Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

गुरुवार, जानेवारी ०५, २०२३

मराठी ही हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा : सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन Sudhir Mungantiwar

मराठी ही हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा: सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन


सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
मुंबई दि. 5- मराठी भाषा ही जगातील सर्वाधिक मौल्यवान भाषा आहे. सर्वांच्या हृदयापर्यंत पोहोचणारी ही संस्कारांची भाषा जनाजनाच्या मना मनात पोहोचविण्यासाठी हे विश्व मराठी संमेलन अतिशय महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडीया, वरळी येथे
आयोजित मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनात आयोजित परिसंवादात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर लोकमत मुंबई चे संपादक अतुल कुलकर्णी, झी 24 तास या वृत्त वाहिनीचे संपादक निलेश खरे,साम टीव्ही मराठी चे प्रसन्न जोशी, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन चे संपादक अभिजित कांबळे, निवेदक अजित चव्हाण उपस्थित होते.

यावेळी बोलतांना मंत्री श्री मुनगंटीवार म्हणाले महाराष्ट्रात जन्म झाल्याचा मला अभिमान आहे. मराठी भाषेने दिलेला वारसा हा जगातील दहा प्रमुख वारसापैकी एक आहे.विश्व मराठी संमेलन हे मराठी भाषा सर्वंदूर पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. यनिमित्ताने मराठी भाषेचे महत्व अधोरेखित होईल असेही त्यांनी सांगितले.

विश्व मराठी संमेलन आयोजनासाठी मराठी भाषा विभाग मंत्री दिपक केसरकर आणि त्यांच्या संपूर्ण टीम चे उत्कृष्ट आयोजनासाठी विशेष कौतुक यावेळी श्री मुनगंटीवार यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमास मराठी भाषा व शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मराठी भाषा विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह विविध देशातील मराठी मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.