Top News

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड

अयोध्येतील राम मंदिर उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) उभारणीत वापरलेले सागवान लाकूड (Teak Wood) महाराष्ट्रात...

ads

गोंदिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गोंदिया लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, फेब्रुवारी १४, २०२३

कालीमाती येथे १७ फेब्रुवारी ला भव्य खंजेरी भजन स्पर्धा | १८ ला महाप्रसाद

कालीमाती येथे १७ फेब्रुवारी ला भव्य खंजेरी भजन स्पर्धा | १८ ला महाप्रसाद




संजीव बडोले प्रतिनिधी/नवेगावबांध दि.१४ फेब्रुवारी:-

श्री गणेश सत्संग भजन मंडळ कवठा, जय कोकणाई माता महिला भजन मंडळ कवठा,कालीमाती हनुमान मंदिर देवस्थान समिती सुकळी खैरी, ग्रामपंचायत गोठणगाव, प्रतापगड, बाराभाटी, कुंभीटोला, देवलगाव,कवठा,येरंडी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या दिनांक १७ फेब्रुवारी रोज शुक्रवारला सायंकाळी ७.०० वाजता हनुमान मंदिर कालीमाती परिसर येथे भव्य खंजिरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


स्पर्धेचे उद्घाटन अर्जुन मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गोंदिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यशवंत गणवीर यांच्या शुभहस्ते होणार असून,माजी जिल्हा परिषद सदस्य व खोडशिवनी ग्रामपंचायतचे सरपंच गंगाधर परशुरामकर हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. अर्जुनी मोरगाव पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, गोंदिया जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील तरोणे हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेत प्रथम क्रमांक दहा हजार रुपये, द्वितीय क्रमांक सात हजार रुपये, तृतीय क्रमांक पाच हजार रुपये रोख विजेत्या मंडळांसाठी राखून ठेवण्यात आले आहेत. 

तसेच पुरुष महिला गायक तबलावादक हार्मोनियम वादक यांच्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहे. पुजारी केवळराम कांबळे व कवठा पोलीस हरिचंद मेश्राम यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे. दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शनिवारला महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या भव्य खंजिरी भजन स्पर्धेला भजन मंडळांनी व भक्तांनी उपस्थित राहावे.असे आवाहन आयोजका च्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

गुरुवार, फेब्रुवारी ०२, २०२३

दृष्टीव्यंग शिबीरात 45 बालकांचा मोफत उपचार | Eye Health News Government hospital in Gondia, Maharashtra

दृष्टीव्यंग शिबीरात 45 बालकांचा मोफत उपचार | Eye Health News Government hospital in Gondia, Maharashtra


गोंदिया | बाई गंगाबाई महिला व बाल रुग्णालयात (Bai Ganga Bai Women Hospital, Gondia ) 2 फेब्रुवारी 2023 रोजी जन्म जात दृष्टीदोष (आरओपी) तिराळेपण यावर  नागपूर येथील प्रख्यात  सुरज नेत्रपेढीच्या  अनुभवी नेत्र चिकित्सक मार्फत मोफत रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन डी इ आई सी या जिल्हा शीघ्र हस्तक्षेप उपचार केंद्रात होते. 

 या कॅम्प चे उदघाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अंबरीश मोहबे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले या वेळी प्रमुख मार्गदर्शिका म्हणून बाई गंगाबाई महिला व बाळ रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ सुवर्णा हुबेकर तसेच डी इ आय सी चे बालरोग तज्ञा डॉ प्रदीप गुज्जर डॉ त्रिपाठी मॅनेजर श्री पारस लोणारे तसेच समुपदेशक श्री अजित सिंग प्रामुख्याने उपस्थित होते. 

या कॅम्प मध्ये आर बी इस के च्या माध्यमातून संदर्भ सेवा दिलेल्या दृष्टी व्यंग असलेल्या बालकांना नेत्र तज्ज्ञांनी उपचार केले तसेच  विशेष करून ज्या नवजात शिशुना एस एन सी यु मध्ये अनेक दिवस उपचार घ्यावा लागला होता अशा बाळांना नेत्र तज्ञा मार्फत आर ओ पी करिता स्क्रिनिंग करून घेण्यात आली.

तसेच ज्या लहान बालकांना डोळ्याची  नजर तिरपी आहे. तिराळेपणा आहे त्यांना शस्त्रक्रिया करून पूर्ववत नजर प्राप्त करण्यासाठी मोफत वैद्यकीय सल्ला व समुपदेशन  देण्यात आले  गोंदिया जिल्ह्यातून विविध तालुक्यातून  माता पालक आपल्या बाळाला घेऊन गंगाबाई कॅम्पस मधील  डी इ आय सी मध्ये घेऊन आले होते. या मोफत शिबिरांत सुमारे 45 बालकांचा विशेष तपासणी व मोफत उपचार करण्यात आले. कॅम्प चे संयोजन डी इ आई सी केंद्राचे मॅनेजर श्री पारस लोणारे व समुपदेशक अजित सिंग यांनी केले . 
कॅम्प यशस्वी करण्यासाठी या केंद्राचे  श्री अमित शेंडे, रोशन कुर्वे, प्रकुर्ती मनोहर, पूजा बैस, तसेच रिता नेवरे व शालिनी यादव यांनी परिश्रम घेतले .

Government hospital in Gondia, Maharashtra

शुक्रवार, जानेवारी २७, २०२३

भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधन








संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२७ जानेवारी:-
येथील भारतिय जनता पक्षाचे जेष्ठ नेते, जिल्हा संपर्क प्रमुख, भाजपाचे जेष्ठ मार्गदर्शक अर्जुनी मोर. तालुका भाजपा चे माजी अध्यक्ष, नवेगांवबांध ग्रामपंचायत चे माजी सरपंच, उपसरपंच, खरेदी विक्री समिती अर्जुनी मोर. चे संचालक, एक मनमिळाऊ व निस्वार्थ जनतेची अहोरात्र सेवा करनारे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, नवेगांवबांध निवासी रघुनाथ हगरुजी लांजेवार यांचे आज दि.27 जानेवारी रोज शुक्रवार ला दुपारी  2:30 वाजता भंडारा येथील खाजगी रुग्णालयात निधन झाले. मृत्युसमयी ते 72 वर्षाचे होते. उद्या दि.28 जानेवारी रोज शनिवार ला सकाळी 10.00 वाजता नवेगांवबांध येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांचे मृत्युपश्च्यात पत्नी, दोन मुले, दोन मुली व बराच मोठा परिवार आहे. 
भाजपाचे जेष्ठ नेते रघुनाथ लांजेवार यांचे निधनाने अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रांतील भारतिय जनता पक्षाची प्रचंड हाणी झाली असुन,पक्षाने एक तळमळीचा व निष्ठावावान नेता गमावल्याची प्रतिक्रिया माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी व्यक्त केली आहे.

रविवार, जानेवारी २२, २०२३

नवेगावबांध-कोहमारा मार्गावर मोटर सायकलची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक.एक ठार,तर एक गंभीर.अपघातात नेमीचंद वलथरे यांचे दुःखद निधन.

नवेगावबांध-कोहमारा मार्गावर मोटर सायकलची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक.एक ठार,तर एक गंभीर.अपघातात नेमीचंद वलथरे यांचे दुःखद निधन.









संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ जानेवारी:-
नातेवाईकाच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहून स्वगावी परतणाऱ्या एका मोटर सायकल चालकाचे अपघाती दुःखद निधन झाले.रोडवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. मृतकाचे नाव नेमीचंद बादशहा वलथरे राहणार सावरटोलाअसे असून, मागे स्वार असलेला चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
अपघाती निधनाचे वृत्त कळताच दोन मुली,पत्नी व वृद्ध आईवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या मृत्यूने साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे.
सदर दुर्घटना दिनांक 20 जानेवारी च्या सायंकाळी 6:15 ते 6:30 वाजेच्या दरम्यान नवेगावबांध- कोहमारा मार्गावरील येथील भारत गॅस गोदामाच्या जवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार,काल दिनांक 20 जानेवारीला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला येथील रहिवासी नेमीचंद बादशाह वलथरे वय 52 वर्षे हे आपल्या चुलत भाऊ भोजराम रामजी वलथरे वय 48 वर्षे दोघेही राहणार सावरटोला हे,भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मोहघाटा येथून स्वतःच्या मोटरसायकल एमएच 35,एक्स 5779 ने फुटाळासौंदड येथे आपल्या मुली,जावई व नातवांना भेटून कोहमारा मार्गे स्वगावी सावरटोला येथे परत येत असताना, नवेगावबांध-कोहमारा या मार्गावर सायंकाळी 6.15 ते 6.30 वाजता नवेगावबांध येथील भारत गॅस गोडाऊन जवळ रस्त्यावर उभे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एमएच 35,जी 7393 ला जबर धडक दिली.या अपघातात मोटरसायकल चालक नेहमीचं वलथरे व त्यांचे भाऊ भोजराम वलथरे हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, ये जा करणाऱ्या लोकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
नेमीचंद वलथरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर दुसरे गंभीर जखमी भोजराम वलथरे यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर ते गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.देवलगाव येथील सुदाम शेंडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल.अशा स्थितीत धोकादायक व निष्काळजीपणाने उभे करून ट्रॉलीला कोणत्याही प्रकारचे रिपटेकलेस पार्किंग लाईट न लावता उभे ठेवल्याने मोटरसायकल चालक नेमीचंद वलथरे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.तसेच फिर्यादीचे भाऊ भोजराम वलथरे  गंभीर जखमी करण्यास कारणीभूत ठरले.ट्रॅक्टर चालकावर फिर्यादी केशव रामजी वलथरे राहणार सावरटोला यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नवेगावबांध येथे अपराध क्रमांक 09/2023 कलम 283,337,338,304(अ), भादवि सहकलम222/177 मोटार वाहन कायदा अव्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोना घनमारे हे करीत आहेत.मृतक नेमीचंद वलथरे यांच्यावर शवविच्छेदनानंतर सावरटोला येथील स्थानिक स्मशान घाटावर शोकाकुल गावकरी आप्तेष्ट व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. मृतक नेमीचंद यांच्या मागे आई,पत्नी,तीन मुली आहेत.मृतक नेमीचंद यांच्या अपघाती निधनाने वलथरे कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. वडीलाच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच दोन मुली,पत्नीने व वृद्ध मातेने टाहो फोडला. वलथरे कुटुंबीयांचा एकमेव आधारवड या अपघाताने हिरावून घेतला.
मृतक नेमीचंद हे त्यांच्या कुटुंबीयांचे एकमेव आधार होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने त्यांचे कुटुंब दुःखाच्या महासागरात बुडून गेले आहे. त्यांची मोठी मुलगी वैष्णवी 12 कला शाखेतून संग्रामे विद्यालयातून इयत्ता बारावीला द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. उद्या दिनांक 22 जानेवारीला विद्यालयाच्या वार्षिक उत्सवात गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात तिचा सत्कार करण्यात येणार आहे.परंतु तिचा हा गौरव बघायला वडील ह्यात नाहीत.याचे दुःख तिला आहे, तर दुसरी मुलगी तेजस्विनी ही सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे इयत्ता दहावीत शिकत आहे. वडिलांच्या अकाली, अपघाती निधन झाल्याने या दोन्ही मुलीवर दुःखाचा आघात झाला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सावरटोला गावावर शोककळा पसरली आहे.

सोमवार, जानेवारी १६, २०२३

उद्या आरुषी पब्लिक स्कूल येथे दोन दिवसीय वार्षिकोत्सवाचे आयोजन.

उद्या आरुषी पब्लिक स्कूल येथे दोन दिवसीय वार्षिकोत्सवाचे आयोजन.


संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६ जानेवारी:-
कमल गोविंद युनायटेड सोसायटी द्वारा संचालित आरुषी पब्लिक स्कूल,अमित ज्यूनियर कॉलेज,रुखमा महिला महाविद्यालय, लिटिल स्टार कॉन्व्हेंट यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१७ व १८ जानेवारीला वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे.वार्षिकोत्सवाचे उद्घाटन दि. १७ जानेवारी रोज मंगळवार ला दुपारी ३:३० वाजता येथील सुप्रसिद्ध वैदक डॉ.अ.का.कापगते यांच्या शुभहस्ते,गुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज आश्रम मोझरीचे केंद्रीय प्रचारक कुलदीप लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. अतिथी म्हणून डॉ. सुवर्णा रावल उपप्राचार्य बीएनएन कॉलेज भिवंडी मुंबई,भटके आयुक्त विकास परिषद नागपूरचे प्रांत संयोजक दिलीप चित्रीवेकर,नवेगावबांध ग्रामपंचायत चे सरपंच हिराताई पंधरे, नवेगावबांध पोलीस स्टेशनचे ठाणेदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पांढरे,पंचायत समितीचे उपसभापती हमराज पुस्तोडे ,उद्योजक अनिल जैन,मुख्याध्यापक किशोर शंभरकर,प्रतिष्ठित व्यापारी कमल जायस्वाल,मराठा महासंघाचे सुनील तरोणे, माझी बांधकाम समिती सभापती प्रकाश गाहणे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. सायंकाळी ४.३० वाजेपासून स्वरसंध्या,आम्हा नकळे ज्ञान सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण,तर बुधवार दिनांक १८ जानेवारीला सायंकाळी ५.३० वाजता सांज संध्या नृत्याविष्कार विद्यार्थ्यांच्या वतीने सादर केले जाणार आहे. तरीपण सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी सदर वार्षिकोत्सवात बहुसंख्येने सहभागी व्हावे.असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष वैशाली बोरकर,सचिव एकनाथ बोरकर, संस्थेचे सर्व प्राचार्य यांनी केले आहे.
अमित ज्युनिअर कॉलेज येथे  एक दिवसीय विज्ञान प्रदर्शन संपन्न.  प्रदर्शनीत ग्रामीण भागात शाश्वत विकास हाच केंद्रबिंदू.

अमित ज्युनिअर कॉलेज येथे एक दिवसीय विज्ञान प्रदर्शन संपन्न. प्रदर्शनीत ग्रामीण भागात शाश्वत विकास हाच केंद्रबिंदू.










संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.१६ जानेवारी:-
आपले गाव आपला परिसर हा ग्रामीण क्षेत्रात मोडतो. या भागातील शाश्वत विकासाचे प्रयत्न करून, विज्ञान व तंत्रज्ञान च्या ज्ञानावर आधारित काय उपक्रम ग्रामीण संसाधनावर उभारता येतील?हे केंद्रबिंदू मानून,येथील कमल गोविंद युनायटेड वेल्फेअर सोसायटी द्वारा संचालित आरुषी पब्लिक स्कूल येथे,आरुषी पब्लिक स्कूल व अमित ज्युनियर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक संशोधनाचे बीज विद्यार्थ्यांच्या अंतकरणात शालेय जीवनापासूनच रुजावे या उद्देशाने एक दिवसीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.


विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन येथिल प्रतिष्ठित व्यापारी कमल जायस्वाल यांच्या शुभहस्ते,संस्थेचे सचिव एकनाथ बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. 



प्रमुख पाहुणे म्हणून,पंचायत समितीचे उपसभापती होमराज पुस्तोडे, ग्रामपंचायत सदस्य बबलू जैन,नीता जायस्वाल,डॉ.भोयर, कविता शिपानी,भोयर मॅडम, मुख्याध्यापक रमेश नाकाडे,संजीव बडोले,रामदास बोरकर,डॉ.युगा कापगते, खुशाल काशिवार,महादेव बोरकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष लोकपाल गहाणे, मराठा सेवा संघाचे सुनील तरोणे, गोविंदा बोरकर,प्रशांत कापगते, संजय पुस्तोडे, प्राचार्य तिरुपती मेश्राम,राणे प्रामुख्याने उपस्थित होते.

 प्रारंभी अतिथींच्या हस्ते, भारताचे पूर्व राष्ट्रपती व मिसाईल मॅन, वैज्ञानिक डॉ.एपीजे अब्दुल कलाम व शारदा माता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून त्यांना अभिवादन करण्यात आले.


विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, लोप झालेल्या व लोप  होऊ पहात आहेत असे पारंपारिक बी-बियाणे,स्वस्त ऊर्जा,पवन ऊर्जा, अंतराळ,भौगोलिक ज्ञान, शेतीला सिंचन, शेतकऱ्यांना उद्योजक बनवता येइल असे कृषी विषयावर आधारित विविध  असे १४ प्रकल्पाचे सादरीकरण या विज्ञान प्रदर्शनात सादर करण्यात आले. प्रदर्शनात आलेल्या दर्शकांना विद्यार्थ्यांनी माहिती देऊन,त्यांच्या शंका समाधान केले. शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विद्यार्थ्यांनी सदैव स्वागत करून, स्वतःमध्ये वैज्ञानिक संशोधनाची बीजे शालेय दशे पासूनच अंकुरावी.अशी अपेक्षा व्यक्त करून, उद्याचा भारत आपल्याच खांद्यावर आहे.त्यामुळे जबाबदारीची जाणीव ठेवून भारताच्या सर्वांगीण विकास कसा होईल,याकडे लक्ष द्यावे. अशी अपेक्षा व्यक्त करून, प्रदर्शनात सादर केलेल्या शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमाची अतिथींनी प्रशंशा केली. विद्यार्थ्यांनी तेवढ्यात जोमात अतिथींच्या या अपेक्षेला स्वयंस्फूर्तीने प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे संचालन अमित बोरकर यांनी केले,तर उपस्थितांचे आभार पोरस ठाकूर यांनी मानले. विज्ञान प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी प्रवीण तिरपुडे,महेश लांजेवार,गौतम शेंडे,विक्की बावनकुळे, नारायण डुंबरे ,अश्वघोष रामटेके,द्वारकाजीत मंडले, यादव चांदेवार, सुनिता पटले, अर्चना पवार, मीना राऊत,हर्षा डोये, नगमा साखरे, निशिगंधा सोनवाने,अग्रवाल,रश्मी पवार,मोनिका हटवार,कोमल शेंडे, लीलाधर वळके,अनिल गायकवाड, गजेंद्र देशमुख, कैलास कोवे,तुषार  कांबळे,विठ्ठल जुगनाके,सतीश बहेकार,उषाताई कोल्हे यांनी सहकार्य केले.