चंद्रपूर - जिल्ह्यातील अवैध धंद्यांना अंकुश घालण्याचे काम सध्या पोलिस खात्याकडून सुरू असताना मात्र राजुरा तालुक्यात अवैध सट्टापट्टी व क्रिकेट बेटिंग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.सध्या राजुरा उपविभागीय पोलिस अधिकारी चा प्रभार हा सुशील कुमार नायक यांच्या कडे असल्याने त्यांनी पहिल्याच दिवशी अँक्शन मोडवर येत सट्टा पट्टी व क्रिकेट बुकी वर धाड सत्र सुरू केले.तालुक्यात सदर धाड सत्राची कुणकुण होताच अनेक दोन नंबर व्यावसायिक नायक यांची धडकी घेत भूमिगत झाले आहे.
नायक यांच्या कडे नंबर दोन धंद्याची संपूर्ण नावसहित यादी असल्याने पाठीशी घालणाऱ्या पोलिसांनाही चुकीला माफी नसल्याचे नायक यांनी सांगितले आहे. काल स्वतः नायक यांच्या नेत्रुवात संपूर्ण पोलिस खात दिवसभर ऍक्शन मोड वर पहायाला मिळाले सदर कारवाईत एका सट्टा पट्टी चालकाला पकडण्यात आले असून त्याचा मेन म्होरक्या प्रभू नावाचा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Nayak's entry; The villains of the illegal business underground
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.