Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

शनिवार, जानेवारी १४, २०२३

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी Nitin Gadkari Nagpur, Maharashtra

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना आज (14 जाने.) सकाळी तीन वेळेस फोनद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असून पोलिस प्रशासन अधिक तपास करत आहे. हा प्रकार झाल्यावर लगेचच पोलिसांना माहिती देण्यात आली होती. आता सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी Union Minister nitin Gadkari यांच्या सुरक्षेमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. 


नितीन गडकरी यांच्या कार्यालयात आज सकाळी तब्बल तीन वेळा धमकीचा फोन आला. या तीनदा आलेल्या धमक्यांच्या फोनमध्ये गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचं कळत आहे. प्राप्त माहीतीनुसार, नागपुरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ऑरेंज सिटी रुग्णालयाजवळच्या जनसंपर्क कार्यालयात हे धमकीचे फोन आल्याचं समजत आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, "नितीन गडकरी यांना जीवे मारू", अशा आशयाचे हे धमकीचे कॉल होते. एवढंच नव्हे तर धमकी देणाऱ्या व्यक्तीने 'दाऊद' असा शब्द उच्चारत "आम्हाला खंडणी दिली नाही तर गडकरींना जीवे मारू", अशी धमकी दिली असल्याचं कळालं आहे. काही वेळेच्या अंतराने एकामागून एक तीन वेळेस धमकीचे फोन आले होते.

हे धमकीचे फोन सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता आले होते. सध्या पोलीस आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहेत. कर्नाटकमधून हे फोन आल्याचा अंदाज व्यक्त होत असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Nagpur, Maharashtra: 

The office of Union Minister Nitin Gadkari in Maharashtra received two threat calls on Saturday, the Nagpur Police said.

According to the police, the threat calls were received by the office at 11.30 am and 11.40 am.

"Union Minister Nitin Gadkari's office in Nagpur received two threat calls at 11.30 am and 11.40 am," the police said.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.