Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

बुधवार, डिसेंबर २१, २०२२

वरोरा, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही प्रलंबित प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेचे चार मार्ग मंजूर होणार Pradhan Mantri Gramsadak Yojanaखासदार बाळू धानोरकर यांनी घेतली केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री यांची भेट

चंद्रपूर : प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण 176 किलोमीटर रस्त्याच्या बांधकामाचे उद्दिष्ट होते त्यापैकी 135 किलोमीटर रस्त्याच्या कामांना मंजुरी मिळाली मात्र उर्वरित 33 किलोमीटरच्या कामांना हायर कॉस्टमुळे अद्यापही मंजुरी मिळाली नव्हती. यासंदर्भात खासदार बाळू धानोरकर यांनी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची भेट घेतली. चंद्रपूर जिल्ह्यातील शिल्लक असलेल्या चारही मार्गांच्या बांधकामाला लवकरच मंजुरी देऊ असे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहेत.

          आज कृषी भवन दिल्ली येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा ३ मधील प्रलंबित प्रस्तावाबाबात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायतराज मंत्री कपिल पाटील, आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, खासदार सुनील तटकरे, खासदार विनायक राऊत तसेच महाराष्ट्रातील सर्व खासदार यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील विशेषतः चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेत रखडलेले कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी खासदार बाळू धानोरकर यांनी यापूर्वी दिल्ली येथे  केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीराज सिह यांची भेट घेतली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही सह अन्य ठिकाणी तसेच यवतमाळ जिल्ह्यातील अनेक कामे प्रस्तावित आहेत. परंतु पाठपुरावा अभावी ते कामे तशीच रखडलेली आहेत. त्यामुळे आज   केंद्रीय ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री यांची भेट घेऊन हि कामे मार्गी लावण्याची विनंती केली. हि कामे तात्काळ मार्गी लावणार असल्याचे आश्वासन मंत्री महोदयांनी खासदार बाळू धानोरकर यांना दिले. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील वांदली ते निलजई नवीन सोईट, माढेली रस्ता, नागभिड तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ते प्रतिमा मार्ग, सिंदेवाही तालुक्यातील रामाला रस्ता, ब्रह्मपुरी तालुक्यातील सोनेगाव मार्ग मंजूर करण्याची यावेळी मागणी करण्यात आली.

Varora, Brahmapuri, Nagbhid, Sindewahi, four routes of the pending Pradhan Mantri Gramsadak Yojana will be approved.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.