Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

मंगळवार, जानेवारी ०३, २०२३

रामधून दिंडीने माजरी गावात स्वच्छतेसह राष्ट्रसंतांच्या नामाचा गजर

माजरी श्रीगुरुदेव सेवा मंडळातर्फे जनप्रबोधनपर सप्तखंजेरी कीर्तनमाजरी (प्रतिनिधी) -
थोर श्री गुरुदेव सेवक दिवंगत चिमनाबाबू झाडे यांच्या प्रेरणेने सन १९७० पासून अ.भा.श्रीगुरुदेव सेवा मंडळ शाखा माजरी (वस्ती) कार्यरत आहे. या शाखेच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरणाच्यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. श्रीगुरुदेव सेवा मंडळ सामुदायिक प्रार्थना मंदिर परिसरात झालेल्या दोन दिवसीय कार्यक्रमाची सुरुवात ग्रामस्वच्छता अभियानाने झाली. दिवसभर महिलांसाठी विशेष उपक्रम आयोजित करण्यात आले.
 सायंकाळच्या सामुदायिक प्रार्थनेनंतर शिवछत्रपती कला प्रबोधन मंडळ दहेगाव यांच्या वतीने नाट्यकलेतून मनोरंजन पर कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यात स्वच्छतेचे महत्त्व, अंधश्रद्धा निर्मूलन, जीवनशिक्षण विचार बाबत माहिती देण्यात आली. यानंतर जागृती भजन अंतर्गत दुर्गा महिला भजन मंडळ , श्रीगुरुदेव महिला भजन मंडळ यांनी भजने सादर केलीत. पहिल्या दिवशी अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे आणि जिल्हा सेवाधिकारी प्रा. रुपलाल कावळे यांनी भेट देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले. दुसऱ्या दिवशी ग्रामसफाईनंतर सामुदायिक ध्यान आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने यामधून काढण्यात आली. त्यात जयजगन्नाथ बालमित्र भजन मंडळ , नवजागृती महिला भजन मंडळ, जयजगन्नाथ महिला भजन मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. दुपारच्या सत्रात युवासप्तखंजेरीवादक उदयपाल वनीकर यांच्या खंजिरी कीर्तनाचा कार्यक्रम सादर झाला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, शाखेचे युवा अध्यक्ष संजीव पोडे, शाखेचे मार्गदर्शक शामसुंदर पोडे, माजी ग्रा.पं.सदस्य संध्या पोडे, पं. स. सदस्य चिंतामणजी आत्राम, कोंढा गावचे दानशूर कवडू पाटील मोरे आदि मान्यवरांची उपस्थिती होती. 
   प्रास्ताविक संजिव पोडे यांनी केले . याप्रसंगी गावातीलच वेकोली मधून सेवानिवृत्त झालेले उत्तमराव झाडे, देवराव पाटेकर, बाबा हेकाड यांचा शाल, श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन एड. रमेश रोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन झाडे, किशोर झाडे, अविनाश जीवतोडे ,नयन डोंगे, कुणाल टोंगे, यादव मांढरे, विशाल मांढरे अमन खडतकर ,संकेत मोहितकर, बाळा खिरेकर, निखिल बोथले तसेच अमोल पारखी, रमेश देठे, सचिन पाचभाई यांचे सहकार्य लाभले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.