Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

बुधवार, डिसेंबर २८, २०२२

Removal of Encroachments | चंद्रपूर शहरात रेल्वेस्थानक रोडवरील अतिक्रमण हटविलेचंद्रपूर शहरातील बस स्थानक ते रेल्वे स्टेशन मार्गावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या फुटपाथवर अनेकांनी आपली दुकाने थाटली. त्यामुळे ये जा करणाऱ्या नागरिकांना आणि वाहने लावण्यासाठी पार्किंगसाठी गैरसोय होऊ लागली. या विरोधात चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने कारवाई केली. Removal of Encroachments 

Railway Station, Bus Stand, Court Premises, Collectorate office

चंद्रपूर शहरातील काही महिलांनी रस्त्यावरील वाहनांमुळे वाहतुकीस अडथळा होत असल्याची बाब निदर्शनास आणण्यासाठी हातात फलक घेऊन आंदोलन केले. बस स्थानक चौकामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पानठेले, फळ विक्रेते, हातगाडी यांची मोठ्या प्रमाणात येथे गर्दी असते. तेच अतिक्रमण काढण्यासाठी महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून कारवाई करण्यात आल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेश मुळे यांनी दिली.  


रेल्वे स्थानक, बसस्थानक, न्यायालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी अभियान राबविण्यात आले. ही कारवाई वाहतूक शाखा, रामनगर पोलीस ठाणे, उपप्रादेशिक परिवहन विभाग, महानगरपालिका यांच्या माध्यमातून करण्यात आली. 

 Traffic Police Branch, Ramnagar Police Station, Sub-Regional Transport Department, Municipal Corporation chandrapur.
SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.