Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, जानेवारी २३, २०२३

BREAKING News | राज्यपाल राजीनामा देणार?: Governor Bhagat Singh Koshyari

PM मोदींकडे जबाबदारीतून मुक्त होण्याची ईच्छा केली व्यक्त

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी Governor Bhagat Singh Koshyari यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून पदमुक्त करण्याची विनंती केली आहे. राजकीय जबादारीमधून मुक्त होऊन उर्वरित आयुष्य चिंतन मनन करत घालवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राने राज्यपाल पदाच्या काळात भरभरून प्रेम दिलं याबद्दल त्यांनी आभार सुद्धा व्यक्त केले आहेत.

#Maharashtra governor Bhagat Singh Koshyari said on Monday he has written to Prime Minister Narendra Modi and informed him that he wants to be "discharged of all political responsibilities".

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील,” असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. Governor Bhagat Singh Koshyari


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.