Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

शनिवार, जानेवारी २१, २०२३

चारचाकी दुभाजकाला धडकली; प्रॉपर्टी बिल्डर ठार; इतर सहकारी जखमी The four-wheeler hit the divider; Property builder killed; Other colleagues injured


Accident
Accident


संजय नागपुरे/कारंजा (घाडगे)
कारची दुभाजकाला धडक,, 1 ठार 3 जखमी। कारंजा(घा)--- नागपूर येथील काही बिल्डर प्रॉपर्टी च्या कामाने अमरावती येथे जात असताना महामार्गावरील ठाणेगाव जवळ त्यांची टोयोटा गाडी दुभाजकाला धडकली यात 1 जण जागीच ठार झाला तर इतर 2 जण जखमी आहे, ही घटना दि,20 शुक्रवार ला दुपारच्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीने दोन ते तीन पलट्या घेतल्या व गाडी रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला जाऊन पडली, टोयोटा गाडी क्र,MH- 04 CB-9681 या गाडीचा चालक मृतक चंदन विजय प्रसाद, रा, बेलतरोडी नागपूर, हिरालाल अग्निहोत्री, सुरेश कुसरकर सर्व रा, नागपूर हे गाडीतून प्रवास करत होते, गाडीतील इतर प्रवाशी हे जखमी झाले असून त्यांच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहे, कारंजा पोलीसात या घटनेची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.