Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

शुक्रवार, जानेवारी १३, २०२३

हायर कॉस्टमुळे प्रलंबित प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेची कामे अखेर मंजूर*खासदार बाळू धानोरकर यांचे प्रयत्नांना यश*

Works of Pradhan Mantri Gramsadak Yojana, pending due to higher cost, finally approved*चंद्रपूर : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकुन 176 किमी रस्त्याच्या बांधकामाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 135 किमी रस्त्याच्या कामांना मंजूरी होऊन 33 किमी ची कामे हायर कॉस्टमुळे रखडली होती. या संदर्भात खासदार बाळु धानोरकर यांनी दिल्ली येथे केंद्रीय ग्रामिण विकास राज्यमंत्री यांची दि. 21.12.2022 रोजी कृषीभवन मध्ये प्रत्यक्ष भेट घेऊन या कामांच्या मंजूरीबाबत आग्रही भूमिका घेतली होती.

प्रधानमंत्री ग्रामसडक टप्पा 3 मधील हायर कॉस्टमुळे प्रलंबीत प्रस्तावासंदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी सातत्याने पाठपूरावा करुन या कामांना मंजूरी मिळवून दिली. यात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वांढली ते निलजई-आमडी-न्यु सोईट राज्यमार्ग क्र. 371 माढेळी रोडचा 13.84 किलोमीटर चा समावेश असून सिंदेवाही येथील मेजर डिस्ट्रीक्ट रोड (MDR) 43 रामाळा व नागभीड तालुक्यातील मेजर डिस्ट्रीक्ट रोड 34 पाहर्णी राज्यमार्ग 353 चा समावेश आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत रखडलेली कामे तात्काळ पुर्ण करण्यासाठी यापुर्वीही खासदार बाळु धानोरकर यांनी केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेतली होती. ही सर्व कामे मंजूर करण्यात खासदार बाळू धानोरकर यांचे प्रयत्नांना यश आले. आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.