Top News

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

  The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads

अकोला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अकोला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, ऑगस्ट ०७, २०२२

 अकोल्यातील डॉक्टरविरुद्ध चंद्रपुरात गुन्हा दाखल

अकोल्यातील डॉक्टरविरुद्ध चंद्रपुरात गुन्हा दाखल

khabarbat Chandrapur

चंद्रपूर (Chandrapur) : साळभावास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अकोला (Akola) जिल्यातील डॉ ज्ञानेश्वर तराळे आणि त्यांच्या पत्नी डॉ मोनिका ज्ञानेश्वर तराळे यांच्यावर जिल्ह्यातील दुर्गापूर (Durgapur) पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

तेल्हारा तालुक्यातील रहिवासी असलेल्या मोनिका तराळे यांची बहीण अर्पणा हिचे लग्न 2018 मध्ये चंद्रपूर Chandrapur) येथील निलेश भटकर याच्याशी झाले. मात्र माहेरच्या कारणावरून त्यांच्यात भांडणे होऊ लागली. 23 जून 2021 ला अपर्णा भटकर ही दुसऱ्यांदा गर्भवती असताना तिने तिची बहीण डॉ. मोनिका तराळे आणि भावजी डॉ. ज्ञानेश्वर तराळे यांना बोलावून घेतले. यावेळी या दोघांनीही फिर्यादी निलेश भटकर याला धक्काबुक्की करीत अश्लील शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिली होती. यानंतर अपर्णा आपल्या माहेरी कोल्हापूरला (Kolhapur) निघून गेली. 15 जून 2022 ला निलेश तिला परत आणण्यासाठी गेला असता पुन्हा त्याला मारहाण करीत जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी निलेश भटकर यांनी दुर्गापूर पोलीस (Police) ठाण्यात तक्रार दिली. 

शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल चंद्रपूर भादवी कलम 294, 504, 506 आणि 34 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक स्वप्नील धुळे (PI Swapnil Dhule) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


 #Chandrapur #Akola #Police


रविवार, जून ०५, २०२२

अंतर 34 किमी, मग 75 चे उद्दिष्ठ कसे; जाणून घ्या

अंतर 34 किमी, मग 75 चे उद्दिष्ठ कसे; जाणून घ्या

राष्ट्रीय महामार्गाचे ५१ तास; 17845 रानिंग मीटर रस्त्यांचे काम पूर्ण
लोणी ते मुर्तीजापूर 75 किमी कसे?
अनेकांना एकच प्रश्न पडला आहे, की अकोला महामार्गावरील लोणी ते मुर्तीजापूर अवघ्या 34 किमीचे अंतर असताना 75 किमीचा वर्ल्ड रेकॉर्ड कसा बनत आहे ? , नियमानुसार चौपदीकरणाचा मार्ग हा एकुण 18 मीटर रुंदीचा असतो. या मार्गाची एक बाजु ही साधारणत: 9 मीटरची रुंदीची असते, या 9 मीटरचे दोन भाग म्हणजे दुपदरी, अशा प्रमाणे 4.5 मी. अधिक 4.5 मी.याप्रमाणे या मार्गाच्या निर्माण कार्याची लेंन मोजल्या जाते. या दोन लेनचे काम हे डबलने मोजल्या जाते. जे एकुण 75 किमीचे होत आहे. या कामावर कायमस्वरुपी ड्रोन व व्हिडीओ कॅमेरे लक्ष ठेवून आहेत. इतकेच नाहीतर गिनीज बुकची 12 लोकांची अत्यंत प्रशिक्षीत व जानकार टीमही याचे मोजमाप करित आहे. अमेरिकेच्या अॅक्युवेदर या संस्थेकडून हवामानाची माहिती काढल्यानंतरच 3 ते 7 जून कामाचे दिवस निवडले गेले आहे.

राष्ट्रीय महामार्ग-6 वर लोणी ते मुर्तीजापूर पर्यंत एकूण 5 दिवसात 75 किलोमीटरचा महामार्ग पुर्ण करुन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मिळविण्याचे ध्येय घेऊन राजपथ इंफ्राकॉनची 750 लोकांची टीम हळूहळू आपल्या लक्षपुर्तीकडे जात आहे. माना गावाच्या 1 किलोमीटर अगोदर असलेल्या तीन पुलांमुळे निर्माण झालेली गुंतागुतीची प्रक्रीया शनिवार (4जून) रोजी पुर्ण करण्यात आली. यावेळी तब्बल दिड तासाहून अधिक काळ या मार्गावर वाहतुक खोळंबली होती. परंतू हा टप्पा पुर्ण करुन लगेच वाहतुक नियमीत करण्यात आली. 5 जून रोजी 2 days, 3 तासाचा (एकूण ५१ तास) कालावधी उलटून गेला तेव्हा 17845 रानिंग मीटर म्हणजेच दोन लेन मिळून 35 किमीचे काम निर्विघ्नपणे पार पडले होते.

व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम म्हणाले की, कोरोना काळात कंपनीचे 1200 व इतर असे 1700 कर्मचा:यांच्या कुटूंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न माझ्यासमोर उद्भवला होता. मोठ्याप्रमाणात नकारात्मकता निर्माण झालेली होती. परंतू खचून न जाता, सर्वांना 100 टक्के वेतन दिले. कोरोना काळातच कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबाची वाडी येथे 30 किलोमीटरच्या मार्गाचे अत्यंत कमी वेळात काम संपवुन आम्ही लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविला. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याहून मोठा विक्रम महामार्गाच्याबाबतीत करावा अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर आम्ही लोणी ते मुर्तीजापूर या मार्गावर विश्वविक्रम करण्याचे ठरविले आणि कामाला लागलो. हा विक्रम केला जात असताना मार्गाच्या गुणवत्तेसोबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही. येथून 15 वर्ष या मार्गाला काही होणार नाही, याची हमीसुध्दा जगदीश कदम यांनी यावेळी घेतली. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून अनेक गोष्टी शिकून आज मी या ठिकाणी पोहचलो असल्याचे सांगत त्यांनी त्यांच्या ‘वॉर रुमला’ जावळी हे नाव दिल्याचा त्यांनी आवर्जुन उल्लेख केला.


शुक्रवार, जून ०३, २०२२

लोणी येथून राष्ट्रीय महामार्गाच्या विक्रमी बांधकाम कार्याला उत्साहात प्रारंभ

लोणी येथून राष्ट्रीय महामार्गाच्या विक्रमी बांधकाम कार्याला उत्साहात प्रारंभ


भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राजपथ इन्फ्राकॉनचा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड"चा प्रयत्न.


110 तास, "नॉन स्टॉप" चालणार बिटुमिनस काँक्रिट रस्ता बांधकाम कार्य.


अमरावती/अकोला

अमरावती ते अकोलादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर लोणी ते मूर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील, चौपदरीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त बिटुमिनस काँक्रिटीकरणासह सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीच्या कामाला आज सकाळी प्रारंभ झाला. महामार्गावरील लोणी येथे ६ वाजतापासून विधिवत पूजाअर्चा करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रवर्तक राजीव अग्रवाल आणि राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांनी यंत्र सामग्रीची पूजा केली. दरम्यान, गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड्सचे समन्वयक मिलिंद वेर्लेकर यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतर, सकाळी ७.२७ वाजतापासून प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात आली. सकाळी १०.३० वाजेपर्यंत ११८० रनिंग मीटर बिटुमिनस काँक्रिटचे काम करण्यात आले.


पुण्यातील पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील, सुप्रसिद्ध आणि दिग्गज राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी सर्वत्र ओळखली जाते.राष्ट्रीय महामार्गावरील अमरावती ते अकोला जिल्हयातील चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने ३ जूनला सकाळी ६ वाजतापासून ते ७ जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या सर्वात लांब रस्त्याची अखंड निर्मिती करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये होईल.राजपथ इन्फ्राकॉनचा हा प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होत आहे. तसेच NHAI (नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत सुरू आहे. त्यासाठी एकूण ७२८ मनुष्यबळ तीन शिफ्टमध्ये कार्यरत आहेत. या कामाची नोंद घेण्यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची संपूर्ण टीम दाखल झाली आहे.राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम (Jagadish Kadam) यांनी सांगितले की, मागील वर्षी जुलैमध्ये राष्ट्रीय महामार्ग कामाची संधी मिळाली. जवळपास ९- १० वर्षांपासून या मार्गाचे काम रखडले होते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना वाहतुकीचा प्रचंड त्रास होत होता. या रस्त्याचे काम करताना, काहीतरी वेगळी कामगीरी करून दाखविण्यासाठी आम्ही संकल्प केला.यंदा देशाला स्वातंत्र्य होऊन 75 वर्ष झाली आहेत. यानिमित्त सारा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. म्हणून या कामाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद व्हावी, अशी कामगिरी करता येईल का, याची चाचपणी केली. मागील चार महिन्यांपासून, गिनीज बुकसोबत संपर्क साधून उपक्रमाची माहिती दिली. यापूर्वी अशा प्रकारचा रेकॉर्ड कतार देशामध्ये दोहा येथे करण्यात आलेला आहे. हा विक्रम मोडून देशाला 75 व्या  अमृत महोत्सवानिमित्त, दोन लेनमध्ये,न थांबता, महामार्ग बांधकामाची अनोखी भेट देण्याचा संकल्प सोडला. त्यानुसार कंपनीने सूक्ष्म नियोजन केले. आज त्यास प्रारंभ झाला . 7 जून रोजी सायंकाळी 7 वाजेपर्यंत सलग 110 तास काम करून विश्वविक्रम प्रस्थापित केला जाईल, असा विश्वास श्री. कदम यांनी व्यक्त केला. हा विक्रम राष्ट्राला समर्पित केला जाईल, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य प्रवर्तक राजीव अग्रवाल (Rajiv Agarwal) यावेळी म्हणाले, अमरावती ते अकोला राष्ट्रीय महामार्गाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. येत्या डिसेंबर 2022 पर्यंत 95 टक्के बांधकाम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आजचा दिवस ऐतिहासिक आहे. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी कंपनीकडून अथक प्रयत्न केले जात आहेत. दोन लेनची रुंदी 9 मीटर राहणार असून, दोन्ही लेन मिळून विश्वविक्रमी रस्ता बांधकाम विक्रमी वेळेत पूर्ण केला जाईल, असेही ते म्हणाले.आमदार प्रतापदादा अडसड यांची भेट 

याप्रसंगी काम सुरू होताच धामणगाव मतदार संघाचे आमदार प्रतापदादा अडसड (MLA Pratapdada Adasad) यांनी लोणी येथील महामार्गावर भेट देऊन विश्वविक्रमी कार्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. व्यवस्थापकीय संचालक जगदीश कदम यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यांनी यावेळी सदर महामार्ग कामाबद्दल आनंद व्यक्त केला आणि शुभेच्छा दिल्या.Exciting start of record construction work of National Highway from Loni

गुरुवार, जून ०२, २०२२

विश्वविक्रमी रस्ता बांधकामासाठी लोणीत जय्यत तयारी

विश्वविक्रमी रस्ता बांधकामासाठी लोणीत जय्यत तयारी
लोणी ते मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्गावर सतत पाच दिवस चालणार विश्वविक्रमी रस्ता बांधकाम

3 ते 7 जून कालावधीत विश्वविक्रमी बिटुमिनस काँक्रिटचा रस्ता बांधणार

जगात सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद होणार

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडकडून जय्यत तयारी

अमरावती/अकोला (Akola/Amarawati)
पुण्यातील ,पायाभूत सुविधा निर्माण क्षेत्रातील दिग्गज राजपथ इन्फ्राकॉन प्रा. लि. दमदार कामगिरीसाठी ओळखली जाते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त, असाच एक ऐतिहासिक,जागतिक विक्रम करण्यासाठी ती सज्ज आहे. बिटुमिनस काँक्रिटीकरणासह,जगातील सर्वात लांब व अखंड रस्ता निर्मितीची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड" मध्ये नोंद होण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आली आहे.अमरावती ते अकोला या दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर, लोणी ते मुर्तीजापूरपर्यंत एका बाजूच्या दोन लेनमधील चौपदरीकरणाचे काम, 3 ते 7 जून दरम्यान, करण्याचे नियोजन कंपनीने केले आहे.राष्ट्रीय महामार्गावरील, अमरावती ते अकोला जिल्हयातील, चौपदरीकरणाच्या कामाला गती येण्याच्या दृष्टीने ३ जूनला सकाळी ६ वाजतापासून ते ७ जूनच्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत, ‘बिटुमिनस काँक्रिट’च्या जगातील सर्वात लांब रस्ता निर्मितीचे काम करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास, त्याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये होईल.  (world record road 🚧)
गुणवत्ता आणि मानवी सुरक्षितता:
ही कंपनी जशी नियोजित वेळेत आणि गतीने काम करण्यासाठी सुविख्यात आहे,तशीच दर्जा(Quality) आणि मानवी सुरक्षिततेसाठीसुद्धा ( human Safety)प्रसिद्ध आहे.त्यासाठी कोणत्याही साईटवर त्यांची गुणवत्ता नियंत्रण अभियंते आणि तंत्रज्ञ तसेच सुरक्षितता अधिकारी यांची चमू सतत कार्यरत असते.इतकेच नव्हे तर, रस्त्यांच्या कामाच्या दर्जा नियंत्रणासाठी, सुसज्ज अशी दर्जा नियंत्रण प्रयोगशाळा ही उभारलेली असते. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून वापरल्या जाणारे मटेरियल आणि करण्यात येत असलेले काम यावर सतत निगराणी ठेवून कामाचा दर्जा राखला जातो.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या निर्धारित दर्जाप्रमाणेच हे काम होईल याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष्य दिले जाते.त्याबाबतीत कसलीही तडजोड स्वीकारली जात नाही.राज पथ इन्फ्राकॉनचा हा धाडसी प्रयत्न गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या संपूर्ण नियमानुसार होणार आहे. तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटीज ऑफ इंडिया (NHAI) द्वारे हा प्रकल्प करारानुसार त्यांच्या देखरेखीत पूर्ण केला जाईल. त्यासाठी ७२८ मनुष्यबळ कार्यरत राहणार आहे. तज्ज्ञ चमूचे कामावर लक्ष राहील. कामाच्या दर्जाची प्रयोगशाळेतून तपासणी देखील करण्यात येणार आहे.


जागितक विक्रमासाठी अभूतपूर्व तयारी
• या विक्रमी प्रयत्नांची अंमलबजावणी करण्यासाठी राज पथ टीमने सूक्ष्म नियोजन केले आहे. प्रत्येक भागासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले आहे. यात प्रकल्प व्यवस्थापक, हायवे इंजिनिअर, क्लालिटी इंजिनिअर, सर्व्हेअर, सेफ्टी इंजिनिअर आणि अन्य कर्मचारी यांची चमू तैनात करण्यात आली आहे. त्या या महामार्गावरच, माना कॅम्प येथे व्यवस्थापन थिंक टँक व वॉर रूम उभारण्यात आली आहे. यात ४ हॉट मिक्सप्लांट, ४ व्हीललोडर, १ पेव्हर, १ मोबाईल फिडर, ६ टँडेम रोलर, १०६ हायवा, २ न्युमॅटीक टायर रोलर आदी यंत्रसामग्रीसह ७२८ मनुष्यबळ कार्यरत असतील. यंत्रसामग्री सतत कार्यरत आणि दोषमुक्त ठेवण्यासाठी, टाटा मोटर्सचे ५ इंजिनिअर आणि अन्य ५ अधिकारी येथे तैनात आहेत. ही चमू त्या यंत्रांवर सतत लक्ष ठेवून आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानांचा वापर करून, रस्ता निर्मितीचा हा विक्रम करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.साधनसुविधा
विदर्भातील ४५ अंश तापमानांत, हा विक्रम करण्यासाठी, टीमवर्कच्या माध्यमातून हा प्रयत्न केला जाणार आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली जाईल. यासाठी अकोला - अमरावती मार्गावर माना येथे सुसज्ज कॅम्प उभारण्यात आला आहे. येथे प्रशासकीय आणि अभियांत्रिकी कक्ष,चांगली निवास व्यवस्था,दर्जेदार भोजन व्यवस्था, वाहन देखभाल दुरुस्ती कक्ष, पेट्रोल व डिझेल पंप इत्यादी व्यवस्था आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर, वातानुकुलीत व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे.


यापूर्वीचे विक्रम मोडणार
राज पथ इन्फ्राकॉनने सांगली- सातारा दरम्यान,पुसेगाव ते म्हासुर्णे दरम्यान,सतत २४ तास रस्ता तयार करीत विश्वविक्रम स्थापित केला होता. सार्वजनिक कार्य प्राधिकरण- अश्गुल यांनी दोहा, कतार येथे यापूर्वी विक्रम नोंदविला होता. यात त्यांनी सुमारे 242 तास म्हणजेच 10 दिवस नॉनस्टॉप बांधकाम करून, २५ किलोमीटर रस्ता निर्मितीचा विक्रम केला होता. राज पथ इन्फ्राकॉनने आता तो रेकॉर्ड मोडण्याचा चंग बांधला आहे. लोणी-मूर्तीजापूर दरम्यान,विश्वविक्रम रचण्याचा प्रयत्न राहणार आहे. ही आव्हानात्मक कामगिरी यशस्वी झाल्यास, राज पथ इन्फ्राकॉन प्रा. लि. या रस्ते बांधकाम क्षेत्रातील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जागतिक विक्रम नोंदवणारी पहिली भारतीय प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल.

- भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त राष्ट्राला समर्पित कार्य

विशेष म्हणजे, पायाभूत सुविधा, विशेषत: रस्ते बांधणी आणि फरसबंदी या क्षेत्रात असे लक्ष्य आजवर कधीच ठेवले गेले नाही. म्हणून राज पथ इन्फ्राकॉनने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावानिमित्त हा अथक प्रयत्न आणि हे यश आपल्या राष्ट्राला समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताचे पंतप्रधान, माननीय नरेंद्र मोदी यांनी भारत सरकारमधील रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या सक्षम आणि गतिमान नेतृत्वाखाली, ‘गती-शक्ती’ नावाचा एक भव्य महामार्ग बांधकाम प्रकल्प सुरू केला आहे. या विशाल देशामध्ये लोक, वस्तू आणि सेवांच्या वाहतुकीसाठी, एकात्मिक आणि अखंडित, मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी प्राप्त करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.


*राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड बद्दल*
राज पथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड,ही कंपनी भारतातील नामांकित आणि विश्वासार्ह पायाभूत सुविधा कंपन्यांमध्ये प्रशंसित आणि मान्यताप्राप्त अशी कंपनी आहे.आधुनिक बांधकाम यंत्रांच्या सेट-अपच्या सर्व आवश्यक श्रेणींनी सुसज्ज, राज पथ इन्फ्राकॉन टीममध्ये अनुभवी अभियंते आणि मशीन ऑपरेटर यांच्या कुशल आणि अनुभवी मनुष्यबळाचा समावेश आहे. तसेच उद्योगक्षेत्रातील सर्वात योग्य अशा एकसंघ तज्ज्ञांचा उत्साही व्यवस्थापकीय टास्कफोर्स आहे. या बळासह , राज पथ इन्फ्राकॉनने प्रकल्प वेळेवर पूर्ण करून आणि सर्वोच्च आणि कठोर गुणवत्ता मानकांचे पालन करून, भारतीय पायाभूत उद्योगात नवीन मानदंड स्थापित केले आहेत.


पायाभूत सुविधांच्या विकासात विशेष, राजपथ इन्फ्राकॉनने आजपर्यंत राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग तसेच अंतर्गत रस्ते, पूल आणि कालवे, बॅरेजेस आणि धरणांपर्यंतचे विविध प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. राज पथ इन्फ्राकॉनने 8 HAM (हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल) प्रकल्पांतर्गत बिटुमिनस काँक्रीटस तथा लवचिक फुटपाथसह 450 किलोमीटरचे राज्य महामार्ग रस्ते आणि PQC कठोर फुटपाथ रस्त्यांचे 100 किलोमीटर सिमेंटचे बांधकाम यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालय, भारत (MORTH) द्वारे गेल्या 3 वर्षांत भारतात जाहीर केलेले कंत्राटी प्रकल्प. हे आधीच वितरित केलेल्या अनेक BOT (बांधा, चालवा आणि हस्तांतरित करा) रस्ते प्रकल्पांव्यतिरिक्त आहे.

Amravati Akola murtijapur National Highway road construction Guinness Book of record

रविवार, फेब्रुवारी ०७, २०२१

पशुधन विकास मंडळाचं कार्यालय नागपूर येथे हलवण्याचा निषेध

पशुधन विकास मंडळाचं कार्यालय नागपूर येथे हलवण्याचा निषेधअकोला येथील पशुधन विकास मंडळाचं कार्यालय नागपूर येथे हलवण्याचा जो सूडबुद्धीने घेतलेला निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्याचा निषेध करत आज भाजप अकोला महानगर तर्फे पशुधन विकास मंडळ कार्यालय अकोला समोर निदर्शने करून घेतलेल्या निर्णयाचा निषेध करण्यात आला!!

सोमवार, ऑगस्ट ०३, २०२०

अकोला येथे बीएसएनएलच्या भारत एअर फायबर हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवेचे केले उद्घाटन

अकोला येथे बीएसएनएलच्या भारत एअर फायबर हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवेचे केले उद्घाटन


मुंबई, 2 ऑगस्ट 2020

केंद्रीय दूरसंचार, मनुष्यबळ विकास, इलेक्ट्रॉनिक्स आणि  माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी महाराष्ट्रातील अकोला येथे बीएसएनएलच्या भारत एअर फायबर सर्व्हिसेसचे उद्घाटन केले. यामुळे अकोला येथील इंटरनेट वापरकर्त्यांना  मागणीनुसार वायरलेस इंटरनेट जोडणी मिळतील. केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून बीएसएनएलकडून भारत एअर फायबर सेवा सुरू केली जात आहे आणि 20  केएम अंतरापर्यंत वायरलेस कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याचे उद्दीष्ट आहे. अशा प्रकारे बीएसएनएलद्वारे स्वस्त सेवा मिळाल्यामुळे दुर्गम ठिकाणच्या ग्राहकांना फायदा होईल. या व्यतिरिक्त, या सेवा वायरलेस आहेत आणि स्थानिक पातळीवर सेवांमध्ये व्यत्यय येण्याची शक्यता खूपच कमी आहे. या सेवा इतर ऑपरेटरंपेक्षा खास आणि वेगळ्या आहेत कारण बीएसएनएल अमर्यादित मोफत व्हॉईस कॉलिंग उपलब्ध करुन देत आहे. बीएसएनएलने  अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील सर्व रहिवाशांना या दर्जेदार आणि परवडणार्‍या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
भारत एअर फायबर सर्व्हिस दुर्गम भागातील ग्राहकांना रेडिओ वेव्हद्वारे शेवटच्या मैलापर्यंत पोहचण्यातील दरी साधून अतिवेगवान ब्रॉडबँड सेवा प्रदान करत आहे. बीएसएनएलने नजीकच्या टेलिफोन एक्सचेंज किंवा मोबाईल टॉवरपर्यंत ऑप्टिकल फायबरचे विशाल जाळे टाकले आहे आणि तेथून ग्राहकांना वायरलेसद्वारे जोडणी दिली जाते. या व्यतिरिक्त, बीएसएनएलने  या अतिवेगवान ब्रॉडबँड सेवेसाठी अकोला आणि वाशिम जिल्ह्यातील स्थानिक उद्योजक / बेरोजगार तरुणांना महसुलात वाटा देण्याबाबत करार केला असून त्याद्वारे ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना देत आहे.  ते दरमहा सुमारे एक लाख रुपये नियमित मासिक उत्पन्न मिळवून त्याद्वारे केंद्राच्या ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमांतर्गत स्वावलंबी बनू शकतील. हे मॉडेल संपूर्ण भारतात राबवण्यात येत आहे.
बीएसएनएलने विशेषत: ही वायरलेस भारत एअर फायबर सेवा अकोला येथून सुरू केली आहे. अकोला व वाशिम शहरात सर्वत्र रस्ता रुंदीकरणाच्या कामांमुळे आणि रस्ते जोडण्यामुळे बीएसएनएलची अखंड इंटरनेट जोडणी  मिळण्यात अकोला आणि वाशिममधील नागरिकांना अडचणी येत होत्या.  अकोला व वाशिम जिल्ह्यात बीएसएनएल अकोलाचे 435 बेस ट्रान्सीव्हर स्टेशन (बीटीएस) आहेत, त्यापैकी 193 बीटीएस हे 4G बीटीएस असून या जिल्ह्यांचा बहुतांश भाग व्यापला आहे.  केंद्रीय राज्यमंत्री धोत्रे यांनी उर्वरित 28 गावे देखील यात समाविष्ट  करण्याची सूचना केली असून लवकरच दोन्ही जिल्ह्यांमध्ये मोबाईल कव्हरेज असेल. या दोन जिल्ह्यांतील ग्राहकांना उत्तम दर्जाची  सेवा देण्यासाठी इतर विशेष कामांव्यतिरिक्त बीएसएनएलने पूर्ण कव्हरेजसाठी आणखी बीटीएसची योजना आखली आहे.
बीएसएनएल भारत एयर फायबर कनेक्टिव्हिटीची गती 50 एमबीपीएस आहे. बीएसएनएल वायरलाइन आणि वायरलेस विभागांमध्ये आकर्षक ब्रॉडबँड योजना देत आहे. महानगरांमधून  ग्रामीण भागात स्थलांतर होत असल्यामुळे सद्य परिस्थितीत हाय-स्पीड ब्रॉडबँड सेवेची मोठी मागणी आहे. लॉकडाऊन दरम्यान वर्क फ्रॉम होम (डब्ल्यूएफएच), ई-लर्निंग, ऑनलाइन शॉपिंग, गेमिंग आणि करमणूक इत्यादीमुळे ही सेवा लोकप्रिय होत आहे.
ही सेवा ग्रामीण भागासाठी परिवर्तन घडवणारी  ठरू शकते कारण इंटरनेट आणि सेन्सर यांचे एकात्मीकरण करून  मातीतील आर्द्रता रिअल-टाइम आधारावर जाणून घेता येईल  जेणेकरून सिंचनाचे नियोजन केले जाऊ शकते, परिणामी पाण्याची बचत होईल आणि त्याद्वारे उत्पादकता वाढेल. तसेच, दुभत्या जनावरांच्या मानेवर सेन्सर बांधले जाऊ शकतात, ज्यामुळे शरीराच्या तापमानाचे सतत नोंद करणे शक्य होईल जेणेकरुन कुठ्ल्यावेळी दूध जास्त आले हे जाणून घेता येईल.
उल्लेखनीय म्हणजे, बीएसएनएलने जुलै,2020 महिन्यात महाराष्ट्र परिमंडळात सुमारे 14,500  एफटीटीएच कनेक्शन दिले आहेत. बीएसएनएलने कोविड कंट्रोल रूम्स, जिल्हा कोविड रुग्णालये, हेल्पलाईन व देशभरातील कॉल सेंटर्सना चोवीस तास हाय-स्पीड इंटरनेट कनेक्शन दिले आहेत.
वेब बैठकीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांमध्ये बीएसएनएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक पी. के. पुरवार, सीएफएबीएसएनएलचे संचालक विवेक बन्जाल,  मनोजकुमार मिश्रा, सीजीएम महाराष्ट्र सर्कल आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. महाबीज अकोलाचे  व्यवस्थापकीय संचालक अनिल भंडारी,या वेळी उपस्थित होते.

शनिवार, जून ०८, २०१९

पारस वीज केंद्राचा देशात चवथा क्रमांक

पारस वीज केंद्राचा देशात चवथा क्रमांक

९६.९३ टक्के भारांक
संचालक पाच सूत्रीची किमया


पारस (अकोला)/प्रतिनिधी : 
केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १५ औष्णिक विद्युत केंद्रांची नुकतीच यादी जाहीर केली असून त्यामध्ये महानिर्मितीच्या २x२५० मेगावाट स्थापित क्षमतेच्या पारस औष्णिक विद्युत केंद्राचा चवथा क्रमांक आहे. यापूर्वी नुकतेच मे २०१९ मध्ये पारस वीज केंद्र सहाव्या क्रमांकावर होते. 

सर्वोत्तम कामगिरीत देशातील सार्वजनिक, शासकीय आणि खाजगी औष्णिक विद्युत केंद्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये अमरकंटक वीज केंद्र, मध्यप्रदेश (प्रथम-१००.०४ भारांक), एन.टी.पी.सी., तालचर ओरिसा (द्वितीय-९८.५२ भारांक), रिलायन्स ससान सिंगारोली मध्यप्रदेश (९७.८२ भारांक) तर महानिर्मिती पारस वीज केंद्र (९६.९३ भारांक).

सर्वोत्तम कामगिरी करणारे वरील तालचर,ससान हि दोन औष्णिक विद्युत केंद्रे कोळसा खाणीच्या अगदी जवळ आहेत. त्यामुळे कोळसा वहन खर्चात मोठी बचत होते व कोळसा सहज उपलब्ध होतो. पारस वीज केंद्र मात्र, कोळसा खाणीपासून किमान ३०० किलोमीटर दूर अंतरावर आहे. पारस वीज केंद्राला वेकोलि, महानदी कोल फिल्ड्स आणि एस.ई.सी.एल. च्या खाणींतून कोळसा पुरवठा करण्यात येतो. विविध तांत्रिक समस्यांवर वेळेत मात करून येथील कुशल मनुष्यबळाने आपल्या तांत्रिक ज्ञानाचा/कौशल्याचा परिचय दिला आहे. 

संचालक पाच सूत्री कार्यक्रमा अंतर्गत कमी कोळसा वापर, झिरो कोल डेमरेज, परिसरातील वातावरण सुधारणा व नवनवीन संकल्पना राबविण्यात येत असल्याने पारस वीज केंद्राची उत्तरोत्तर यशस्वी वाटचाल होत आहे आणि महानिर्मितीमध्ये क्रमांक एकचे विद्युत केंद्र म्हणून या केंद्राचा नावलौकिक असल्याचे डॉ.रवींद्र गोहणे यांनी सांगितले.

महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अरविंद सिंग, संचालक(संचलन) चंद्रकांत थोटवे, संचालक(वित्त) संतोष अंबेरकर, संचालक(खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, संचालक(प्रकल्प) वी. थंगपांडियन तसेच वरिष्ठ व्यवस्थापनाने टीम पारसचे विशेष अभिनंदन केले आहे.

मुख्य अभियंता डॉ. रविंद्र गोहणे, उप मुख्य अभियंता मनोहर मसराम, अधिक्षक अभियंता रूपेन्द्र गोरे यांनी सर्व अधिकारी, विभाग प्रमुख,अभियंता, तंत्रज्ञ आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले. आगामी काळात पारस वीज केंद्र देशात क्रमांक एकचे सर्वोत्तम कामगिरी करणारे वीज केंद्र होईल यादृष्टीने प्रत्येकाने आपले योगदान वाढविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन पारस वीज केंद्राचे मुख्य अभियंता डॉ.रवींद्र गोहणे यांनी केले.

मंगळवार, एप्रिल १६, २०१९

मतदानासाठी  अकोला जिल्हा प्रशासन सज्ज

मतदानासाठी अकोला जिल्हा प्रशासन सज्ज                अकोला दि.16: भारत निवडणूक आयोगाने घोषित केलेल्‍या निवडणुक कार्यक्रमानुसार ०६ अकोला लोकसभा मतदारसंघा करिता दिनांक १८ एप्रिल २०१९ रोजी मतदान घेण्‍यात येणार असून मतदानाची वेळ सकाळी ७.०० ते सायंकाळी ६.०० वाजे पर्यंत राहणार आहे.यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधिकक्षक एम.राकेश कलासागर, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हा निवडणुक अधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी शिवाजीराव दावभट, सहाय्यक निवडणुक अधिकारी गजानन सुरंजे, डॉ निलेश अपार, उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, खर्चाचे नोडल अधिकारी संतोष सोनी, श्री झुंजारे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

०६ अकोला लोकसभा मतदारसंघा करिता विधानसभा मतदारसंघ निहाय मतदान केंद्र निश्चित करण्‍यात आलेले आहेत
 विधानसभा मतदारसंघाचे नांव
मतदान केंद्राची संख्‍या
सहायक मतदान केंद्रांची संख्‍या
एकुण मतदान केंद्र
२८ अकोट
३३१
०८
३३९
२९ बाळापुर
३३५
११
३४६
३० अकोला पश्चिम
२८३
२८
३११
३१ अकोला पूर्व
३५०
०४
३५४
३२ मुर्तिजापूर
३८१
२०
४०१
३३ रिसोड
३२६
०८
३३४
एकुण
२००६
७९
२०८५
                सदर मतदान केंद्रा करिता खालीली प्रमाणे विधानसभा मतदान केंद्र निहाय झोनल ऑफीसर यांची नियुक्‍ती करण्‍यात आलेली आहे.
विधानसभा मतदारसंघाचे नांव
नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या झोनल ऑफीसर यांची संख्‍या
२८ अकोट
२४
२९ बाळापुर
२८
३० अकोला पश्चिम
२३
३१ अकोला पूर्व
३३
३२ मुर्तिजापूर
४०
३३ रिसोड
३०
एकुण
१७८
                                                            
                               कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या दृष्‍टीकोणातून संवेदनशील व अति संवेदनशील मतदान केंद्रावरुन वेबकॉस्‍टींगची सुविधा करण्‍यात आली आहे. त्‍याच प्रमाणे मतदारसंघात महिलांकडून संचालित होणारे सखी मतदान केंद्र राहणार आहेत
अ.क्र.
मतदारसंघ
मतदान केंद्र क्रमांक
सखी मतदान केंद्राचे नांव
२८ अकोट
१४५
श्री शिवाजी विदयालय अंजनगाव रोड अकोट
२९ बाळापुर
१३४
शासकीय उर्दु अध्‍यापक महाविदयालय पूर्वीकडील भाग औरंगपुरा बाळापुर
३० अकोला पश्चिम
१६४
मु्ंगीलाल बाजोरीया विदयालय खोली क्रमांक ३ अकोला
३१ अकोला पूर्व
२१६
सीताबाई कला महाविदयालय अकोला
३२ मुर्तिजापूर
१०४
पंचायत समिती कार्यालय मुर्तिजापूर
३३ रिसोड
२७३
शिवाजी विदयालय पूर्वीकडील भाग रिसोड
२९०
भारत माता मुलींची शाळा दक्षिणेकडील भाग रिसोड
                                ०६ अकोला लोकसभा मतदारसंघात खालील प्रमाणे आदर्श मतदान केंद्र सुध्‍दा स्‍थापन करण्‍यात येणार आहे
अ.क्र.
मतदारसंघ
मतदान केंद्र क्रमांक
आदर्श मतदान केंद्राचे नांव
२८ अकोट
१८४
श्री शिवाजी महाविदयालय दर्यापुर रोड अकोट
२४९
जि.प. प्राथमिक मराठी शाळा, खोली क्र. १, अकोली रुपराव
२९ बाळापुर
१३१
श्रीमती धनाबाई विदयालय शेळद खोली क्रमांक १
३० अकोला पश्चिम
२१०
गुरुनानक विदयालय खोली क्रमांक ३ अकोला
३२ मुर्तिजापूर
१०५
गाडगे महाराज विदयालयमुर्तिजापूर
                
अकोला लोकसभा मतदारसंघात अकोला पश्चिम मधील मतदान केंद्र क्रमांक २१३ गुरुनानक विदयालय, खोली क्रमांक ६, अकोला हा दिव्‍यांगा व्‍दारा संचालित मतदान केंद्र राहणार आहे.

दिनांक १७ एप्रिल २०१९ रोजी मतदान पथके त्‍यांना नेमून दिलेल्‍या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे मुख्‍यालया वरुन नियोजित मतदान केंद्रावर रवाना होणार असून मतदान पथकांचे परिवहन व्‍यवस्‍थे करिता एस टी महामंडळाची २०३ बसेस व ३९ मिनी बसेस वापरण्‍यात येणार आहेत. त्‍याच प्रमाणे ४१६ जीप गाडया व ईव्‍हीएम वाहतुकी करिता १५ ट्रक सुध्‍दा वापरण्‍यात येणार आहेत.

निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्राव्‍यतिरीक्‍त मतदानाची ओळख पटविण्‍या करिता आधार कार्ड, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र ( केंद्र / राज्‍य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनीने कर्मचा-यांना दिलेले ओळखपत्र), छायाचित्र असलेले बॅंकेचे पासबुक, पॅन कार्ड, NPR अंतर्गत RGI व्‍दारे दिले गेलेले स्‍मार्ट कार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालया व्‍दारे दिले गेलेले आरोग्‍य विमा स्‍मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्‍तीवेतन दस्‍तावेज, खासदार/आमदार/विधान परिषद सदस्‍य यांना दिलेले ओळखपत्र या ११ पुराव्‍याला मान्‍यता दिली असून सदर पुराव्‍यांपैकी कोणताही पुरावा मतदाराची ओळख पटविण्‍या करिता ग्राहय धरण्‍यात येईल.

लोकसभा निवडणुकी करिता निवडणूक आयोगाने खालील नमुद ५ निवडणूक निरीक्षकांची नेमणुक केलेली आहे.
मा. निवडणुक निरीक्षक  यांचा तपशिल
मा. निवडणूक निरीक्षक यांचे नांव
मोबाईल क्रमांक
निवडणुक निरीक्षक सामान्‍य
मा. श्री विनोदसिंह गुंजियाल
9921866668
निवडणुक खर्च निरीक्षक
मा. श्री नागेंद्र यादव
9718804188
मा. निवडणुक निरीक्षक कायदा व सुव्‍यवस्‍था
मा. श्री. कुलदीपसिंह
9921266662
मा. निवडणुक निरीक्षक दिव्‍यांग मतदार
मा. श्री. पियुष सिंह विभागीय आयुक्‍त, अमरावती
7798436337
                                मा. निवडणुक आयोगाचे निर्देशानुसार निवडणूक विषयक माहिती मिळविण्‍या करिता १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्‍यात आला असून आता पर्यंत १९९१ नागरीकांनी सदर क्रमांकावर संपर्क साधुन त्‍यांना आवश्‍यक असलेली माहिती पुरविण्‍यात आली आहे. नागरीकांना १९५० वर टोल फ्री नंबरवर संपर्क करण्‍यात अडचण येऊ नये या करिता १० हन्‍टींग लाईन सुध्‍दा कार्यान्वित करण्‍यात आल्‍या आहेत
                                मतदानाचे दिवशी प्रत्‍येक मतदाराला मतदान करता यावे या करिता शासनाने मतदानाचे दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर केलेली आहे त्‍याच प्रमाणे निवडणूक होणा-या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/ अधिकारी / कर्मचारी यांना मग ते कामानिमित्‍त निवडणूक होणा-या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्‍यांना निवडणूकीच्‍या दिवशी मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी भरपगारी सुटी देण्‍यात यावी सदर सुटी उद्योग, उर्जा व कामगार विभागांतर्गत येणा-या सर्व आस्‍थापना, कारखाने, दुकाने ईत्‍यादींना लागू राहील.  अपवादात्‍मक परिस्‍थतीत कामगार, अधिकारी, कर्मचारी ईत्‍यादींना पूर्ण दिवस सुटी देणे शक्‍य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्‍क बजावण्‍यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. असेही शासनाने जाहीर केले आहे
                                दिव्‍यांग मतदारा करिता प्रत्‍येक मतदान केंद्राचे ठिकाणी / मतदान केंद्राचे इमारतीचे ठिकाणी व्‍हील चेअर उपलब्‍ध करुन देण्‍यात आली असून आवश्‍यक प्रमाणात व्‍हील चेअर खरेदी करण्‍यात आलेल्‍या आहेत. प्रत्‍येक मतदान केंद्राचे ठिकाणी उन्‍हापासून संरक्षणाचे दृष्‍टीने शेड उभारण्‍यात आलेले आहेत तसेच पिण्‍याचे पाणी व इतर मुलभुत सोयी सुविधा देखील उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहे या शिवाय मतदान केंद्रावर मेडीकल किटची सुध्‍दा व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे.
                                मतदान केंद्राचे ठिकाणी दोन स्‍वयंसेवक तैनात ठेवण्‍यात येणार असून ते दिव्‍यांग मतदारांना मतदान कक्षात पोहोचण्‍या करिता सहकार्य करतील. अकोला ऑटो युनियन यांनी दिव्‍यांग मतदारांना त्‍यांचे घरापासून मतदान केंद्र पर्यंत ने-आण करण्‍या करिता निशुल्‍क सुविधा उपलब्‍ध करुन दिलेली आहे.       
मतदान जनजागृतीच्या प्रक्रिये मध्ये महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत लोकसंचालीत साधन केंद्र (CMRC), महाराष्ट्र राज्य ग्रामीण उपजिवीका अभियान (MSRLM) आणि शहरी भागातील राष्ट्रीय नागरी उपजिवीका अभियाना अंतर्गत एकुण 5 हजार स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयंसहाय्यता गटांच्या किमान 50 हजार महिलांपर्यत जावून संकल्प पत्राद्वारे मतदान करण्यासाठी स्विप समितीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
                निवडणूक मुक्‍त, निर्भय व शांततामय वातावरणात पार पाडण्‍यासाठी  मतदारांमध्‍ये स्‍वीप कार्यक्रमाचे माध्‍यमातून जनजागृती करण्‍यात येत असून कोणत्‍याही अपप्रचाराला किंवा आमीषला बळी न पडता स्‍वतःच्‍या सदसद विवेक बुध्‍दीने मतदान करण्‍या बाबत मतदारांना आवाहन करण्‍यात येत आहे. तसेच जिल्‍हयातील शस्‍त्र परवाना धारकांना त्‍यांचेकडील शस्‍त्र जवळच्‍या पोलीस स्‍टेशन मध्‍ये जमा करणे बाबत निर्देश देण्‍यात आलेले असून आता पर्यंत ३९८ परवाना धारकांचे शस्‍त्र पोलीस स्‍टेशन मध्‍ये जमा करण्‍यात आलेले आहे. कायदा व सुव्‍यवस्‍थेच्‍या अनुषंगाने पोलीस प्रशासना मार्फत आवश्‍यक प्रमाणात पोलीस बल तैनात ठेवण्‍यात आले असून संवेदनशील मतदान केंद्राचे ठिकाणी अतिरीक्‍त पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात येणार आहे.  नागरीकांना सुध्‍दा कोणतीही आक्षेपहार्य बाब निदर्शनास आल्‍यास त्‍या करिता CVIGIL अॅप व्‍दारे त्‍याबाबतची तक्रार करण्‍या करिता सुचना देण्‍यात आलेल्‍या असून आता पर्यंत CVIGIL अॅप व्‍दारे ३४  तक्रारी प्राप्‍त झाल्‍या असून प्राप्‍त ३४  तक्रारींचे निरसन करण्‍यात आले आहे. 
                दिनांक १६/०४/२०१९६ रोजी आयोजित पत्रकार परिषदेचे अनुषंगाने लोकसभा निवडणुकी बाबत सांख्यिकी माहिती
वाटप करण्‍यात आलेली टपाली मतपत्रिका
११७१
वितरीत निवडणुक कर्तव्‍य प्रमाणपत्र (EDC)
४२१८
इलेक्‍ट्रॉनिक ट्रांसफर्ड बॅलेट पेपर (ETPBS)
३४३०
क्रीटीकल मतदान केंद्रांची संख्‍या
१७
संवेदनशील मतदान केंद्रांची संख्‍या
१४६
अति संवेदनशील मतदान केंद्रांची संख्‍या
४८
ग्रामीण मतदान केंद्राचे ठिकाणांची संख्‍या  (Locations)
८६४
शहरी मतदान केंद्राचे ठिकाणांची संख्‍या  (Locations)
२२९
एकुण ठिकाणांची संख्‍या  (Locations)
१०९३
ग्रामीण मतदान केंद्रांची संख्‍या
१३३२
नागरी मतदान केंद्रांची संख्‍या
७५३
एकुण
२०८५
मतदान केंद्रात वापरण्‍यात येणारे

बॅलेट युनिटांची संख्‍या
२०८५
कंट्रोल युनिटांची संख्‍या
२०८५
VVPAT ची संख्‍या
२०८५
राखीव ठेवण्‍यात आलेल्‍या

बॅलेट युनिटांची संख्‍या
४९८
कंट्रोल युनिटांची संख्‍या
४९७
VVPAT ची संख्‍या
६८३
वेबकॉस्‍टींग करण्‍यात येणा-या मतदान केंद्रांची संख्‍या
२१२
नियुक्‍त करण्‍यात आलेले सुक्ष्‍म निरीक्षकांची संख्‍या
६२
नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या

भरारी पथक
२८
स्थिर सर्वेक्षण पथक
२१
व्‍हीडीओ पाहणी पथक
०८