने श्री जगदंबा संस्‍थान येथे येणा-या भाविकांसाठी या माध्‍यमातुन सोयीसुविधा उपलब्‍ध होणार असून, यंदाच्‍या नवरात्रोत्‍सवात भाविकांना त्‍यांच्‍या माध्‍यमातुन अनोखी भेट देण्‍यात आली आहे. The remaining Rs. 4 crore for various development works at Sri Jagdamba Devasthana in Kelapur. Funds disbursed

शुक्रवार, सप्टेंबर ०२, २०२२

वणीतील पायाभूत सोयीसुविधेकरिता २१ कोटी |

वणीतील पायाभूत सोयीसुविधेकरिता २१ कोटी |

वणी तालुक्यातील पायाभूत सोयीसुविधेकरिता निधी कमी पडू देणार नाही


खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते २१ कोटी च्या विकास कामांचे भूमिपूजन


यवतमाळ : वणी तालुक्यातील पायाभूत सोयीसुविधांचा विकास करणे गरजेचे आहे. अनेक प्रश्न या भागात प्रलंबित आहेत. मागील दोन वर्ष कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निधी उपलब्ध होऊ शकला नाही. परंतु आता मात्र सत्ता नसताना देखील विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नसल्याची ग्वाही महाराष्ट्राचे काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. 


याप्रसंगी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत सन २०२१-२२ रामा -३१५ चिखगाव रेल्वे गेट, बस स्टॅन्ड, टिळक चौक ते वरोरा रेल्वे गेट पर्यंत चार पदरी सिमेंट कॉक्रीट रस्ता, नाली आणि पथ दिव्यांचे बांधकाम करण्याकरिता २१ कोटी १५ लक्ष ७४ हजार रुपये मंजूर करण्यात आले. आज या कामाचे खासदार बाळू धानोरकर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते. 

 Balu Dhanorkar  Wani Yavatmal

यावेळी यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष टिकाराम कोंगरे, महिला जिल्हाध्यक्षा वंदना आवारी, वणी तालुका अध्यक्ष प्रमोद वासेकर, झरी तालुका अध्यक्ष आशिष कुलसंगे, डॉ. महेंद्र लोढा,  शहर अध्यक्ष प्रमोद निकुरे, सामाजिक कार्यकर्ते बसंत सिंग, प्रवीण काकडे, तेजराज बोडे, बंटी ठाकूर, पालाश बोडे, संजय सपाट यांची उपस्थिती होती.

रविवार, ऑगस्ट २१, २०२२

 विदर्भातील माजी खासदारांचा आम आदमी पक्षात प्रवेश...!

विदर्भातील माजी खासदारांचा आम आदमी पक्षात प्रवेश...!यवतमाळ (yavatmal) जिल्ह्यातील माजी खासदार ओ.बी.सी नेते आणि प्रमुख ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) आणि धनराज वंजारी, भाई अमन यांनी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टी पक्ष प्रवेश केला आहे. 

हरिभाऊ राठोड हे माजी खासदार आहेत. तसेच ते बंजारा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. तर धनराज वंजारी हे माजी पोलीस अधिकारी आणि विदर्भाचे नेते आहेत. तसेच वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष होते. आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी याबाबत माहिती दिली. धनराज वंजारी हे माजी पोलीस अधिकारी, विदर्भाचे नेते आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्षही राहिले होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या कार्याची सर्वदूर प्रशंसा झाली आहे. त्यांच्या ‘काम की राजनीती’मुळे प्रभावित होऊन मी आज आम आदमी पार्टीत सामील झालो आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार तसेच ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी दिली आहे.


सामाजिक कार्य :

* राष्ट्रीय बंजारा क्रांती दलाची स्थापना सन 1991

* भटक्या विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष 1999-2004

* रेणके आयोग स्थापन करण्यामध्ये महत्वाची भुमिका

* तिसर्या सुचीसाठी संसदेध्ये प्रायव्हेट बिल 2008

* देशातील 22 कोटी भटक्या विमुक्त समाजाला संघटीत करण्याचे काम

* महाराष्ट्रभर शाखा तसेच इतर राज्यात शाखा

* पहीली शाखा बुलढाणा जिल्हयातील घाटबोरी ता. मेहकर येथे स्थापन करण्यात आली.

Haribhau Rathod

उल्लेखनीय कार्याबद्दल मिळालेले पुरस्कार :

1) राष्ट्रपती मा. प्रणव मख्w यर्जी याच्ं या हस्त o प्रदान 2012 इद्रं प्रस्थ इटंरनशॅनल नवी दिल्ली या प्रतिष्ठीत संस्थेचा कवी दिनकर साहित्य सेवा पुरस्कार

2) महाराष्ट्र शासनतर्फे वसंतराव नाईक समाजभूषण-पुरस्कार राज्यपाल मा.के.शंकर नारायनन यांच्या हस्ते प्रदान (सन2014)

3) सामाजिक योगदानाबददल राज्यातील अनेक सामाजिक संस्थार्फत विविध पुरस्काराने सन्मानित. समाज भूषण, बंजारा भूषण. 

haribhau rathod(MLC). @HaribhauRathod. Ex M.P and M.L.C, Maharashtra. Mumbai, India haribhaurathod.com Born February 4, 1954 Joined Aam-adami-party-arvind-kejariwal