तर 12 जण गंभीर जखमी झालेत. पाथरे गावाजवळच्या हॉटेल वनराईजवळ ही दुर्घटना घडली. खाजगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. ( Accident News ) अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. आराम बसमधील बहुसंख्य प्रवासी गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अंबरनाथ, ठाणे परिसरातील 50 प्रवासी या बसमधून शिर्डीचा प्रवास करत होते. मात्र रस्त्यातच 10 प्रवाशांचा मृत्यू झाला. एका व्यक्तीचा चेहरा आणि धड वेगळे झाल्यानं त्याची ओळख पटलेली नाही. इतर जखमींना पुढील उपचारासाठी सिन्नर, नाशिकमध्ये हलवण्यात आले आहे. भीषण अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्यापैकी सात महिला आणि तीन पुरुषांचा समावेश असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.