Top News

नव्या वर्षातील जानेवारी महिना निघाला संपूर्ण प्रदूषित Chandrapur Air Quality Index (AQI) and India Air Pollution

नवं वर्षातील जानेवारीचा चंद्रपुरचा प्रदूषण निर्देशांक 31पैकी 31 दिवस   प्रदूषण  आढळले हिव्वाळा सुरू झाल्या पासून चंद्रपुर च्या प्रदूषनात वाढ...

ads

सोमवार, डिसेंबर २६, २०२२

बोगस झाडे हटावचा नारा; मेंढ्यांसह निघाला मोर्चा


गडचिरोलीत मेंढपाळांचा आक्रोश मोर्चा


मेंढ्यांसह हजारोंच्या संख्येत धनगर समाज धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावरगडचिरोली - "बोगस झाडे हटाव, धनगर आरक्षण बचाव", "वनक्षेत्रात चराईस परवानगी द्यावी", "येळकोट येळकोट, जय मल्हार" च्या घोषणा देत झाडे हे बोगस धनगर असल्याने हटविण्याची कारवाई करावी, वनक्षेत्रात शेळ्या मेंढ्या चराईस परवानगी द्यावी या मागण्यांसाठी धनगर समाजाचा मोर्चा गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मेंढ्यांसह हजारोंच्या संख्येत धडकला.


चंद्रपूर - गडचिरोली जिल्ह्यातील झाडे कुनबी, झाडया, झाडी हे धनगर जमातीतील तत्सम जात "झाडे" या नामसदृश्यतेचा गैरफायदा घेत बोगस जात प्रमाणपत्र मिळवीत शासकीय नोकरी व इतर सुविधांचा लाभ घेत आहेत. त्यामुळे खऱ्या धनगर जमातीवर अन्याय होत असल्याने त्यांना नोकरीतून बडतर्फ करावे, धनगर समाज मेंढपाळ असल्याने चराईचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यामुळे वन क्षेत्रात चराईस परवानगी द्यावी या मागण्या घेऊन धनगर समाजाचे विविध संघटना, धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य, धनगर महासंघ महाराष्ट्र राज्य, जय मल्हार सेना, अहिल्यावाहिनी, धनगर जमात संघटना चंद्रपूर, अखील भारतीय मौर्य क्रांती सेना
महाराणी अहील्यादेवी प्रबोधन मंच वर्ल्ड धनगर सोशल ऑर्गनायझेशन यांचे वतीने काढण्यात आला. मोर्चा धनगर समाजाच्या हजारो लोकांनिशी शेळ्या मेंढ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचल्यानंतर सभेला सुरवात झाली.


मोर्चेकऱ्यांना मोबाईलवरून बहुजन विकास, मागास मंत्री अतुल सावे, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी संबोधित करून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी माजी राज्यसभा खासदार डॉ विकास महात्मे, धनगर समाज संघरसमिती नागपूर विभाग अध्यक्ष डॉ तुषार मर्लावार, माजी सभापती विजय करेवार, डॉ नारायण मर्लावार, संजय कनावार, डॉ यशवंत कन्नमवार, मुखरूजी ओगेवार, विस्तारीजी फेबुलवार, हरीश खुजे, हेमांतकुमार ढोले, संदीप शेरकी, साईनाथ बुचे, कृष्णां गंजेवार, रौनक फेबुलवार यांनी मोर्चेकऱ्यांना संबोधित केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.