Top News

Civil20 India Inception Meet starts at Nagpur

  The future belongs not to single entities but to those who cooperate and mingle and everyone must obey the universal law of inclusion: Cha...

ads

बुधवार, फेब्रुवारी ०८, २०२३

ताडोबात वाघाने केला हल्ला; वृद्ध जागीच ठार Tadoba-Andhari Tiger Reserve




ताडोबात वाघाने केला हल्ला; वृद्ध जागीच ठार 



चंद्रपूर chandrapur । ताडोबा अंधारी व्याघ्र (Tadoba-Andhari Tiger Reserve) प्रकल्पअंतर्गत मोहर्ली (बफर) वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. 874  मध्ये वाघाच्या हल्लात एक वृद्ध ठार झाल्याची घटना आज दि. 08 फरवरी 2023 रोजी सकाळी 11.00 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. (waghacha halla)

शेत कुंपण करण्याससाठी मोहर्ली (बफर) TATR जंगलात वृद्ध नीलकंठ नन्नावरे व अडकू जेंघठे दोघे चपाट्या आणण्यासाठी गेले होते. अचानक वाघाने येऊन  नीलकंठ नारायण नन्नावरे वय (59) या  वृद्ध व्यक्तीवर हल्ला करून ठार केले. वाघाच्या हल्ला होताच जवळ असलेल्या अडकू जेंघठे यांनी आरडाओरडा केला. पण वाघाने नीलकंठला काही सोडले नाही व त्याला आत जंगलात 50 मीटर अंतरावर ओढत नेले.


हे बघून अडकू जेंगठे लगेच गावाकडे परत आले व ग्रामस्थांना सूचना दिली व ग्रामस्थांना मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालय यांच्याशी सम्पर्क केले. माहीती मिळताच वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे (Santosh Thipe) , क्षेत्र सहाय्यक मोहर्ली संजय जुमडे, क्षेत्र सहाय्यक मोहर्ली (कोअर) व्ही. बी. सोयाम,  क्षेत्र सहाय्यक आगरझरी एस.एल.बालपाने,  वनरक्षक जनबंदु,वनमजूर व ग्रामस्थ घटना स्थळी दाखल झाले.  मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांच्या समक्ष मौका पंचनामा करण्यात आला व घटना स्थळी कॅमेरा ट्रॅप (Camera trap) लावण्यात आले  असून पुढील कारवाही वनविभाग करीत आहे.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.