Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, जानेवारी ०९, २०२३

झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने साहित्य पुरस्कार वितरण तसेच आँनलाईन काव्यस्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार | Zadiboli Sahitya Mandal

झाडीबोली साहित्य मंडळाच्या वतीने साहित्य पुरस्कार वितरण तसेच आँनलाईन काव्यस्पर्धेच्या विजेत्यांचा सत्कार

Zadiboli Sahitya Mandal
Zadiboli Sahitya Mandalगडचिरोली ( प्रतिनिधी)-
झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या
वतीने वार्षिक साहित्य पुरस्कार वितरण आणि विदर्भस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरेड्डीवार होते. 

ज्येष्ठ साहित्यिक बंडोपंत बोढेकर, झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ.चंद्रकांत लेनगुरे, पं. स.चे माजी उपसभापती विलास दशमुखे , सामाजिक कार्यकर्ते दिलिप चलाख, दिलीप उडान, अरविंद गेडाम आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत लेनगुरे यांनी केले . याप्रसंगी उद्घाटक म्हणून डॉ. होळी म्हणाले की, झाडीपट्टीतील लोककला,बोली संवर्धनाच्या दृष्टीने झाडीबोली साहित्य मंडळ निष्ठेने काम करीत आहे आणि त्यामुळे अनेक लेखक,कवी, कलावंत तयार होत आहेत. 

हे कार्य अभिनंदनीय असून या झाडीबोली साहित्याचा प्रचार आणि प्रसार सर्वदूर होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले की,झाडीपट्टीतल्या झाडी बोलीचा गोडवा साहित्यरूपात पुढे आणून ज्याप्रमाणे मधमाशी मध निर्मितीचे कार्य अव्याहतपणे सुरू ठेवते त्याप्रमाणे या बोलीचे आणि आपल्या वैभवशाली संस्कृतीचे संवर्धन होणे गरजेचे असल्याचे ते‌ म्हणाले. 

साहित्य सदैव समाजाला घडवत असते आणि ते दिशादर्शक ठरत असते त्यामुळे साहित्य निर्मितीचे काम सुरू ठेवावे असे आवाहनही त्यांनी केले . याप्रसंगी बंडोपंत बोढेकर म्हणाले की, झाडीपट्टीत झाडीबोली साहित्य मंडळाने गेल्या तीस वर्षात सातत्याने काम करत लिहिणा-या हातांची चळवळ उभी केलेली आहे. आणि बोली विषयक साहित्य विविध लेखन प्रकारांमध्ये पुढे येत आहे. तसेच झाडीपट्टी रंगभूमी, दंडारीचे आकर्षण संपूर्ण महाराष्ट्राला असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमात कवी आनंद बावणे यांच्या स्वानंद गीत या काव्य संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा शाखेच्या वतीने देण्यात येणारा उत्कृष्ट काव्य पुरस्कार अरुण झगडकर यांच्या भूभरी या काव्यसंग्रहाला देण्यात आला, तर उत्कृष्ट झाडीबोली काव्य निर्मिती पुरस्कार लक्ष्मण खोब्रागडे यांच्या मोरगाड या काव्यसंग्रहाला देण्यात आला. 


तर संकीर्ण गटात बंडोपंत बोढेकर यांच्या संत गाडगेबाबांचे व्यक्तिमत्व ( जीवन कला ) या चरित्र ग्रंथाला प्रदान करण्यात आला. झाडीपट्टी उत्कृष्ट लोककलावंत पुरस्कार प्रसिद्ध कलावंत ८१ वर्षीय दादा पारधी यांना देण्यात आला. आत्मानंदी विषयावर घेण्यात आलेल्या आँनलाईन काव्यस्पर्धेतील विजेते संजीव बोरकर, संगीता मालेकर, सविता पिसे यांना सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन कवी जितेंद्र रायपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव कमलेश झाडे यांनी केले. दुसऱ्या सत्रात कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. 


 अध्यक्षस्थानी कवयित्री प्रा. ज्योती कावळे होत्या तर कवी श्रीकांत धोटे, कवी अरुण झगडकर, गझलकार मिलिंद उमरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यात कवी संजीव बोरकर, उपेंद्र रोहणकर, वामनदादा गेडाम, संतोष कुमार मेश्राम, संध्याताई मालेकर, सविता पिसे, संतोष मेश्राम, गुलाब मुळे,वर्षा पडघन,प्रतिभा कोडापे,प्रेमिला अलोने,मालती सेमले,ज्योत्स्ना बनसोड, पुरूषोत्तम ठाकरे,किरण चौधरी,प्रिती चहांदे,संतोष उईके, सुनील बावणे,प्रशांत भंडारे,सुनील पोटे,संतोष मेश्राम,शितल कर्णेवार,सत्तु भांडेकर ,नंदू मसराम,कमलेश झाडे,जितेंद्र रायपुरे,रविंद्र मुलकलवार,खामदेव हस्ते,विधी बनसोड,राशी ठाकूर, वेणुगोपाल ठाकरे, मंदाकिनी चरडे,सविता झाडे,सुरेखा बारसागडे,कविता गेडाम,वसंत कुलसंगे,विजय शेंडगे, सोमनाथ मानकर,विनायक जापलवार,प्रमेय उराडे,निलकंठ रोहणकर, मिलिंद खोब्रागडे,गुलाब मुळे,राहुल शेंडे या कवींनी आपल्या रचना सादर केल्या.  Distribution of literary awards on behalf of Zadiboli Sahitya Mandal and felicitating the winners of online poetry competition

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.