Top News

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार | national budget development: Sudhir Mungantiwar

मुंबई, दि. 1 फेब्रुवारी 2023: आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्र...

ads

बुधवार, जानेवारी १८, २०२३

OTT Releases in January । जानेवारीत कोणते सिनेमा आणि वेबसीरिज रिलीज होणार

OTT Releases in January । जानेवारीत कोणते सिनेमा आणि वेबसीरिज रिलीज होणार


OTT Releases in January । आता या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये देखील OTT प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) लोकांना मनोरंजनाची कमतरता भासणार नाही. जानेवारी महिन्यात कोणते सिनेमा आणि ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेबसीरिज रिलीज होणार आहेत, याची यादी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.


Bollywood movies on OTT । There are some much-anticipated Bollywood movies lined up for release on different OTT platforms like Netflix, Amazon Prime Video, Zee5, and others in January 20223.


Drishyam 2 । Vikram Vedha । Mission Majnu । Uunchai । Chattriwali ।



मिशन मजनू । MISSION MAJNU
बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांचा 'मिशन मजनू' हा भारत-पाकिस्तानवर आधारित चित्रपट येत्या 20 जानेवारी रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर प्रदर्शित होणार आहे. याचा ट्रेलरही रिलीज झालेला आहे.



झांसी - 2 । Zansi
'झांसी सीझन 2' ही वेब सीरिज काही दिवसांतच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ही बहुप्रतिक्षित वेबसीरिज या आठवड्याममध्ये 19 जानेवारीला Disney+ Hotstar वर रिलीज होणार आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या सिझनला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.



छत्रीवाली: । CHHAATRIWALI
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रकुल प्रीत सिंहचा 'छत्रीवाली' हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. या चित्रपटात रकुल जीवशास्त्राच्या शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. 20 जानेवारीला रकुलचा छत्तरीवाली चित्रपट ZEE5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे



एटीएम । ATM

क्राइम आणि सस्पेन्स थ्रिलर असणारी 'एटीएम' ही वेबसीरिज अनेकांना आवडणारी असू शकते. लोक या वेबसीरिजची उत्सुकतेने वाट बघत असून एटीएम वेबसीरिज तामिळसह तेलुगू भाषेत प्रदर्शित होणार आहे. ही वेब सीरिज 20 जानेवारीला ओटीटी प्लॅटफॉर्म ZEE-5 वर रिलीज होणार आहे.








SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.