Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

मंगळवार, जानेवारी ०३, २०२३

Voice of Media : गडचिरोली जिल्ह्याची कार्यकारणी जाहीर


व्हाईस ऑफ मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी व्येंकटेश दुडम्मवार तर उपाध्यक्षपदी आनंद दहागावकर, सरचिटणीसपदी कैलाश शर्मा यांची नियुक्ती
गडचिरोली- व्हाईस ऑफ मिडीया संघटनेची गडचिरोली जिल्हा कार्यकारीणी आज 3 जानेवारी 2023 रोजी स्थानीय इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहात आयोजित बैठकीदरम्यान गठीत करण्यात आली. या बैठकीत व्हाईस ऑफ मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी व्येंकटेश दुडम्मवार तर सरचिटणीस पदी कैलाश शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली.

व्हाईस ऑफ मिडीयाच्या जिल्हा कार्यकारीणीमध्ये कार्याध्यक्ष म्हणून नासीर हाशमी, महेश गुडेंटीवार, उपाध्यक्ष आनंद दहागावकर, नंदकिशोर वैरागडे, शरीप कुरेशी, क्रिष्णा वाघाडे, सहसरचिटणीस मुक्तेश्वर म्हशाखेत्री, कोषाध्यक्ष संदीप कांबळे, कार्यवाहक किशोर खेवले, निलेश सातपुते, संघटक सतीश राचर्लावार, विनोद नागपूरकर, गोविंद चक्रवर्ती, राजू सहारे, प्रवक्ता विष्णू वैरागडे, प्रसिध्दी प्रमुख दुर्योधन तरारे, सदस्य नितीन ठाकरे, दिगांबर जवादे, सचिन जीवतोडे यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी पत्रकारांच्या हिताच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. बैठकीला व्हाईस ऑफ मिडीया संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व पत्रकार उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.