Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

मंगळवार, जानेवारी ०३, २०२३

महालक्ष्मी अनसूया माता ब्रह्मलीन दिनानिमित्त विविध धार्मिक सोहळा Mahalakshmi Anasuya Mata



विश्वमोहिनी अनसूया माता (पारडसिंगा निवासिनी) यांच्या मंगळवार दिनांक १० जानेवारी २०२३ रोजी २५ व्या ब्रह्मलीन दिनानिमित्त माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख, मा. मंत्री रमेशजी बंग, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते, गिरीश चंद्रशेखर वऱ्हाडपांडे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहीरकर आणि बजरंगसिंह परिहार यांना आमंत्रित केले आहे. तसेच राजाभाऊ चिटणीस, मा. प्रभाकरराव देशमुख, सरपंच सौ. इन्द्रायणी काळबांडे, उपसरपंच मा. कैलासजी गिरी, हर्षलता गौतम मेश्राम, मंगलाताई रडके, जि. प. सदस्या सौ. रश्मी कोटगुले, श्री. सुभाष वऱ्हाडे, डॉ. रमेश पाटील, मा. गणेश धानोरकर यांच्या उपस्थितीत अनसूया माता मंदिर शांती विद्या भवन डिगडोह प्रांगणात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे.

सकाळी ७.३० ते ९ .०० वाजेपर्यंत मातेचे मंगलस्नान आचार्य विवेक त्रिपाठी व रामजी त्रिपाठीसह पूजा, अर्चना, होम, हवन कार्यक्रम होईल. सकाळी ९.३० वाजता दिंडी सोहळा डिगडोह (देवी) येथे प्रदक्षिणा जगदीश बँड पार्टी देविदास अडांगळे यांच्या मंगलधून सहीत काढण्यात येईल. सकाळी १०.०० वाजता महाप्रसाद वितरण करण्यात येईल. दिलीप पनकुले परिवार आयोजित कार्यक्रमाला आपली सेवा रुजू करावी, ही विनंती.


दुपारी ११. ३० वाजता छप्पनभोग व नैवेद्य चढविण्यात येईल. दुपारी १.०० ते ३.०० वेदाचार्य आचार्य विवेक त्रिपाठी व रामजी त्रिपाठी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. दुपारी ४.०० ते ६.०० जय दुर्गा भजन मंडळ, डिगडोह व ६.०० ते ७.३० मा. दत्ता गणोरकर अनसूया भजन मंडळ आयोजित मंडळाचे भजन होईल. सायंकाळी ७.३० वाजता महाआरती, गोपाल कला व महाप्रसाद वितरण करण्यात येईल. कार्यक्रमासाठी प्राची प्रवीण ढोले, सौ, वैशाली रोहित उपाध्ये, सौ. अनुराधा अनंत खोकले, सौ, सुचिता बाराहाते, पी. एस. चौबे, सोपानराव शिरसाट, वसंतराव घटाटे, राजेंद्र आसलकर, तात्यासाहेब मते, प्रा. एस. के. सिंह, राहुल पांडे, विजय कोटगुले, अभिजित शेंडे, नितीन रडके, योगेश मोहुर्ले, दीपक रडके, फैजल शेख, भीम तिवारी, अंकित कोल्हे, अनिता फ्रांसीस, ममता ढोरे, अनिल यावलकर, अजय धोटे, संजय शेवाळे, सौ. श्रृती सुधीर मुलमुले, सरदार रवींद्र मुल्ला, प्रमोद वानकर, बबलू चौहान, देविदास अडांगळे, गजानन मुळे आदि भक्तगण, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.