Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, जानेवारी १६, २०२३

भूकंप सदृश धक्क्याने Chandrapur हादरले #earthquake #Top News

Latest quakes in or near Chandrapur, Maharashtra, India, in the past 24 hours on Sunday, January 15, 2023
कुठे कुठे बसला धक्का 

चंद्रपूर (Chandrapur) शहरातील बाबूपेठ परिसरामध्ये रात्रीच्या नऊ वाजून तीस मिनिटांनी भूकंप सदृश्य धक्का जाणवल्याने परिसरातील नागरिकात दहशत पसरली आहे. हा धक्का wcl च्या ब्लास्टिंग मध्ये झाला की भूकंपाचा आहे याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. नऊ वाजून 31 मिनिटांनी हा धक्का जाणवल्याचे नागरिकांनी सांगितले. याबाबत सर्व नागरिक घाबरले आहेत.  #earthquake  #Top News

या वेबसाईटवर झाली नोंद 
 
‘वोल्कॅनो डिस्कवरी डॉट कॉम’ या संस्थेच्या संकेतस्थळावर भूकंपाची तिव्रता एक मॅग्नेट्यूडपेक्षा अधिक दर्शवण्यात आली आहे. भूपृष्ठापासून दहा किलोमीटरच्या खोलीत भूकंप घडून आल्याची नोंद आहे. परंतु, ‘नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी’ या भारतातील अधिकृत संकेतस्थळावर याबाबत कोणतीही माहिती वृत्तलिहिस्तोवर देण्यात आलेली नव्हती. भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. भूकंपाची तीव्रता कमी असल्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.  Coal mine blasting |  Earthquake in Chandrapur

शहरातील खदानीजवळील भागांसह इतरही अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचे धक्के जाणवणाऱ्या लोकांनी आपली भीती व्यक्त केली. दरम्यान, लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. 

चंद्रपूरच्या बाबुपेठ परिसरात भूकंपाचे धक्के

 चंद्रपूरच्या बाबुपेठ परिसरात लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले. आज रात्री 9 वाजून 31 मिनिटांनी हा भूकंप झाल्याची नोंद आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध भूकंप विषयक संस्थांनी नोंदवली आहे. वोल्कॅनो डिस्कवरी डॉट कॉम या संस्थेच्या संकेतस्थळावर हा भूकंप रिश्टर स्केलवर  एक मॅग्नेट्यूड पेक्षा जास्त क्षमतेचा दर्शविलेला आहे. तो जमिनीपासून दहा किलोमीटरच्या खोलीत घडून आल्याची नोंद सुद्धा करण्यात आली आहे. परंतु नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी या भारतातील या विषयाच्या ऑफिशियल साइटवर कोणतीही माहिती दाखवण्यात आलेली नाही, त्यांच्या साइटवर केलेला फोन रिसीव्ह होत नाही. चंद्रपूर मधील लोक प्रचंड घाबरलेले दिसले, काही मिनिटांत ही बातमी चंद्रपूरच्या वेगवेगळ्या भागात पसरली.

चंद्रपुरातील अभ्यासक काय म्हणाले 
या भूकंपाची नोंद दहा किलोमीटरच्या खोलीत घेण्यात आल्यामुळे, हा भूकंप पृथ्वीच्या अंतर्गत भागातील घडामोडीमुळे घडलेला आहे हे निश्चित आहे. चंद्रपूर शहराचा परिसर फॉल्ट लाईन वर येतोय. या भागात असलेली कदम ही फॉल्ट दक्षिण भारतातील विशेषतः महाराष्ट्र आणि तेलंगणा परिसरातील भूकंपांसाठी कारणीभूत आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेलगत रिस्टोर स्केलवर दोन ते तीन मॅग्नेट्यूडचे  भूकंप होऊ शकतात. आणि एखाद्या वेळेस ते चार पर्यंत जाऊ शकतात. कदम फॉल्ट मुळेच नांदेड आणि किनवटच्या परिसरात मध्यम तीव्रतेचे सतत भूकंप येत असतात. या भूकंपाची तीव्रता अतिशय कमी असल्यामुळे लोकांनी घाबरून जायची गरज नाही.

 डॉ. योगेश दूधपचारे
 भूगोल विभाग प्रमुख
 जनता महाविद्यालय, चंद्रपूर.

LATEST EARTHQUAKES WORLDWIDE*Earthquake details*

Jan 15, 2023 9:31 pm (GMT +5:30) (Jan 15, 2023 16:01 GMT) 3.5 km southeast of Chandrapur, Maharashtra, India
चंद्रपूर, महाराष्ट्र, भारत


Local time Sunday, Jan 15, 2023 at 9:31 pm (GMT +5:30)
Status uncertain

Magnitude unknown (3.8?) : Depth 10.0 km

Epicenter 19.92261°N / 79.30948°E (Maharashtra, India)


Shaking Light shaking

Primary data source VolcanoDiscovery (User-reported shaking)

अलीकडील भूकंप
टीप: भूकंपाच्या नवीन अधिकृत अहवालांना कदाचित उशीर होऊ शकतो
भारतीय प्रमाण वेळ मध्ये सर्व वेळा आहेत · स्रोत: U.S. Geological Survey 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.