Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

रविवार, जानेवारी २९, २०२३

शिक्षक मतदार संघाची निवडणूक : जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचे महत्व माहिती आहे का? Legislative Council Elections
नागपूर,दि. 29 :
येत्या 30 जानेवारीला विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत असून मतदारांनी मतदान कसे करावे, याबाबतची मतदानाची पध्दती कशी असावी, याबाबत निवडणूक विभागाने सूचना केल्या आहेत. Shikshak Matdar Sangh Nivadnuk

कोणती काळजी घ्यावी 
मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने पुरविलेले कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये चिन्हांकित करता येतील. जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरा. मतपत्रिकेबरोबर हे स्केच पेन तुम्हाला देण्यात येईल. अन्य कोणतेही पेन, मतपत्रिकेवर तुमचे नाव लिहू नका किंवा अन्य शब्द पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा अन्य कोणतेही लेखनाचे साधन मतदानासाठी वापरु नका कारण त्यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल. 
Shikshak Matdar Sangh Nivadnuk


नावासमोर 1 असा आकडा लिहून मतदान करा
उमेदवाराच्या नावाच्या स्तंभासमोर पसंतीक्रम म्हणून असलेल्या स्तंभामध्ये तुम्ही प्रथम पसंतीचा उमेदवार म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर 1 असा आकडा लिहून मतदान करा. हा 1 हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्या.


तुमच्या पसंतीक्रमानुसार 2,3,4 इत्यादी आकडे घालून दर्शवा
एकापेक्षा अधिक उमेदवारांची निवड करावयाची असली तरीदेखील 1 हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर घाला. निवडणूक द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार निवडणूक लढवत असतील तेवढे पसंतीक्रम तुम्हाला देता येतील उदाहरणार्थ, पाच उमेदवार निवडणुकीत उभे असतील आणि त्यापैकी एक उमेदवार निवडून द्यायचा असेल तरीही तुम्हाला तुमच्या निवडीच्या पसंतीक्रमाने उमेदवारांच्या नावासमोर 1 ते 5 असे आकडे घालता येतील. उर्वरीत उमेदवारांबाबतचा तुमचा पुढील पसंतीक्रम, अशा उमेदवारांच्या नावासमोर असलेल्या “पसंतीक्रम” दर्शवाचा स्तंभामध्ये तुमच्या पसंतीक्रमानुसार 2,3,4 इत्यादी आकडे घालून दर्शवा. 
Shikshak Matdar Sangh Nivadnuk

कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर फक्त एकच आकडा तुम्ही घातलेला आहे याची खात्री करून घ्या. तसेच तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला नाही याची देखील खात्री करून घ्या. हा पसंतीक्रम फक्त 1,2,3 इत्यादी आकडयांमध्येच दर्शवा. एक, दोन, तीन इत्यादी शब्दांमध्ये दर्शवू नका. हे आकडे भारतीय अंकाच्या १, २, ३ इत्यादीसारख्या आंतरराष्ट्रीय रुपात किंवा I, II, III इत्यादींसारख्या रोमन रुपात किंवा 1. 2, 3 अशा देवनागरी रुपात किंवा संविधानाच्या अनुसूची आठमधील मान्यता दिलेल्या कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये चिन्हांकित करता येतील.

अशा मतपत्रिका बाद करण्यात येतील
मतपत्रिकेवर तुमचे नाव लिहू नका किंवा अन्य शब्द लिहू नका किंवा तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे लिहू नका. तसेच, तुमच्या अंगठ्याचा ठसा देखील उमटवू नका. यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी तुमच्या निवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर v/ किंवा x अशी खुण करणे पुरेसे होणार नाही. अशा मतपत्रिका बाद करण्यात येतील. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे तुमचा पसंतीक्रम फक्त 1,2,3 इत्यादी आकड्यांमध्येच दर्शवा. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी तुम्ही उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर 1 हा आकडा लिहून तुमची पहिली पसंती दर्शवणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहेत. म्हणजेच तुम्ही तुमची दुसरी किंवा पुढील पसंती दर्शवा अथवा दर्शवू नका.

अवैध मतपत्रिका

1 हा आकडा घातलेला नसेल. 1 हा आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला असेल. 1 हा आकडा, तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी घातलेला आहे याबाबत संदेह निर्माण होईल अशा प्रकारे घातलेला असेल. एकाच उमेदवारांच्या नावासमोर 1 आणि त्याबरोबर 2,3 इत्यादी आकडे देखील घातलेले असतील. पसंतीक्रम आकड्याऐवजी शब्दांमध्ये दर्शविलेला असेल. मतदाराची Uओळखपटू शकेल अशी कोणतीही खूण किंवा लेखन असेल, आणि असे आकडे घालण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य साधनाने कोणताही आकडा घातलेला असेल, तर अशी मतपत्रिका अवैध ठरेल. 
Shikshak Matdar Sangh Nivadnuk

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.