Top News

विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्रप्रिय अर्थसंकल्प : सुधीर मुनगंटीवार national budget development: Sudhir Mungantiwar

मुंबई, दि. 1 फेब्रुवारी 2023: आज केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा विकासाची सप्तपदी मांडणारा राष्ट्र...

ads

गुरुवार, डिसेंबर २२, २०२२

मारहाणीचा हा व्हिडीओ बघाल तर तुम्हालाही.... viral video social media।


https://www.khabarbat.in/

https://www.khabarbat.in/

शेतातील सोयाबीन चोरल्याचा संशय व्यक्त करीत दोन चोरट्यांना दोराने बांधून, पाठीवर लाथ ठेवून, बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची शहानिशा केली असता सदर घटना (Maharashtraमहाराष्ट्र ) चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील आष्टी येथे घडली. viral video social media । Warora Chandrapur District

https://www.khabarbat.in/

शेतात सोयाबीनची चोरी झाल्याची तक्रार देण्यासाठी शेतमालक पोलिसात गेले होते. त्यानुसार पोलिसांचे एक पथक या आरोपीच्या शोधासाठी मागावर होते. त्यांनी आरोपींना पकडले. ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला. त्यानंतर जी घटना उघड झाली, ती अमानवीय होती. या दोघांना बेदम मारहाण करण्यात आली होती. हा व्हिडिओ जर तुम्ही बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. जरी त्यांनी चोरी केली असली तरी कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. जेव्हा पोलीस या दोघांना पकडून नेत होते, तेव्हा याच दोघांनी आपली व्यथा सांगितली. बेदम मारहाण कशा पद्धतीने झाली याची कथन केले तेव्हा पोलिसांनाही राहवले नाही. त्यामुळे पोलिसांनी स्वतःहून मारहाण करणाऱ्या या सर्वांविरोधात फिर्याद नोंदवली आणि गुन्हा दाखल केला आहे. viral video social media। Warora Chandrapur District. policeवरोरा येथे राहणारे विनोद श्रावण देठे यांचे आष्टी येथे 17 एकर शेत आहे. देठे हे नोकरांमार्फत शेती करतात. 10 क्विंटल सोयाबीन किंमत 60 हजार रुपये चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले. त्याठिकाणी संदीप रागीट व मोहन ठेंगणे हे दोघे दुचाकीवर जाताना दिसले. त्या दोघांनी शेतातील सोयाबीन चोरी केल्याचा संशय आल्यावर शेतात त्या दोघांना पकडण्यात आले. हात-बांधत मारहाण करण्यात आली. त्यानंतर देठे यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध तक्रार दाखल केली, पोलिसांनी दोघांवर 461, 380 व 34 कलम अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस आष्टी येथे रवाना झाले होते. चोरीचा माल व आरोपीच्या शोधात असताना संदीप रागीट व मोहन ठेंगणे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. मात्र त्या दोघांना बेदम मारहाण केली असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी स्वतः याबाबत मारहाण करणाऱ्या विरुद्ध फिर्याद नोंदविली. पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे. viral video social media। Warora Chandrapur District.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.