Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

रविवार, जानेवारी २२, २०२३

वरोरा आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गायिले सुरेल भजन #khabarbat #live #india #chandrapur


Watch video on YouTube here: https://youtu.be/F_qAq_PDkOM

व्यक्ती कोणत्याही पदावर गेला किंवा मोठा झाला तरी त्याच्यात जर उपजत कलागुण असतील तर ते कधी ना कधी बाहेर पडतात. अशा कलागुणांची झलक एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकांनाही बघायला मिळते. असाच एक प्रसंग भद्रावती-वरोरा मतदारसंघात बघायला मिळाला. या मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी गुरुदेव सेवा मंडळाच्या भजन कार्यक्रमात सहभागी होऊन चक्क भजन गायले. त्या भजनाचे बोल होते, "असा कसा देवाचा देव ठकडा ग बाई ठकडा ग".

 भद्रावती तालुक्यातील पावना रै येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुण्यतिथीनिमित्त भव्य खंजरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी उपस्थित नागरिकांनी आमदार धानोकर यांना भजन मंडळ सहभागी होण्याचा आग्रह धरत भजन गाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा त्यांनी सुरेल आवाजात भजन गायीले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.