Top News

भव्य पूजापाठ आणि रॅलीतून अयोध्येला जाणार चंद्रपूरचा लाकूड

अयोध्येतील राम मंदिर उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या (Ram Temple) उभारणीत वापरलेले सागवान लाकूड (Teak Wood) महाराष्ट्रात...

ads

बुधवार, फेब्रुवारी ०८, २०२३

धक्कादायक : चंद्रपुरातील या बारमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश । बेकायदेशीर कृत्याला कुणाचे अभय Bar and Restaurant, Chandrapur

 एनडी बारचा परवाना रद्द करा...

पप्पू देशमुख यांची पालकमंत्र्यांकडे तक्रार 

चंद्रपूर Chandrapur : शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये वाहन तळाच्या जागेत असलेल्या एनडी रेस्ट्रो बार समोर मद्यप्राशन करून झोपलेला  उमंग दहिवले यांच्या शरीरावरून एकापाठोपाठ दोन वाहन गेल्याने ५ फेब्रुवारीला मृत्यू झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करावी तसचे या बारसंदर्भात अनेक तक्रारी असल्याने तो बार बंद करावा, अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.  Bar and Restaurant, Chandrapur


एनडी रेस्ट्रो बार (

ND Restro Bar 

) नियम डावलून रात्री ३ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येते. या बारमध्ये अल्पवयीन मुला-मुलींना प्रवेश देण्यात येतो. ND Restro Bar Dance club & nightclub अशा अनेक नागरिकांच्या तक्रारी आहेत. या बारमध्ये मारहाणीच्या गंभीर घटना घडल्या आहेत. मात्र पोलीस विभागाकडून कारवाई करण्यास नेहमी टाळाटाळ करण्यात येते. या बारला परवाना देताना नियम डावलण्यात आले. त्यामुळे या बारचा परवाना रद्द करण्यात यावा, तसेच चंद्रपूर शहर व जिल्ह्यात नियम डावलून लोकवस्तीमध्ये मंजुरी देण्यात आलेल्या सर्व दारू दुकानांचे परवाने रद्द करण्यात यावे, दारू दुकान वाटप करताना मोठा गैरव्यवहार झाला असून या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी करून राज्य उत्पादन शुल्क विभाग जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस विभागातील दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देशमुख यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या निवेदनातून जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रपूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.   Bar and Restaurant, Chandrapur


ND Restrobar, Chandrapu

r या बारला मंजूरी देण्याच्या काही दिवसांपूर्वीच रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये गोळीबारची घटना घडली होती. या परिसरामध्ये मनपाचे माजी नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर अज्ञात गुंडांनी हल्ला केला होता. कायदेशीर दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये या बारला नियम डावलून परवानी देण्यात आली. रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या पूर्वेला हिंदी सिटी व मराठी सिटी हायस्कूल तसेच पश्चिमेला लागून लोकमान्य कन्या विद्यालय आहे. रघुवंशी काँग्रेसमध्ये अनेक शैक्षणिक संस्था व्यापारी संकुल असल्यामुळे दिवसभर महिला व मुलींची वर्दळ असते. बार सुरू झाल्याने या ठिकाणी येणाऱ्या महिला व मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे. या सर्व बाबीकडे हेतू पुरस्कार डोळेझाक करून पोलीस विभागाने राज्य उत्पादन शुल्क विभागाला सकारात्मक अहवाल सादर केला. त्यामुळे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप सुद्धा देशमुख यांनी केला आहे. 
 Bar and Restaurant, Chandrapur | pradip Deshmukh

Bar and Restaurant, Chandrapur
file photoSHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.