Top News

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत अल्पसंख्यांक समाजातील युवक युवतींसाठी अल्पमुदतीचे अभ्यासक्रम

    चंद्रपूर (प्रतिनिधी)-     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चंद्रपूर येथे अल्पसंख्यांक समाजातील शिख, ख्रिश्चन, जैन, मुस्लिम, नवबौद्ध युव...

ads

बुधवार, जानेवारी १८, २०२३

वाघाने घेतली झेप! जीव वाचविण्यासाठी नदीच्या पाण्यात घेतली उडी | Chandrapur Tiger

वाघाने घेतली झेप! जीव वाचविण्यासाठी नदीच्या पाण्यात  घेतली उडी | Chandrapur Tiger
वाघाने घेतली झेप! जीव वाचविण्यासाठी नदीच्या पाण्यात  घेतली उडी | Chandrapur Tiger 




शिरीष उगे (तालुका प्रतिनिधी )

वरोराTiger  वाघाच्या ठशांचे चे फोटो काढत असताना अचानक दबा धरून बसलेल्या वाघाने दोन व्यक्तींवर झेप घेतल्याने दोघांनी पळून जात जीव वाचविण्यासाठी नदीच्या पाण्यात उडी घेतली. यामुळे थोडक्यात दोन व्यक्तींचे प्राण बचावले. माढेळी जवळील वडगाव शेतशिवारात ही घटना घडली. Tiger attack

वरोरा तालुक्यातील माढेळी या गावा जवळच असलेल्या वडगाव या गावाच्या शिवरामध्ये हरिदास तुरणकर यांच्या शेतशिवारात गायी गुरे चरत होते. दरम्यान गायीवर हल्ला करण्यासाठी एक पट्टेदार वाघ दबा धरून बसला असल्याचे दृश्य हरिदास तुरणकर यांना दिसले. वाघाला पाहून घाबरून जात ते झाडावर चढून गावातील लोकांना त्यांनी मोबाईलद्वारे ही माहिती कळविली. गावातील 20 ते 25 लोक पट्टेदार वाघाला बघण्यासाठी शिवाराकडे आले. 

Chandrapur News 

यावेळी उपसरपंच प्रफुल आसूटकर उपसरपंच शैलेश असुटकर हे दोघेही खाली जमिनीवर वाघाचे ठसे दिल्याने त्याचे फोटो काढत असताना झुडपातून वाघ बाहेर आला. व डरकाळी फोडून प्रफुल आसूटकर आणि शैलेश आसुटकर यांच्यावर झेप घेतल्याने दोघेही खाली दोन्ही बाजुला पडले व जोरात धावत जाऊन जवळच असलेल्या नदीच्या पाण्यात उडी घेतली. त्यानंतर नदीत पोहून दुसऱ्या बाजूच्या थडीतून बाहेर निघाले. tiger safari 

समयसूचकता दाखवत नदीत उडी घेतल्याने त्यांचा जीव थोडक्यात वाचला असेच म्हणावे लागेल. मात्र उपसरपंच प्रफुल आसूटकर यांच्यावर वाघाने झेप घेतल्यामुळे खाली पडल्याने त्यांच्या हाताला जबर दुखापत झाली आहे. जवळच नदी असल्याने दोघांचा जीव वाचला असून जीवितहानी टळली आणि वाघ दिसल्याने या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. wagh halla

वनविभागानी याकडे लक्ष देऊन त्वरित वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. हा वाघ बामरडा गावाच्या दिशेने गेला असून या परिसरामध्ये सुद्धा भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

Tiger  tadoba andhari Tiger Reserve india 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.