Top News

शाळेचे शिक्षक येतात दुपारी दोन वाजता; त्रासलेल्या विद्यार्थ्यांनी उचलले असे पाऊल school teacher students Chandrapur

अतिरिक्त शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश ब्रह्मपुरी तालुक्यातील कोसंबी (खड) येथील जिल्हा परिषद शाळा शिक्षक अवेळी येतात, अध्यापन करत नाही...

ads

सोमवार, डिसेंबर १२, २०२२

शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सोहळा जल्लोषात
जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे, शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय वार्षिक स्नेहसंमेलन २०२२ अंतर्गत विविध स्पर्धांचा उद्घाटन सोहळा जल्लोषात

जुन्नर /आनंद कांबळे

संपूर्ण हिंदुस्तानचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास अभिवादन करून शिव संस्कृती रॅली ची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयातील ७५ मुलींचे लेझीम पथक, ४५ मुले व मुलींचे ढोल ताशा पथक, ३० मुलींचे झेंडा पथक व लाठीकाठी पथक सहभागी झाले होते.

तसेच इतर सर्व विद्यार्थी देखील या रॅलीमध्ये सहभागी झाले होते.

शिव संस्कृती रॅली ही श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारुढ पुतळा ते नवीन बस स्थानक ते बाजार समिती मार्गे कनिष्ठ महाविद्यालय पर्यंत काढण्यात आली होती. सदर रॅलीमध्ये लेझीम पथक, ढोल ताशा पथक, झेंडा पथक व लाठीकाठी पथक यांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. प्रास्ताविकामध्ये कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. गणेश आहेर यांनी जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे, शंकरराव बुट्टे पाटील कनिष्ठ महाविद्यालय हे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे त्याचबरोबर उज्वल निकालाची परंपरा अखंडित ठेवणं तसेच कलागुण विकसित करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे हाच कनिष्ठ महाविद्यालयाचा हेतू आहे. सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील कनिष्ठ महाविद्यालयात झालेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक, कला व क्रीडा विषयक थोडक्यात आढावा दिला.


तसेच प्राध्यापकांच्या कामाचे व विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. सदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य नितीन मेहता यांनी विद्यार्थ्यांना चारित्र्य संपन्न राहणे व संस्कारक्षम शिक्षण ही काळाची गरज आहे व जुन्नर एज्युकेशन सोसायटी ती जोपासत असल्याचे सांगितले. संस्थेचे कार्याध्यक्ष धनेश संचेती यांनी या उद्घाटन समारंभाचे उद्घाटन झाल्याचे घोषित करून जुन्नर एज्युकेशन सोसायटी ही विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत आहे म्हणूनच संस्थेमध्ये आज चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत व या सर्व विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता यावर्षी कनिष्ठ महाविद्यालयाचे स्वतंत्र वार्षिक स्नेहसंमेलन घेण्यात आले आहे.  सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन आपला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्याचा आनंद द्वीगुणीत करावा असे प्रतिपादन केले.


जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड. सुधीर ढोबळे यांनी कनिष्ठ महाविद्यालयाची प्रगती समाधानकारक असून कनिष्ठ महाविद्यालय हे स्पर्धेच्या प्रत्येक क्षितिजावर योग्य पद्धतीने काम करत आहे असे सांगितले. या प्रसंगी जुन्नर एज्युकेशन सोसायटीचे मा. अध्यक्ष, ॲड. सुधीर ढोबळे, मा. उपाध्यक्ष श्री. संजय बुट्टे पाटील, मा. कार्याध्यक्ष श्री.धनेश संचेती, तसेच विद्यमान कार्यकारी मंडळ सदस्य मा. श्री. नितीन मेहता, मा. श्री. राहुल जोशी, मा.श्री. सुनील गुरव, मा. डॉ. नीलीमा जुन्नरकर, मा.श्री. जितेंद्र देशमुख, मा. श्री. आनंद  सासवडे, प्राचार्य प्रा. गणेश आहेर तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा वाघमारे यांनी केले. तसेच प्रा. डॉ. राजू थोरवे यांनी आभार मानले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.