Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

रविवार, जानेवारी २२, २०२३

नवेगावबांध-कोहमारा मार्गावर मोटर सायकलची ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक.एक ठार,तर एक गंभीर.अपघातात नेमीचंद वलथरे यांचे दुःखद निधन.

संजीव बडोले प्रतिनिधी.
नवेगावबांध दि.२१ जानेवारी:-
नातेवाईकाच्या अंतिम संस्काराला उपस्थित राहून स्वगावी परतणाऱ्या एका मोटर सायकल चालकाचे अपघाती दुःखद निधन झाले.रोडवर उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिल्याने मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. मृतकाचे नाव नेमीचंद बादशहा वलथरे राहणार सावरटोलाअसे असून, मागे स्वार असलेला चुलत भाऊ गंभीर जखमी झाला आहे.
अपघाती निधनाचे वृत्त कळताच दोन मुली,पत्नी व वृद्ध आईवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. त्यांच्या मृत्यूने साऱ्या गावावर शोककळा पसरली आहे.
सदर दुर्घटना दिनांक 20 जानेवारी च्या सायंकाळी 6:15 ते 6:30 वाजेच्या दरम्यान नवेगावबांध- कोहमारा मार्गावरील येथील भारत गॅस गोदामाच्या जवळ घडली.
प्राप्त माहितीनुसार,काल दिनांक 20 जानेवारीला अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला येथील रहिवासी नेमीचंद बादशाह वलथरे वय 52 वर्षे हे आपल्या चुलत भाऊ भोजराम रामजी वलथरे वय 48 वर्षे दोघेही राहणार सावरटोला हे,भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मोहघाटा येथून स्वतःच्या मोटरसायकल एमएच 35,एक्स 5779 ने फुटाळासौंदड येथे आपल्या मुली,जावई व नातवांना भेटून कोहमारा मार्गे स्वगावी सावरटोला येथे परत येत असताना, नवेगावबांध-कोहमारा या मार्गावर सायंकाळी 6.15 ते 6.30 वाजता नवेगावबांध येथील भारत गॅस गोडाऊन जवळ रस्त्यावर उभे असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक एमएच 35,जी 7393 ला जबर धडक दिली.या अपघातात मोटरसायकल चालक नेहमीचं वलथरे व त्यांचे भाऊ भोजराम वलथरे हे दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच, ये जा करणाऱ्या लोकांनी त्यांना ग्रामीण रुग्णालय नवेगावबांध येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
नेमीचंद वलथरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.तर दुसरे गंभीर जखमी भोजराम वलथरे यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर ते गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.त्यांची प्रकृती ठीक असल्याची माहिती आहे.देवलगाव येथील सुदाम शेंडे यांच्या मालकीचा ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होईल.अशा स्थितीत धोकादायक व निष्काळजीपणाने उभे करून ट्रॉलीला कोणत्याही प्रकारचे रिपटेकलेस पार्किंग लाईट न लावता उभे ठेवल्याने मोटरसायकल चालक नेमीचंद वलथरे यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरले.तसेच फिर्यादीचे भाऊ भोजराम वलथरे  गंभीर जखमी करण्यास कारणीभूत ठरले.ट्रॅक्टर चालकावर फिर्यादी केशव रामजी वलथरे राहणार सावरटोला यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नवेगावबांध येथे अपराध क्रमांक 09/2023 कलम 283,337,338,304(अ), भादवि सहकलम222/177 मोटार वाहन कायदा अव्यये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मपोना घनमारे हे करीत आहेत.मृतक नेमीचंद वलथरे यांच्यावर शवविच्छेदनानंतर सावरटोला येथील स्थानिक स्मशान घाटावर शोकाकुल गावकरी आप्तेष्ट व कुटुंबीय यांच्या उपस्थितीत अंतिम संस्कार करण्यात आले. मृतक नेमीचंद यांच्या मागे आई,पत्नी,तीन मुली आहेत.मृतक नेमीचंद यांच्या अपघाती निधनाने वलथरे कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. वडीलाच्या अपघाती निधनाचे वृत्त कळताच दोन मुली,पत्नीने व वृद्ध मातेने टाहो फोडला. वलथरे कुटुंबीयांचा एकमेव आधारवड या अपघाताने हिरावून घेतला.
मृतक नेमीचंद हे त्यांच्या कुटुंबीयांचे एकमेव आधार होते. त्यांच्या अशा अकाली जाण्याने त्यांचे कुटुंब दुःखाच्या महासागरात बुडून गेले आहे. त्यांची मोठी मुलगी वैष्णवी 12 कला शाखेतून संग्रामे विद्यालयातून इयत्ता बारावीला द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. उद्या दिनांक 22 जानेवारीला विद्यालयाच्या वार्षिक उत्सवात गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभात तिचा सत्कार करण्यात येणार आहे.परंतु तिचा हा गौरव बघायला वडील ह्यात नाहीत.याचे दुःख तिला आहे, तर दुसरी मुलगी तेजस्विनी ही सम्राट अशोक विद्यालय उमरी येथे इयत्ता दहावीत शिकत आहे. वडिलांच्या अकाली, अपघाती निधन झाल्याने या दोन्ही मुलीवर दुःखाचा आघात झाला आहे. त्यांच्या निधनाने संपूर्ण सावरटोला गावावर शोककळा पसरली आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.