Top News

प्रादेशिक मराठी बातमीपत्र दिनांक 09.02.2023

आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 09.02.2023 रोजीचे दुपारी 03.00 वाजेचे मुंबईचे प्रादेशिक बातमीपत्र Marathi News Nagpur - All India Radio   @marath...

ads

सोमवार, डिसेंबर २६, २०२२

गर्भवती महिलेची विहिरीत उडी; अन झाली प्रसूती : पुढे घडले धक्कादायक | shocking News



नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेने विहिरीत उडी घेतली. पाण्यात उडी घेतल्यानंतर तिने बाळाला जन्म दिला. पण पाण्यात बुडाल्याने दोघांचाही मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री घडली. निकिता ठेंगणे (वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले. या घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे निकिताचा पहिला मुलगा एक वर्षाचा असताना मरण पावला, तर आठ महिन्यांच्या मुलीचा देखील पाळण्यातच मृत्यू झाला होता.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावती शहरातील नवीन सुमठाणा परिसरातील विहिरीत गर्भवती असलेल्या निकिता ठेंगणे हिने जीवन संपवण्याच्या उदेश्याने शुक्रवारी रात्री विहिरीत उडी घेतली. विहिरीत उडी घेतल्यानंतर पाण्यातच तिची प्रसूती झाली. तिने पाण्यातच बाळाला जन्म दिला पण पाण्यात बुडाल्याने तिचा आणि नवजात बाळाचा बुडून मृत्यू झाला.

Bhadrawati | Chandrapur Maharashtra India Ballarpur India

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.