Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, जानेवारी ०२, २०२३

*समाजकार्य महाविद्यालय कामठीचे तीन विद्यार्थी मेरिटमध्ये | Social Work College


 हर्षिता नितनवरे |  राहुल  शामकुवर| ज्योत्स्ना  कालसर्पे 

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे नुकतीच बॅचलर ऑफ सोशल वर्क पदवी परीक्षा-२०२२ ची गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली असून समाजकार्य महाविद्यालय कामठी येथील कु. हर्षिता सुदेश नितनवरे या विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीत प्रथम स्थान प्राप्त केले आहे. विद्यापीठाद्वारे प्रसिद्ध झालेल्या १० मेरिट विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये समाजकार्य महाविद्यालय, कामठी येथील तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.


या विद्यार्थ्यांमध्ये कुमारी हर्षिता सुदेश नितनवरे हिने प्रथम स्थान (1st Merit), राहुल योगेश शामकुवर या विद्यार्थ्याने द्वितीय स्थान (2nd Merit) तर ज्योत्स्ना झनकलाल कालसर्पे या विद्यार्थिनीने गुणवत्ता यादीत नववे स्थान (9th Merit) प्राप्त केले आहे. प्रथम व द्वितीय मेरिटसह तीन विद्यार्थी मेरिटमध्ये येणारे समाजकार्य महाविद्यालय कामठी हे रा. तु. म. नागपूर विद्यापीठातील एकमेव महाविद्यालय असल्यामुळे महाविद्यालयात अत्यंत उत्साहाचे वातावरण आहे. महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.पुरणचंद्र मेश्राम यांनी गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले असून सर्व प्राध्यापकांना शुभेच्छा दिल्या.


प्राचार्य डॉ. रुबीना अन्सारी, प्रा. उज्वला सुखदेवे, डॉ. प्रणाली पाटील, डॉ.राष्ट्रपाल मेश्राम, डॉ. ओमप्रकाश कश्यप, डॉ.मनोज होले, डॉ.सविता चिवंडे, डॉ. निशांत माटे, प्रा. शशिकांत डांगे, डॉ. मनीष मुडे, डॉ. हर्षल गजभिये, डॉ.राहुल जुनगरी, प्रा. राम बुटके, प्रा. गिरीश आत्राम, प्रा. आवेशखरणी शेख यांनी सर्व गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.

Three Students of Social Work College Kamthi in Merit*


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.