Top News

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार | national budget development: Sudhir Mungantiwar

मुंबई, दि. 1 फेब्रुवारी 2023: आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्र...

ads

रविवार, जानेवारी १५, २०२३

विद्यार्थ्यांना मिळाले करिअर घडवण्याचे मार्गदर्शन

न.प. गांधी विद्यालय, बल्लारपूर येथे व्यवसाय मार्गदर्शन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मिळाले करिअर घडवण्याचे मार्गदर्शन




दि. १४/०१/२०२३ हा दिवस व्यवसाय मार्गदर्शन दिन मनुन साजरा करण्यात येतो त्या अनुसंघाने न.प.गांधी विद्यालय,बल्लारपूर शाळेतील इयत्ता ९वी आणि १०वी च्या विद्यार्थ्यांकरिता व मुलांच्या उज्वल भविष्या करिता चालू असलेल्या व्यवसाय शिक्षणातर्गत करिअर गाईडन्स सेमिनार आयोजित करण्यात आले. त्यात 10 वी-12वी नन्तर पुढे शिक्षण क्षेत्रात तसेच व्यवसायात कश्यापद्धतीने आपला मार्ग निवडायचा असतो याबद्दल सखोल माहिती श्री. विजय दुपारे, आणि श्रेयस कोडापे यांनी विद्यार्थ्यांना दिली असून मुलांच्या मनात असलेल्या प्रश्नाचे  समाधान करण्यात आले.

 कार्यक्रमाचे आयोजक सौ.शारदा परचाके (मुख्याध्यापिका),श्री. प्रफुल मुने  (व्यवसाय शिक्षक), श्री.आशिष राजनहिरे (व्यवसाय शिक्षक) यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम घेण्यात आला.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.