Top News

खासदार बाळू धानोरकर निधन : पार्थिव थेट वरोरा येथे दाखल | MP Balu Dhanorkar

आज वरोरा येथे अंत्यदर्शन उद्या अंत्यसंस्कार समर्पित सेना कार्यकर्ता ते काँग्रेस खासदार केला प्रवास Congress’s only Lok Sabha MP from Maharas...

ads

बुधवार, मार्च ०८, २०२३

इन्स्टाग्रामवर लिहिले गुड बाय; चंद्रपूरात भंडाऱ्याच्या तरुणीची आत्महत्या | Good bye wrote on Instagram

WhatsApp share | Share on WhatsApp

इन्स्टाग्रामवर लिहिले गुड बाय; चंद्रपूरात भंडाऱ्याच्या तरुणी आत्महत्या

चंद्रपूरा


 आपल्या Instagram इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन एक सेल्फी पोस्ट करीत 'हा माझा शेवटचा फोटो आहे. गुड बाय ऑल' अशी कॅप्शन देत त्यानंतर आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जागतिक महिला दिनी (Jagtik mahila din) पहाटेच्या सुमारास चंद्रपूर (chandrapur) शहरात  गायत्री रामटेके हिने आत्महत्या केली.  ही तरुणी चंद्रपूर शहरातील घुटकाळा वॉर्डमध्ये भाड्याच्या घरात राहत होती. गायत्री ही मूळची भंडाऱ्यातील होती. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी गायत्री चंद्रपूरमध्ये वास्तव्यास होती.आज पहाटेच्या सुमारास गायत्रीने स्वत:च्या राहत्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली.या तरुणीने अचानक असा टोकाचा निर्णय का घेतला याबद्दल वेगवेगळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या तरुणीच्या आत्महत्येची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणीच्या रुमची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी रुम सील केली आहे. तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. अधिक तपास सुरु आहे.


Good bye wrote on Instagram; Bhandara's young woman commits suicide in Chandrapur 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.