Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

गुरुवार, जानेवारी १९, २०२३

चंद्रपूर शहरात कापडी पिशवी कुठे मिळणार? मनपाचा नवा विकल्प थैला उपक्रम vikalpthaila.comचंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत प्लास्टीक पिशवीला विकल्प किंवा पर्याय म्हणुन विकल्प थैला उपलब्ध करून दिला असुन सदर विकल्प थैला म्हणजेच कापडी पिशवी आहे. महीला बचत गटाद्वारे बनविल्या जाणाऱ्या या कापडी पिशवीवर QR कोड उपलब्ध असुन या QR कोडला मोबाईलने स्कॅन करताच कापडी पिशवी मिळण्याच्या ठिकाणांची माहीती मिळते.सदर उपक्रमाचे आज मनपातर्फे उदघाटन करण्यात आले.    https://vikalpthaila.com/userinfo/    

       इंटरनेट वर vikalpthaila.com या संकेतस्थळावर ( वेबसाईट ) वर जाऊन क्लिक केल्यास किंवा कापडी पिशवीवरील QR कोडला मोबाईलने स्कॅन केल्यास ज्या परीसरातील दुकानातुन विकल्प थैला घ्यायचा असेल तो परीसर निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. दुकानाचा पर्याय निवडतात दुकानासंबंधीत आवश्यक ती माहीती जसे दुकानाचे नाव, गुगल लोकेशन, मोबाईल क्रमांक इत्यादी पाहता येते.  
       नोंदणी केलेल्या दुकानातुन कापडी पिशवी माफक शुल्क देऊन खरेदी करता येणार आहे. छोटी थैली १० रुपये तर मोठी थैली १५ रुपयांना मिळणार असुन काम पुर्ण झाल्यावर सदर कापडी पिशवी दुकानदारास परत करण्याचाही पर्याय नागरीकांना उपलब्ध असणार आहे. पिशवी परत केल्यास काही अंशी रक्कम दुकानदार ठेऊन उरलेली रक्कम परत करेल अथवा दुकानातुन सामान खरेदी केल्यास त्यावर सुट देईल. दुकानदारांनी या मोहीमेत सहभागी होण्यास रफीक शेख यांच्याशी ९४२३४१६७२६ या क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व दुकानदार व व्यापारी यानी विकल्प थैला दुकान म्हणून नोंदणी करुण घ्यावी आणी विकल्प थैला ग्राहकांना उपलब्ध करुन द्यावा प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर बंद करावा.  
       सदर बैठकीस सहायक आयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉ. अमोल शेळके, रफीक शेख, डॉ. पालीवाल, डॉ गोपाल मुंदडा, सदानंद खत्री, व्यापारी संघटना, फुटपाथ असोसिएशन, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधि व मनपा उपद्रव पथकाचे कर्मचारी उपस्थीत होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.