Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

रविवार, जानेवारी २२, २०२३

विधानसभेचे माजी उपाध्यक्ष अ‍ॅड. मोरेश्वर टेमुर्डे यांचे निधन; संपूर्ण कार्य परिचय वाचा | Moreshwar temurde

चंद्रपूर  chandrapur : जिल्ह्यातील वरोरा विधानसभेचे माजी आमदार विधानसभेचे माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोरेश्वर टेंभुर्डे (Age 81) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने रविवारी, 22 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता त्यांचे पार्थिव शरीर मेडिकल कॉलेजला दान करण्याच्या निर्णय कुटुंबाने घेतला आहे. ‘माझ्या मृत्यूनंतर माझा देहाला अग्नी देवू नका,माझा देह मेडिकल कॉलेजला दान करा’,असा संकल्प मोरेश्वर टेंभुर्डे यांनी केला होता. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबाने हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 मुले,1 मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. (Latest Marathi News)

मोरेश्वर टेमूर्डे 

मोरेश्वर टेमूर्डे, यांनी 1985 अपक्ष तर 1990 जनता दलाच्या तिकिटावर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. (Moreshwar temurde)

5 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता.  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे ते निकटवर्तीय होते. त्यांनी अपक्ष, जनता दल, शेतकरी संघटना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काम केले. 

मोरेश्वर टेमुर्डे यांनी चंद्रपूर जिल्ह्यात विवेकानंद हिंदू ज्ञानपीठ या संस्थेच्या माध्यमातून शाळांचे जाळे उभे करून शिक्षण प्रसारास मोठा हातभार लावला. ते शरद पवारांचे निकटवर्ती विश्वासू म्हणून परिचित असले तरीही त्यांची राजकारणात प्रामाणिक राजकारणी म्हणून ख्याती होती. ते स्वतंत्र विदर्भाचे समर्थक होते. वरोरा भद्रावती मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. चंद्रपूरच्या स्थानिक राजकारणात त्यांनी एकेकाळी स्वतःचे स्थान निर्माण केले होते. नंतरच्या काळात त्यांचा अध्यात्माकडे कल वाढला होता आणि पॉंडेचेरीच्या योगी अरविंद आश्रमाचे ते अनुयायी बनले होते.  
Adv. Moreshwar Temurde (Former Vice President of Legislative Assembly)

मोरेश्वर टेमुर्डे यांनी कधीही कुणाला दुखावलेलं नाही. त्यांनी कोणावरही अन्याय केला नाही. त्यांनी वकिली व्यवसाय करताना गावागावातील लोकांशी आणि शेतकऱ्यांची नाते जोडले. जनतेशी जनसंपर्क कायम ठेवला. त्यांच्या समस्यांचा पाठपुरावा केला. त्यांच्या मनात कायम स्थान निर्माण केलं. त्यामुळे जनतेनी त्यांना लोकनेते म्हणून मान्य केले आहे. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने लोकनेते झाले. त्यांच्या विचारांची व मार्गदर्शनाची समाजाला आवश्यकता आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर विषयाची चर्चा विधानसभेत सलग ४८ तास चालली.

३० डिसेंबर १९९३ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष श्री. मधुकरराव चौधरी यांनी एक पत्र सभागृहात वाचून दाखवले. पत्रावर सर्वश्री मोरेश्वर टेमुर्डे, वसंतराव बोंडे, वामनराव चटप, शिवराज तोंडचिरकर व सौ. सरोज काशीकर या पाच आमदारांच्या सह्या होत्या. १९९० च्या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे हे पाच पाईक जनता दलाच्या चिन्हावर निवडून आले होते. तेव्हापासून आतापर्यंत जनता दलाची शिस्त त्यांनी कसोशीने पाळली होती. अध्यक्षांना उद्देशून लिहिलेल्या पत्रामध्ये या पाच आमदारांनी जनता दल विधानसभा पक्षापासून फारकत घेऊन सभागृहात स्वतंत्र गट म्हणून बसण्याचा आपला निर्णय जाहीर केला. Moreshwar temurde

फाईल फोटो : १९८६ मध्ये शेतकरी संघटनेच्या प्रचारासाठी भटकत असताना गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथे वैनगंगेवर स्नान. डावीकडून सर्वश्री स्व. जीवन टिळक, ऍड. वामनराव चटप, श्री रवीभाऊ काशीकर, स्व. सुरेश चोपडे, गंगाधर मुटे आणि श्री. मोरेश्वर टेमुर्डे (माजी विधानसभा उपाध्यक्ष)


त्यावेळी ॲड. मोरेश्वर टेमुर्डे यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष म्हणून कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता अत्यंत कार्यकुशलतापूर्वक कामकाज पूर्ण करून आवश्यक ठराव पारित करून घेतला. यावरून त्यांच्या कार्यकुशलतेचा परिचय होतो.पद भुषविल्याने कोणी मोठा होत नाही. प्रथम मनुष्य बनून प्रत्येकाशी मानवतेने वागले पाहिजे. पैसे कमविण्यासाठी मी राजकारणात आलो नाही, असे सांगत राजकारण व्यापार झाल्याची खंतही ते नेहमी व्यक्त करायचे. खासदार बाळू धानोरकर यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी केले. त्यांनी खासदार राहुल गांधी यांना पत्र पाठविले. 21 नोव्हेंबर 2022 लिहिलेले पत्र समोर आल्याने राजकीय खळबळ उडाली होती.

येत्या 24 जानेवारी रोजी त्यांनी विद्रोही साहित्य संमेलनाच्या निमित्ताने चंद्रपुरात कार्यक्रमाचे देखील आयोजन केले होते. मात्र त्या कार्यक्रमाच्या दोन दिवसापूर्वी त्यांचे निधन झाले.

*जुन्या पिढीतील राजकारणाचा प्रामाणिक चेहरा हरपला :  सुधीर मुनगंटीवार*

विधान सभेचे माजी उपाध्यक्ष ऍड.मोरेश्वर टेमुर्डे यांच्या निधनामुळे जुन्या पिढीतील राजकारणाचा प्रामाणिक चेहरा हरपला आहे, अशा शब्दात चंद्रपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.


 जिल्ह्यातील सामाजिक व राजकिय क्षेत्रात कार्य करणाऱ्यांचे  मार्गदर्शक नेतृत्व म्हणून ऍड  मोरेश्वरराव टेमुर्डे यांची ख्याती होती. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही भरुन न निघणारी आहे, अशा शब्दात हंसराज अहीर यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणाचे आधारस्तंभ महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष, जिल्ह्याच्या मातीशी नाळ जुळलेला, विकसिन शील व सहृदयी  नेता म्हणून ओळख असलेले,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, स्वर्गीय श्री. मोरेश्वरजी टेंभूर्डे यांच्या अकस्मात निधनाने जिल्ह्याच्या राजकारणात जी पोकळी निर्माण झाली. ती कदापिही भरून निघणे नाही. असे विजय वडेट्टीवार यांनी आपली शोकसंवेदना व्यक्त केली आहे.

भद्रावती - वरोरा मतदारसंघात 1985 ते 1995 पर्यंत प्रतिनिधित्व करणारे आमदार तथा विधानसभेचे माजी उपाध्यक्ष मोरेश्वर टेंमुर्डे यांच्या निधनाने या भागाचा पितामह हरपला, अशा भावना चंद्रपूरचे खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केले आहेत. 


 वरोरा विधानसभेचे दोनदा आमदार राहिलेले ॲड. मोरेश्वर टेंभुर्डे यांच्या अचानक निधनाची वार्ता अत्यंत दुःखद आहे, हे वृत्त समजतात आमचे मन सुन्न झाले. ते आमच्यासाठी मार्गदर्शक होते. या विधानसभेच्या विकासासाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले, अशी प्रतिक्रिया आमदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.