Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

गुरुवार, डिसेंबर २२, २०२२

कर्जापायी तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या | committed suicideकर्जापायी तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथे कर्जापायी तरुण शेतकऱ्याने घरातच गळफास लावून जीवन यात्रा संपवल्याची घटना आज ( दि. 22डिसेंबरला ) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. होमराज प्रेमदास किरमिरे वय 35 असे तरुण मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. Chandrapur news

आवळगाव येथील होमराज किरमिरे हा पत्नी, आई, मुलगा मुलगीसह कुटुंब चालवायचा . मिळेल ते काम करून व पाच एकर शेती मधून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. दोन वर्षांपूर्वी वडील हे कॅन्सरने मृत पावले होते. त्यांच्या उपचाराकरिता महिला बचत गट व बँकेकडून होमराज किरमिरे यांनी कर्ज उचलले होते. अशातच सततच्या नापिकीमुळे व वाढत्या कर्जामुळे किरमिरे हा आर्थिक विवंचनेत सापडला. शेतीमधून उत्पन्न न आल्याने होमराजची पत्नी ही घरखर्च व लोकांच्या कर्जाची परतफेड करण्याकरिता हातभार लागावा म्हणून कर्नाटक येथे धान रोवणीकरिता गेली होती. Farmers News

रात्री कुटुंबासह होमराजने जेवण केले व मध्यरात्रीच्या सुमारास घरातच पत्नी नसताना महिला बचत गटाचे व बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत आत्महत्या केल्याची घटना आज सकाळच्या सुमारास उघडती झाली. घटनेची माहिती मेंडकी पोलीस चौकी येथे देण्यात आली. मृतक शेतकरी किरमिरे यांच्यावर सेवा सहकारी संस्था आवळगाव, महिला बचत गट व खाजगी लोकांचे कर्ज असल्याचे माहिती समोर येत आहे. पुढील तपास मेंडकी पोलीस करीत आहेत.

Chandrapur brahmapuri Maharashtra Vidarbha India former suicide police Crime loan bank

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.