Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

सोमवार, जानेवारी ०९, २०२३

डॉ. योगेश अडबलवाड यांचे-फेलोशिफ इन स्पाइन सर्जरी या वैद्यकीय क्षेत्रातील यशाबद्दल हार्दिक अभिनंदन...!!

डॉ. योगेश अडबलवाड यांचे-फेलोशिफ इन स्पाइन सर्जरी या वैद्यकीय क्षेत्रातील यशाबद्दल हार्दिक अभिनंदन...!!
नांदेड प्रतिनिधी:- बालाजी सिलमवार -

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर सरसम येथील रहिवासी असलेले पूर्णा पंचायत समितीचे सेवानिवृत्त सहायक.प्रशासन अधिकारी श्री.माधवराव अडबलवाड यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ.योगेश माधवराव अडबलवाड MBBS. MS orthopedic (सायन हॉस्पिटल मुंबई) यांचे नुकतेच fellowship इन मिनीमल इनव्हॅसिव्ह spine surgery (FIMSS) बॉम्बे हॉस्पिटल कन्सलटंट येथे स्पाईन सर्जन (मणक्याचे विकार तज्ञ) डॉ. अरविंद कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनात त्यांनी ही फेलोशिप अथक परिश्रम घेवून नुकतीच पूर्ण केली आहे.त्याच्या यशात वडील माधवराव अडबलवाड आणि परिवाराचा मोलाचा वाटा आहे.कुठल्याही पालकाला अभिमान वाटावा असे डॉ.योगेश अडबलवाड चे यश आहे.डॉ योगेश हे पुढील वैद्यकीय सेवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी नांदेड येथे करणार असल्याचे म्हटले आहे.तरी त्यांच्या पुढील वैद्यकिय क्षेत्रातील कारकिर्दीसाठी आणि गरजू घटकाची त्याच्या हातून सदैव चांगली सेवा घडण्यासाठी औरंगाबाद येथील श्री राजीव सिलमवार यांच्यासह सेवानिवृत्त विक्रीकर उपायुक्त श्री सोपान मारकवाड आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर आशिष मोतेवार,डॉ.संजय मारकवाड,डॉ.प्रवीण पाकलवाड,पोलिस निरीक्षक श्री मंडलवार साहेब,सुरेवाड,तुकाराम अडबलवाड सर, मित्रमंडळी, नातेवाईकांसह, हिमायतनगर तालुक्यासह अनेकांनी डॉ.योगेश चे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत....!!

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.