Top News

शाळेचे शिक्षक येतात दुपारी दोन वाजता; त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी उचलले असे पाहूल school teacher students Chandrapur

अतिरिक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक अवेळी येतात, अध्यापन करत नाही...

ads

मंगळवार, जानेवारी ०३, २०२३

गावातील दारूबंदी करण्यासाठी मेहा बुजरूक येथे महिलांनी घेतली बैठक #khabarbat #india #chandrapur


Watch video on YouTube here: https://youtu.be/lMf0CyPJka8


गावातील दारूबंदी करण्यासाठी मेहा बुजरूक येथे महिलांनी घेतली बैठक

सावली तालुक्यातील मेहा बुजरूक येथे दारूबंदी करण्याच्या मागणीसाठी महिलांनी गावामध्ये बैठक घेतली आणि समितीची स्थापना करण्यात आली. 

मेहा बुजरूक येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू सुरू आहे. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून, गावात वादविवादाचे प्रमाण वाढू लागले आहे. त्याला आळा घालण्यासाठी गावातील महिलांनी एकत्रित येऊन दारूबंदी करण्यासाठी समिती गठीत केली आहे. आज दिनांक 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या औचित्य साधून गावातील सरपंच रुपेश रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी गावात संपूर्ण दारूबंदी करण्याची मागणी करण्यात आली. याशिवाय गावातील इतर अवैध व्यवसायावर आळा घालण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी करण्यात आली. गावात कोणत्याही छोट्या-मोठ्या कार्यक्रम आयोजित केला तरी तरुण पिढी दारू पिऊन कार्यक्रमामध्ये व्यक्ती आणण्याचा प्रयत्न करीत आहे. सोळा वर्षाच्या मुलापासून दारूचे व्यसन लागले असून, सामाजिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिघडू लागले आहे. त्यामुळे दारू बंदी करण्याची मागणी करण्यात आली. 
यावेळी सर्वांमध्ये सुनंदा भोयर यांची दारूबंदी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. या बैठकीला गावातील महिला पुरुषाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.