Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

गुरुवार, जानेवारी १२, २०२३

व्याहाड गावाजवळ कोल्ह्याचा अपघाती मृत्यू #Road #Accident #marathinews #fox

व्याहाड गावाजवळ नर कोल्ह्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत अपघाती मृत्यू,

 डिसेंबर महिन्यात ह्याच महामार्गावर अजयपूर येथे एका मादी कोल्हीचा मृत्यू झाला होता.

मादी तब्बल एक तास मृतदेहाजवळ वाट बघत होती, मादी ला काय झालं आहे ते कळत नसल्याने, तो कोल्हा  परिवारासोबत  येईल ह्या आशेवर ती मादी मृतदेहाच्या बाजूला बसून होती, हृदयाला दुखावेल अशी दुदैवी घटना NH -९३० ह्या महामार्गावर घडली आहे, हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे सदस्य  प्रशांत खोब्रागडे हे गडचिरोली वरून चंद्रपूर कडे  येतांना त्यांना रस्त्यावर एक प्राणी मृतावस्थेत आढळला,  त्यांनी हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी चे अध्यक्ष दिनेश खाटे  यांना फोनवरून माहिती दिली, लगेच त्यांनी व त्यांचे सहकारी नयन कुंभारे, श्रीकांत अडूर यांनी  घटना स्थळ गाठलं, आणि नर कोल्हा हा मृतावस्थेत आढळलेला निदर्शनास आलं , NH -९३० हा  महामार्गावर भरधाव वेगाने वाहने चालत असतात, आणि त्याच वेगात जाणाऱ्या वाहननाने नुकत्याच जन्मलेल्या कोल्ह्याचा पिल्लांचा पितृत्व हिरवल्याची दुर्दवी घटना व्याहाड येथे घडली.
 कोल्ह्याचा जोडीदार जीवनभर एकच असतो, विनीच्या हंगामात नर मादिला संरक्षण देतो, विनीचा काल ऑक्टोबर डिसेंबर महिन्यात असतो व गर्भधारणा ६३ दिवसांचा कालावधी घेतात त्याच काळात कोल्ह्याचा अपघातात मृत्यू झाला
वाघांचे भ्रमणमार्ग सुरक्षित राहावे ह्याच्यासाठी सर्व वन्यजीव प्रेमी वनविभाग प्रयत्न करतांना दिसतात पण जंगलाचा भाग नसलेला, शेतीचा गवताळ  भागात असलेल्या भागात कोल्हा ,लांडगा , खोकड, तडस ह्या प्राण्याचा सुद्धा विचार करणे गरजेचे असल्याचे चित्र आपण स्पष्ट बघत आहो, आणि तसे नियमावली आहे सुद्धा पण NH -९३० बांधत असतांना ना NHAI ना  वनविभागानी ह्या प्राण्यांसाठी  ऍग्रीकल्चर फील्ड मधून रस्ता जात असला तरी उपशमन योजना राबवली नाही, त्याचे आज गंभीर  परिणाम ह्या मुक्या वन्यप्राण्यांवरती पडत आहे, असे असंख्य वन्यप्राणी रस्त्यावरती मरतात, जाणारे येणारे लोक बघून दुर्लक्ष करतात, पण त्यांना हि माहिती वनविभागाला द्यावी किंवा वन्यजीव संस्थांना द्यावी असं त्यांना गरजेचं वाटत नाही पण तोच वाघ , बिबट जर असता तर मात्र गर्दी झाली असती.
आपण समतोल राखण्यात पावलोपावली अपयशी ठरत आहोत, आपण लोकसंख्या वाढत आहे म्हणून विकासाच्या नावावर मोठमोठे रस्ते बनवत आहो पण वन्यप्राण्यांचा विचार हा फक्त जंगल जिथे आहे तिथेच केला जातो, जंगल नसलेल्या ठिकाणच्या वन्यप्राणीच काय? हा एक गंभीर प्रश्न निर्माण होतो म्हणून हॅबिटॅट कंझर्वेक्षण सोसायटी वतीने महामार्ग प्रशासन वनविभाग यांना  ऍग्रीकल्चर फील्ड मध्ये सुद्धा उपशमन योजना राबवावी हि विनंती करण्यात आली आहे.
घटनेची माहिती  वनविभागाचे सावली चे वनपरिक्षेत्र अधिकारी वीरूटकर यांना देण्यात आली त्यांनी घटनास्थळी त्यांचे क्षेत्र सहाय्यक  श्री.चौधरी यांना पाठवले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.