खूप खूप आदर पूर्वक शिष्यांनी आपल्या गुरुसाठी आयोजित केलेला हा गुरूचा सन्मान सोहळा.
आज कोणी डॉक्टर आहे, कुणी अभियंता तर कुणी दुकानदार, व्यावसायिक तर कुणी स्वतःचे छोटे मोठे उद्योग करून पण मात्र ही सर्व मंडळी एकत्र येऊन काल त्यांनी अली अहमद सरांचा गौरव केला.
जुन्या आठवणींना उजाळा देत सर कसे मारत होते, गाणे शिकवीत होते, कथा सांगत होते, कुणाला सहलीला पैसे नसेल तर त्याची व्यवस्था कसे करत होते.
सरांचा आवडीचा विषय गणित गणितात सरांचा कसा हातखंडा आहे, सर इयत्ता १ते ४चेच गणित नाही तर पुढे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात गेल्यावर आलेल्या गणितातील समस्या सरांनी कशा दूर केल्या या गोष्टींना मुलांनी उजाळा दिला आणि केक देखील स्केल, त्रिकोण 1,2, 3अंक यांचा आणला खरोखरच शिष्यांनी गुरूचा केलेला आदर पूर्वक विनय पूर्वक केलेला सन्मान म्हणजेच खरा खुरा शिक्षक पुरस्कार होय.
अली अहमद भाटी सराना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा 🎂🎉🎂🎉.
किशोर रावते
गट शिक्षणाधिकारी
प. स. आर्णी
After 30 years, that first class in Amani's school was completed