Top News

शाळेचे शिक्षक येतात दुपारी दोन वाजता; त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी उचलले असे पाऊल school teacher students Chandrapur

अतिरिक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक अवेळी येतात, अध्यापन करत नाही...

ads

सोमवार, जानेवारी ०२, २०२३

BJP Mission 144 | भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे #चंद्रपूर येथील जनसभेसाठीआगमन

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांची विजय संकल्प जाहीर सभा

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.  @JPNaddaजी यांचे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.  @JPNaddaजी यांचे #चंद्रपूर येथील जनसभेसाठी नागपूर येथे आगमन झाले. त्यांचे #नागपूर विमानतळावर मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी भाजपा राष्ट्रीय सह-संघटनमंत्री  @shivprakashbjp जी उपमुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री मुनगंटीवार, भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, माजी केंद्रीय मंत्री अहिर यांची  यांच्यासह भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व आमदार उपस्थित होते.  


2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला नेत्रदीपक यश मिळावे म्हणून भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा देशातील लोकसभा क्षेत्राचा दौरा करणार आहेत.याची सुरुवात चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्रातून सोमवारी 2 जानेवारी 2023ला दुपारी 12 वाजता,न्यु इंग्लिश हायस्कूल ग्राऊंड,विश्रामगृह समोर येथील 'विजय संकल्प' जाहीर सभेच्या माध्यमातून केली जात आहे.यावेळी जाहिरसभेचे अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक म्हणून भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांची तर प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,वने,सांस्कृतिक कार्य व मत्स्यपालन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार,भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष,माजी केंद्रीयमंत्री हंसराज अहिर,खासदार अशोक नेते,खा.रामदास तडस,आ.संजीव रेड्डी,आ.संदीप धुर्वे,आ.डॉ.रामदास आंबटकर व आ.बंटी भंगाडीया यांची उपस्थिती राहणार आहे.
2019 च्या निवडणुकीत भाजपाने 545 पैकी 282 जागा जिंकत परत एकदा वर्चस्व स्थापित केले.ही संख्या अजून वाढावी म्हणून व जेथे भाजपाचे खासदार नाही अश्या लोकसभा मतदारसंघाचा जे पी नड्डा पहिल्या टप्प्यात प्रवास दौरा करणार आहेत.पहिल्या टप्प्यात 144 मतदारसंघ असून यात महाराष्ट्रातील 16 मतदारसंघाचा समावेश आहे. या प्रवास दौऱ्याची सुरवात चंद्रपुरातील विजय संकल्प जाहिरसभेने होणार आहे.या सभेला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे,भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,भाजपा जिल्हाध्यक्ष( यवतमाळ )नितीन भुतडा,संघटन महामंत्री राजेंद्र गांधी,भाजपा माजी जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा,महामंत्री सुभाष कसंगोट्टूवार,रवींद्र गुरनुले,ब्रिजभूषण पाझारे,संजय गजपुरे,नामदेव डाहुले,अलका आत्राम,अंजली घोटेकर,राहुल पावडे,विशाल निंबाळकर,विवेक बोढे,आशिष देवतळे,अहतेशाम अली आदींनी केले आहे.

BJP National President JP Nadda's Vijay Sankalp public meeting on Monday  | @PMOIndia

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.