Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

रविवार, जानेवारी १५, २०२३

७२ जण बसलेल्या विमानाने घेतला पेट; मृतदेह बाहेर काढले | Plane Crashes In Nepal

आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी विमान कोसळले

Plane Crashes In Nepal: नेपाळमध्ये आज सकाळी विमान धावपट्टीवर कोसळल्यानं मोठी जीवितहानी झाली. या विमानात ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्ससह एकूण ७२ जण होते. या दुर्घटनेतील मृतांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.nepal plane crash
अपघाताची माहिती मिळताच विमानतळ आणि विमान कंपन्यांसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. नेपाळी लष्करासोबतच बचाव पथकही तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आलं. अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. अपघातानंतर बराच वेळ घटनास्थळावरुन धुराचे लोट उठताना दिसत होते. बचाव पथकानं आतापर्यंत 40 मृतदेह बाहेर काढले आहेत.

#UPDATE | Aircraft crash at Pokhara Airport in Nepal | A total of 16 bodies recovered: Nepal Army Spokesperson

आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी विमान कोसळले


Pokhara International Airport: नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मोठी जिवीतहानी झाली. अपघातस्थळावरून आतापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची पुष्टी अधिकाऱ्यांनी केली. विमानात काही भारतीयांसह १० परदेशी नागरिक असल्याची माहिती समोर आलीय. सध्या याठिकाणी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे.

 A passenger aircraft crashed at Pokhara International Airport in Nepal today. 68 passengers and four crew members were onboard at the time of crash. Details awaited.

#nepalprimeministeremergencymeeting #nepalplanecrashdeathtoll #kathmandu #nepalyetiairlinesplanecrash #nepalplanecrashduringlanding #nepalplanecrash #nepalplanecrashliveupdates #yetiairlinesplanecrash


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.