Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

शुक्रवार, डिसेंबर ३०, २०२२

सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर | Savitrimai Phule Award

सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

अखेर सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

पुणे : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय काम लक्षात घेऊन राज्य सरकारने सावित्रीमाई राज्य आदर्श गुणगौरव पुरस्कार जाहीर झाले असून, येत्या 3 जानेवारीला पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. 

शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते. 

 समाजाची नि:स्वार्थ भावनेने आणि निष्ठेने सेवा करणाऱ्या व शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतात.
savitrimai fule rajya  adarsh shikshak gungaurav purskar

  राज्य शिक्षक पुरस्कार योजना १९६२-६३ पासून महाराष्ट्र राज्यात कार्यान्वित असून, ती शालेय शिक्षण विभागांमार्फत राबविली जाते. सन २०२१-२२ पासून राज्य आदर्श शिक्षक पुरस्काराचे निकष सुधारीत करून सदर पुरस्कार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार या नावाने राबविण्यात येणार आहे. या पुरस्काराची रक्कम रु.१०,०००/-(रुपये दहा हजार फक्त) आहे. तसेच राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दिनांक ४ सप्टेंबर, २०१४ च्या शासन निर्णयान्वये ठोक रक्कम रुपये १,००,०००/- (रुपये एक लाख फक्त) अदा करण्यात येते.

 सन २०२१-२२ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी दिनांक ०१ सप्टेंबर, २०२२ रोजी राज्य निवड समितीची ऑनलाईन बैठक झाली. राज्य निवड समितीने संदर्भ क्र.५ येथील दिनांक ०५ सप्टेंबर, २०२२ च्या पत्रान्वये शिक्षकांची गुणानुक्रमे प्रवर्गनिहाय निवड यादी शासनास सादर केली. त्यानुसार क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार घोषित करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते.

सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार यादी खालील लिंकवर क्लिक करा 
 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.