Top News

डिजिटल मीडियाचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश | digital media

*‘ व्हॉईस ऑफ मीडिया’च्या लढ्याला मोठे यश* *ईलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल, रेडिओ आस्थापनांचा श्रमिक पत्रकार वर्गवारीत समावेश* *मुंब...

ads

शुक्रवार, मार्च १७, २०२३

शिक्षक संपावर गेल्याने गावातील तरुणांनी भरवली शाळा; तरुणांचा उपक्रम बघून अनेक जण भारावले


As teachers went on strike, the youth of the village filled the school; Many people were impressed by the activities of the youth

सावली; अंशदायी पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणी करिता राज्यातील कर्मचारी मागील चार दिवसापासून बेमुदत संपावर आहेत. तालुक्यातील अंतरगाव येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे शिक्षक संपात सहभागी झालेत. मागील चार दिवसांपासून शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
सावली तालुक्यातील अंतरगाव येथे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा आहे. पहिली ते पाचवीच्या वर्गा पर्यंत असून, परीक्षा जवळ आली असून अभ्यासक्रम सुध्दा पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पालकात मोठी चिंता वाढली. शाळेचे व्यावस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य आणि गावातील चार ते पाच सुशिक्षित बेरोजगार युवक युवती यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक होणार नाही याची जबाबदारी घेऊन मागील चार दिवसापासून गावातील सुशिक्षित तरुण तरुणी विद्यार्थ्यांना शिकवीत आहेत.
   शिक्षक संपात सहभागी झाले असल्याने जी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्याची लिंक लागली होती ती लिंक तुटू नये अशी मंशा उराशी बाळगून अंतरगाव येथील सुशिक्षित तरुण तरुणीनी मुलांना शिकविण्याची जबाबदारी घेऊन आपले कर्तव्य पार पाडीत आहे. त्यांना पालक, शाळा व्यावस्थापन समिती यांचे सहकार्यातून शाळा सुरळीत सुरू आहे.   
      विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसान बाबत पंचायत समिती प्रशासन आणि जी.प. शिक्षन विभाग यांनी विद्यार्थ्याची गैरसोय होणार नाही यासाठी सुरळीत शाळा सुरू राहील याबाबतची काळजी घ्यावी अशी मागणी या परिसराचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री खुशाल लोडे यांनी केली आहे.    मुलांना शिकवनी देणारे युवक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य राकेश तेलकापल्लिवार, नितीन चीमुरकर, तानाजी राऊत, मुक्तेश्वर मस्के, मुरलीधर बारापात्रे, राजू नागोसे, कुमारी शीतल भैसारे, सविता सहारे, याशिका नागोसे, नरेश करकाडे, भास्कर करकाडे, शैलेश देशमुख इत्यादी सुशिक्षित तरुण तरुणी विद्यार्थांना शिक्षणाचे धडे गिरवित असून त्यांना शाळा व्यावस्थापण समितीचे आणि पालकाचे सहकार्य लाभले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.