Top News

शाळेचे शिक्षक येतात दुपारी दोन वाजता; त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी उचलले असे पाऊल school teacher students Chandrapur

अतिरिक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक अवेळी येतात, अध्यापन करत नाही...

ads

गुरुवार, डिसेंबर २९, २०२२

देशी कट्टासह दोन जिवंत काडतुसे जप्त ; दोघांना अटक #warora #newsवरोरा येथील रत्नमाला चौकातील घटना
 #warora #news
शिरीष उगे (वरोरा प्रतिनिधी)
वरोरा : एका वाहनातून देशी बनावट कट्टा घेऊन येत असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वरोरा यांना मिळाली असता पोलिसांनी वरोरा येथील रत्नमाला चौकात नाकाबंदी करून त्या वाहनातून एक देशी बनावट पिस्तूल दोन जिवंत काडतुसे सह दोघांना अटक केली,सदर घटना दि.२८/१२/२०२२रोजी रात्री ११ते१२च्या दरम्यान घडली.

पुनंमचंद् येलय्या मारकरी(३४ वर्ष) अभिलाष ओदेलू पंचल(३०वर्ष)दोघेही रा, माजरीचे रहिवाशी आहेत.  #warora #news police

उपविभागीय पोलीस कार्यालयाला गोपनीय माहिती मिळाली की वरील दोन आरोपी देशी बनावट पिस्टल घेऊन बलेनो गाडी वाहन क्रमांक MH BR ८५९३ या चारचाकी वाहनाने वरोऱ्याकडे येत आहेत, उपविभागीय पोलीस अधिकारी आयुष नोपाणी यांनी कुठलाही विलंब न करता स्थानिक रत्नमाला चौकात पोलीस नाकेबंदी करून सदर वाहनाला थांबवले व त्या वाहनातून एक पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली, दोन आरोपींना अटक करून दोन्ही आरोपी कडून ५ लाख २६ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी वरोरा आयुष नोपाणी यांच्या नेतृत्वात सपोनि राजकीरण मडावी, पोलीस स्टेशनचे जुमडे, गुरनुले, अनिल बैठा, शिंदे, प्रविण निकोडे यांनी केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.