Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, डिसेंबर १२, २०२२

“टॉकिंग ट्री”वरून वाद : “स्पीकिंग ट्री” या ॲपवर कोणाचा अधिकार? | Talking Tree | Speaking Tree | Appचंद्रपूर, दि. 12 : कार्यकारी संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती यांनी सन 2020 मध्ये सारंग धोटे यांना सदर वृक्षाची संपूर्ण माहिती पुरविण्यासाठी रु. 25 हजार  देवून त्यांच्याकडून ऍप तयार करून घेतले होते.  सदरचे ॲप सारंग धोटे यांनी सन 2020 मध्ये तयार करून दिले होते. त्यांनी तयार करून दिलेले क्युआर कोड संबंधित झाडांवर चिपकविण्यात आले होते. पर्यटक सदरचे क्युआर कोड त्यांच्या मोबाईलद्वारे स्कॅन करून ऑडिओद्वारे झाडांची माहिती प्राप्त करीत होते. म्हणून मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने त्या ॲपला टॉकिंग ट्री असे नाव दिले. त्यामूळे त्या ॲपवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे पूर्णपणे स्वामित्व आहे.

सारंग धोटे यांनी सदर अॅप सन 2020 मध्ये मेळघाट व्याघ्र प्रकल्पासाठी तयार केले असून हे ॲप त्यांच्या मालकीचे नाही तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे आहे. परंतु त्यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला अंधारात ठेवून त्यांची पूर्वपरवानगी न घेता कॉपीराईट अॅक्टनुसार दिनांक 20 जानेवारी 2022 मध्ये आपल्या नावाने कॉपीराईट केल्याचे निदर्शनास येते. ही बाब कायदेशीररित्या योग्य नाही. त्यांनी रजिस्टर केलेले ॲप टॉकिंग ट्री जेडीपीएस या नावाने नमूद आहे. तसेच कॉपीराईट कार्यालय, भारत सरकार यांच्या प्रमाणपत्रांमध्ये नमूद अनुक्रमांक 8 नुसार, टॉकिंग ट्री हे ॲप अप्रकाशित आहे.

परंतु अलीकडच्या काळात वन अकादमी, चंद्रपूर यांनी एक नवीन ॲप तयार करून माय चंद्रमा ॲपमधील “स्पीकिंग ट्री” या नावाचे फिचर्स तयार करण्यात आले. सदर ॲपचे विमोचन राज्याचे वनमंत्री यांच्या हस्ते दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी करण्यात आले. वरील ॲपचा या ॲपशी काहीच संबंध नाही. वनअकादमी, चंद्रपूर यांच्या नावाने तयार केलेल्या माय चंद्रमा ॲपमधील “स्पिकिंग ट्री” या नावाचे फिचर्सला लोकांकडून योग्य प्रतिसाद मिळत असल्यामुळे सारंग धोटे हे जाणून-बुजून त्यांचे ॲप असल्याचे प्रिंट मीडिया व सोशल मीडियावर अफवा पसरवीत आहे.

तरी, माय चंद्रमा ॲप व त्यामधील “स्पिकिंग ट्री” या नावाचे फीचर्स फक्त वनकादमी, चंद्रपूर यांचा अधिकार असून सदर ॲप कोणाचेही आधारावर तयार केलेले नाही, असे चंद्रपूर वन प्रशासन, विकास व व्यवस्थापन प्रबोधिनीचे संचालक यांनी कळविले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.