Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

रविवार, जानेवारी २२, २०२३

जुन्या वादातून काठीने मारहाण; वृद्ध जागीच ठार | Breaking News

जुन्या वादातून काठीने मारहाण; वृद्ध जागीच ठार | Beating with a stick from an old argument; The old man was killed on the spot

उमेश तिवारी/कारंजा घाडगे Wardha Breaking News
तालुक्यातील सावल येथे आज दि,22 रविवार ला सकाळी साडेआठच्या दरम्यान गावातील वृद्ध इसमाचा काठीने मारहाण केल्याने जागीच मृत्यू झाला त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.

विश्वनाथ देशमुख 


सावल येथील एकमेकांच्या घराशेजारी राहत असलेले मृतक विश्वनाथ देशमुख वय 66 वर्ष व अशोक बोवाडे यांच्यात गेल्या अनेक दिवसापासून गुराढोराच्या कारणावरून वाद सुरू होता या वादानेच आज अशोक बोवाडे यांनी पुन्हा वादाला सुरुवात केली हा शाब्दिक वाद वाढत गेला व रागाच्या भरात अशोकने काठीने वृद्ध विश्वनाथ देशमुख यांना भर रस्त्यात डोक्यावर मारहाण केली यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

मृतकाचा नातू आरोपीच्या घरासमोर नेहमी खेळत होता. या कारणावरून काल, दि. 21 ला दोघांमध्ये संध्याकाळच्या सुमारास सुद्धा वाद झाला होता. परंतु, त्यावेळी मृतकाचा मुलगा मोहन हा घरी असल्याने त्याने हा वाद शांत केला व वडिलांना घरी आणले होते. परंतु अशोक रात्रभर राग मनात ठेवून झोपी गेला व आज सकाळी उठताच त्याने पुन्हा वादाला सुरुवात केली यावेळी मुतकाचा मुलगा मोहन हा दूध डेरी वर दूध घेऊन गेला होता. नेमकी हीच संधी साधून त्याने मृतकाला काठीने डोक्यावर मारहाण केली व रस्त्यावर ढकलले, यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कारंजा पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी पंचनामा करून आरोपी अशोक बोवाडे याला ताब्यात घेत अटक केली. 

घटनेचे गांभिर्य ओळखून सहाय्यक पोलीस अधीक्षक सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोळुंके, तळेगाव पोलीस निरीक्षक गजभिये, कारंजाचे पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सचिन मानकर, विनोद वानखेडे, लीलाधर उकंडे, किशोर कडू, नितेश वैद्य, गुड्डू थुल, हांदवे यांनी घटनास्थळाला भेट देत पाहणी केली या घटनेचा पुढील तपास कारंजा पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत हे करत आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.