Top News

मुख्यमंत्र्यांनी केली महाराष्ट्र भूषण पुरस्काराची घोषणा Maharashtra Bhushan 2022

ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ( Appasaheb Dharmadhikari ) यांना महाराष्ट्र भूषण ( Maharashtra Bhushan )  पुरस्कार जा...

ads

सोमवार, डिसेंबर २६, २०२२

देशपांडे सभागृहात मंगळवारी "राष्ट्रपुरुष अटल" महानाट्य National hero Atal

देशपांडे सभागृहात मंगळवारी "राष्ट्रपुरुष अटल" महानाट्य

राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाकडून आयोजन


नागपूर Nagpur : देशाचे माजी पंतप्रधान, बहुआयामी व्यक्तिमत्व स्व. अटलबिहारी वाजपेयी (Atal bihari Wajpeyee) यांच्या जीवनप्रवासावर प्रकाश टाकणारे "राष्ट्रपुरुष अटल" हे महानाट्य राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मंगळवारी, २७ डिसेंबर रोजी येथील स्व. वसंतराव देशपांडे सभागृहात सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आले आहे. 
नागपूर येथील प्रयास बहुउद्देशीय संस्थेद्वारा निर्मित या महानाट्यातून १७५ पेक्षा जास्त कलावंत सहभागी होणार आहेत.

महानाटय़ाच्या या प्रयोगाचे उदघाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, वन व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीरजी मुनगंटीवार आणि अन्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या प्रयोगास राज्य मंत्रिमंडळाचे सन्माननीय सदस्य, विधान सभा / परिषदेचे सन्माननीय सदस्य उपस्थित राहणार आहेत.


नागपुरातील रसिकांनी या महानाटय़ास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक बिभीषण चवरे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडियात विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.