Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

मंगळवार, जानेवारी २४, २०२३

News पोर्टलधारकांनी समजून घेतले ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र Journalist Devnath Gandate |

- डिजिटल मीडिया कार्यशाळेत शिकले बातम्यांचे की-वर्ड 

 - पोर्टलधारकांनी समजून घेतले ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र 


- भविष्यातील पत्रकारितेवर डिजिटल मीडिया कार्यशाळा

 गडचिरोली (Gadchiroli) : डिजिटल मीडियासाठी बातमीचे लिखाण कसे केले जाते, एसईओ म्हणजे नक्की काय, डिजिटल मार्केटिंग कशा प्रकारे केली जाते, ऑनलाईन ट्रॅफिकचे तंत्र, बातम्यांचे की-वर्ड आदी महत्वाच्या विषयांवर डिजिटल मीडिया अभ्यासक पत्रकार देवनाथ गंडाटे (Devnath Gandate) यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले. 


गडचिरोली येथील चामोर्शी मार्गावर असलेल्या संविधान सभागृहात शहरातील माध्यम प्रतिनिधीसाठी डिजिटल मीडिया कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी बदलते माध्यम, मोबाईलमुळे झालेले बदल, बिटनिहाय ऑनलाईन पत्रकारिता आणि ब्लॉगिंग, ऑनलाईन रोजगाराची संधी आणि उत्पन्नाची साधने, बातम्यामध्ये  की-वर्ड कसे वापरावे, ऑनलाईन ट्रॅफिकमधील फरक आणि सोशल मीडिया आणि डिजिटल मीडियातील फरक, वेबसाईटनिर्मितीचे तंत्र आणि भविष्यातील पत्रकारितेवर सखोल मार्गदर्शन केले. याप्रसंगी देवनाथ गंडाटे यांनी सांगितले की, डिजिटल मीडियातील बारकावे आणि ओळख जर नसेल तर आजचा पत्रकार मागे पडतो. ज्यांना तंत्रज्ञान अवगत आहे, ते  रोजगाराची संधी निर्माण करीत आहेत. लिखाणाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास वेबपोर्टलमधूनही कमाई साधता येते, हे उदाहरणासह पटवून दिले. यावेळी डिजिटल मीडिया कायदा आणि नोंदणी कशी करावी, याची माहिती देण्यात आली. मागील २० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत देवनाथ गंडाटे यांचे "डिजिटल मीडिया संधी आणि आव्हाने" हे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. यानिमित्त गडचिरोलीतील डिजिटल मीडिया पत्रकारांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी ऍड. मनीष कासर्लावार यांनी प्रास्ताविक केले. समारोपीय कार्यक्रमात पुढील महिन्यात शुभारंभ होऊ घातलेल्या माय खबर २४ ( My Khabar24 ) या नवीन मीडिया प्लॅटफॉर्मची माहिती आणि भविष्यात पत्रकाराना रोजगार कसा मिळेल. याची माहिती व्यवस्थापकीय संचालक प्रीतम मडावी यांनी दिली. कार्यक्रमाचे संचालन श्रीमंत सुरपाम यांनी केले. आयोजनासाठी धर्मदास मेश्राम यांनी सभागृह उपलब्ध करून दिले. कार्यशाळेत वरिष्ठ पत्रकार जयंत निमगडे, प्रवीण चन्नावार, किशोर खेवले, राजू सहारे, क्रिष्णा शेंडे, मिलिंद खोंड यांच्यासह पत्रकारांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.   


Journalist Devnath Gandate | Digital media workshop | SEO | digital marketing | techniques | online traffic | keywords for news etc.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.